#ओवीLive - That’s my Mommy!

    27-Nov-2016   
Total Views |

काय झालं रे खी खी करून हसायला?”, स्वयंपाकघरातून ओटा आवरता आवरता निकिताने विचारले.

Tom & Jerry पाहण्यात बच्चा मंडळी दंग होती! हसून हसून डोळ्यात पाणी! एकालाही काकीचा प्रश्न ऐकूच गेला नाही! मग निकिता काकीच बाहेर येऊन TV समोर बसली, आणि पाहता पाहता मुलांच्या हसण्यात सामील झाली! मग वीणा आजी पण TV समोर मटार सोलायला घेऊन बसली.

काय ग सोनू, तो बदमाश बोका बदकाच्या पिलाला इतके प्रेमाने कसं काय गोंजारत आहे?”, वीणा आजीने विचारले.

आजी, ते बदकाचे पिलू अंडे फोडून बाहेर येते. आणि सगळ्यात first Tom ला पाहते. मग ‘हीच माझी Mommy’ असे म्हणून त्याच्या मागे मागे फिरते! मग Tom ला पण ते पिलू आवडायला लागते आणि प्रेमाने खांद्यावर घेऊन हिंडतो, खाऊ घालतो!”, TV ला चिकटलेली नजर न हलवता, सोनालीने उत्तर दिले.

अरे! काल मी अशीच एक clip पहिली होती! एका farm मधले बदक अंडी घालून निघून गेले. त्या farm च्या मालकाने ती अंडी incubator मध्ये ठेवली आणि त्यांची काळजी घेऊ लागला. काही दिवसांनी त्यातून १०-१२ पिल्ले आली. आणि त्या मालकालाच आपली आई समजू लागली! दिवसभर त्याच्या मागे मागे फिरू लागली! आणि गम्मत म्हणजे, तो मालकही त्यांच्यावर आई सारखीच माया करू लागला.”, निकिता काकीने एक बातमी सांगितली.

वीणा आजी म्हणाली, “दिसेल त्याच्यावर असं निरागस आणि पोटातून प्रेम करणारी माणसे अगदी दुर्मिळ असतात बघ! ज्ञानेश्वर म्हणतात – गायीचे दुध हवे म्हणून लोक तिला गोठ्यात बांधून ठेवतात. पण तिच्या वासराला मात्र असे काही करावे लागत नाही! त्या वासराला गाय प्रेमाने पोटभर दूध पाजते. का? तर ते वासरू बघेल त्याला ‘ही माझी आई’ असे समजून मनातून त्यावर प्रेम करते. तसं अनेकजण देवाला ध्यान धारणेने, किंवा इतर उपासनेने बांधून ठेवू पाहतात. पण जो मनुष्य त्या वासराप्रमाणे चराचरात हरि पाहतो, आणि हरिवर प्रेम करावे, तसे प्रेम सर्वांवर करतो, त्याला देव प्रसन्न होतो! त्या मनुष्याला काही न मागता, काही साधन न करता देव प्राप्त होतो.”

 -दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121