आकाशाशी जडले नाते -मार्तंड मंदिर

    30-Nov-2016   
Total Views |

“आबा, आजचा guide कोण आहे अश्वत्थामा की वेताळ?”, सुमितने विचारले.
“सुमित, मागचा आठवडाभर हे डोक्याला तेल लावून बसले आहेत बघ! त्यावरून आजचा अवतार अश्वत्थामाचाच वाटतो मला!”, दुर्गाबाई मिश्कीलपणे म्हणाल्या.
“अश्वत्थामाचा वेष घेतल्याने माझं डोकं कस थंड झालय! वेताळा पेक्षा बरे सोंग आहे, नाई का?”, आबा म्हणाले.
“तुम्हाला वेगळ्याने का घ्यायला हवा वेताळाचा वेष! फक्त एक विग चढवला की काम झाले!”, दुर्गाबाई तोंडाला पदर लावत म्हणाल्या, “असो. आज कोणत्या मंदिरात नेणार आम्हाला?”
“चला! आज पुन्हा एकदा प्राचीन काळात जायचे आहे. मागे आपण कश्यप ऋषींच्या कश्यपपूरची सफर केली होती. त्या कश्यप ऋषींनी, कश्यपपुरच्या ईशान्येला असलेले ‘सतीसार’ नावाच्या मोठ्या तळ्यातील पाण्याला वाट काढून दिली. ते खोरे वाळल्यावर वस्तीसाठी योग्य झाले. तो भाग ‘काश्यप मीर’, आज ‘काश्मीर’ म्हणून ओळखला जातो.
“महाभारत काळात, गोनंद नावाचा राजा काश्मीर मध्ये राज्य करीत होता. पुढे अर्जुनाच्या वंशजांनी काश्मीरवर राज्य केले. सिकंदर, म्हणजे Alexander the Great, च्या काळात अभिसार राजा काश्मीरवर राज्य करीत होता. त्या नंतरच्या काळात कुशण व हुणांनी काश्मीरवर राज्य केले. या राजांनी नंतर बौध व शैव धर्म स्वीकारला होता.
“सम्राट हर्ष वर्धनच्या काळात, ७व्या शतकात, दुर्लभवर्धन याने काश्मीर मध्ये राज्य स्थापले. याच्या वंशात ललीतादित्य मुक्तपिड नावाचा मोठा सम्राट झाला. त्याने अफगाणिस्तान पासून तिबेट पर्यंत आणि काश्मीर पासून बंगाल पर्यंत राज्य विस्तारले.
“ललीतादित्यने अनेक मंदिरे, स्तूप बांधली. त्यात उल्लेखनीय होते – विष्णूची सुवर्ण मूर्ती असलेले मुक्तकेशव मंदिर आणि एक आकाशाला भिडणारा बुद्धाचा तांब्याचा पुतळा.
“आपल्याला पाहायचे आहे ते ललीतादित्यने बांधलेले सूर्य मंदिर. आधीच्या मंदिराच्या foundation वर, ललीतादित्याने सूर्याचे ‘मार्तंड मंदिर’ बांधले. या विशाल सूर्य मंदिराच्या आवारात ८४ लहान मंदिरे होती.

Imaginary sketch of the Martand Mandir, based on the study of its ruins by J. Duguid 1870-73

१४ व्या शतका पासून २०० वर्ष तुर्कस्तानचे शहा मीर राजे काश्मीर वर राज्य करत होते. त्यांच्यापैकी एक होता सिकंदर बूत-शिकन. बुत म्हणजे पुतळा किंवा मूर्ती यांचा नाश करणारा हा सिकंदर. याने काश्मीर मध्ये किती मंदिरे, स्तूप, विहार, मूर्ती तोडल्या असतील याला गिनती नाही. मार्तंड मंदिर तोडायला त्याने एक फौजच लावली होती. एक वर्षभर ही मोठी फौज मंदिर तोडत होती! हे मंदिर तोडले, जाळले तरीही त्यांना ते जमीनदोस्त करता आले नाही, तेंव्हा त्याने नाद सोडला.
१९ व्या शतकात इंग्रजांना हे मंदिर सापडले तेंव्हा त्याची अशी दुरावस्था झाली होती 

पुढे भारतीय पुरातत्व विभाने डागडुजी केल्यावर त्याला असे रूप प्राप्त झाले आहे.

त्या मंदिराची भव्यता, कणखरपणा, आणि सौंदर्य या पडलेल्या वास्तूतून सुद्धा लपत नाही!”, आबा म्हणाले.
“त्रिवार मुजरा त्या कलाकारांना आणि स्थापत्यकारांना! इतके आघात सोसून सुद्धा जे उभे राहू शकते त्याचे कोण कौतुक आहे!” सुमित म्हणाला, “आबा, तुम्ही माध्यमांबद्दल पण काही सांगणार होता?”
“हो! बरी आठवण केलीस. आता माध्यमांनी काय करणे अपेक्षित आहे? या मंदिराच्या निमित्त्याने काश्मीरच्या, पाकिस्तानच्या लोकांना आपल्या पूर्वजांची, आपल्या मुळाची, आपल्या आराध्य देवतांची आठवण करून द्यावी. नाही का?
“पण तुमच्या नतद्रष्ट bollywood वाल्यांना ना उत्तम चित्रनिर्मिती करता येते, ना उत्तम निर्मितीला नतमस्तक होता येते. हैदर या सिनेमा मध्ये, सैतानाचा नाच या मंदिरात चित्रित केला. पायात चपला घालून मंदिरात नाचणारी भुते! मंदिराच्या बाजूच्या भिंतींवर शेकडो माणसांना बसवून या गाण्याचे शूटिंग केले!
“त्या देवतेच्या, मंदिराच्या, स्थापत्याच्या, कलेच्या पायाच्या धुळीची तरी सर आहे का त्या सिनेमाला? दीड महिन्याने ज्या सिनेमातले गाणे सुद्धा आठवत नाही त्या सिनेमाने दीड हजार वर्ष जुन्या वास्तूत थयथयाट करावा म्हणजे त्यांच्या over confidence चा कहर आहे!”, आबा वैतागून म्हणाले.

PC: http://indiafacts.org/haider-wrapping-national-insults-celluloid/

“आबा, एक मात्र यातून कळते - आपल्या कडच्या शोर्ट फिल्म्स करणार्यांना, शिकणार्यांना भरपूर वाव आहे! एकेका मंदिराची, दुर्गाची documentary करून, त्याचा योग्य प्रसार करायला हवा.”, सुमित म्हणाला.
“खरे बोललास मित्रा!”, दुर्गाबाईंनी आणलेला चहाचा कप घेत आबा म्हणाले, “पुढच्या भेटीत आपण अजून एक उत्तम स्थापत्याचा आणि astronomical यंत्रांचा खजाना असलेल्या सूर्य मंदिराची सफर करू.”

-दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121