सूर्याची प्रदक्षिणा
“सुमित, आतापर्यंत पृथ्वीची प्रदक्षिणा पाहिली, त्यातले तुला ठळक ठळक काय आठवते?”, आबा म्हणाले.
"आपण पृथ्वीची elliptical कक्षा पहिली. त्या कक्षेचे स्वतः भोवती फिरणे पाहिले. आकुंचन - प्रसरण पाहिले. शिवाय पृथ्वीच्या अक्षाचे स्वतःभोवती फिरणे आणि डोलणे पाहिले. हे सगळं आपण अवकाशातून पहिले. What a mind boggling journey!", सुमित म्हणाला.
"आणि सुमित, या सर्वाचा पृथ्वीवरील वातावरणावर, तापमानावर, ऋतुचक्रावर, जीवमात्रांवर होणारा परिणाम पण पहिला. तेही महत्वाचे!", दुर्गाबाई म्हणाल्या.
"अरे वाह! सुमित चांगलच लक्षात आहे, आणि दुर्गाबाई तुम्ही माझे बोलणे लक्ष देऊन ऐकताय हा सुखद धक्का आहे!
"ते असो. तर आता आजच्या गोष्टीतला twist - पृथ्वी सूर्याभोवती गोल गोल फिरतच नाही मुळी!", आबांनी त्यांच्या style ने नाट्यमय वक्तव्य केले!
"काय आबा! आम्हाला रोज एक एक वेगळंच सांगता! पृथ्वीच्या कक्षेबद्दल इतके सगळं वदवून घेतलं माझ्याकडून, आणि आता असं म्हणता!", सुमित म्हणाला.
"तुमच्या त्या twists नी नुसते पिळून निघतोय आम्ही!", दुर्गाबाई वैतागून म्हणाल्या.
"गोष्ट कशी रंगायला हवी ना, दुर्गाबाई. थोडा twist हवाच, नाई का?
"या twist ने फार वाईट वाटून घेऊ नका. आपण आतापर्यंत जे पाहिलं ते अगदीच काही खोटं नाहीये. पण ते पूर्ण सत्यही नाही.
"आतापर्यंत आपण पृथ्वीचा प्रवास पहिला तो फक्त एका प्रतलात. आज आपण सूर्याच्या प्रवासाचा पण विचार करू. सूर्य स्वतः स्थिर नाही, तो स्वतः भोवती फिरतो. शिवाय barycenter भोवती फिरतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आकाशगंगेच्या केंद्रा भोवती फिरतो. सर्व ग्रह, त्या ग्रहांचे चंद्र, धूमकेतू, meteorites, दगड, धूळ असे सगळं सगळं लटांबर बरोबर घेऊन सूर्य अवकाशातून आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरतो.
"सूर्याचा प्रवास त्याला शोभावा असाच भव्य आहे! ताशी ८ लाख कि. मी. इतक्या प्रचंड वेगाने सूर्य प्रदक्षिणा घालतो. ही अतिविशाल प्रदक्षिणा पूर्ण करायला त्याला २३ कोटी वर्ष लागतात. सूर्याच्या आकाशगंगे भोवती आतापर्यंत २० एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आहेत.
"सुमित, किती आश्चर्य आहे पहा! दोन - अडीच हजार वर्ष जुन्या, सूर्य सिद्धांत मध्ये असे दिले आहे की सूर्य आकाशगंगेभोवती फिरतो असे लिहिले आहे.", आबा म्हणाले.
"आबा, मागे ही तुम्ही सूर्य सिद्धांतचा उल्लेख केला होता. काय आहे सूर्य सिद्धांत?", सुमितने विचारले.
"सुमित, सूर्य सिद्धांत हा ज्योतिष शास्त्र, म्हणजे astronomy वरचा एक प्राचीन ग्रंथ होता. त्या मध्ये - ग्रहणे, ग्रहणाचे भाकीत, पृथ्वीचे व इतर ग्रहांचे व्यास, कालमापन इत्यादी गोष्टींचा उहापोह केला होता. त्या मध्ये दिलेले पृथ्वी व ग्रहांचे व्यास हे आजच्या मापा इतके accurate आहे! मूळ ग्रंथ आता अस्तित्वात नाही. पण या ग्रंथावर वराहमिहीर, भास्कराचार्य आदींनी लिहिलेले ग्रंथ उपलब्ध आहेत.", आबा म्हणाले.
"आबा अडीच हजार वर्षांपूर्वी, आजच्या सारखे instruments नसतांना, इतका अभ्यास कसा केला असेल? खरोखर आश्चर्य आहे! बर, ते असो. हा जो सूर्याचा प्रवास आहे, त्याचा पृथ्वीच्या प्रवासावर काय परिणाम होतो?", सुमितने विचारले.
"आतापर्यंत आपण सूर्य स्थिर आहे असे धरून पृथ्वीचा सूर्या भोवती प्रवास पहिला. आता सूर्याचा प्रवास लक्षात घेतला असता, असे दिसते की पृथ्वीला सूर्याच्या मागे मागे पळत त्याला प्रदक्षिणा घालावी लागते. त्यामुळे पृथ्वीचा सूर्याभोवतीचे मार्ग ring सारखा न दिसता spring सारखा दिसतो. हा असा -
इतर ग्रह सुद्धा असेच सूर्याच्या मागे मागे त्याच्या भोवती फिरतात.
"Superb! हा solar system चा वेगळाच view आहे! आबा, हे कसे वाटते सांगू का? रेलवे मध्ये प्रवास करतांना जर मी शतपावली घातली, तर आत बसलेल्यांना फक्त इथल्या इथे फेऱ्या मारतोय असे दिसेल. पण रेलवेच्या बाहेरच्या लोकांना मी almost रेलवेच्या स्पीडने कधी थोडा fast तर कधी किंचित slow जातांना दिसेन! तसा हा ग्रहांचा सूर्याभोवतीचा प्रवास आहे.", सुमितने सार सांगितले.
"अगदी बरोबर सुमित! For all practical purposes, पृथ्वी सूर्याभोवती गोल गोलच फिरते! आता खूष?", आबा म्हणाले.