#Whatsapp Buddies...अॅण्ड आय एम सो अलोन...

    18-Nov-2016   
Total Views |

श्रद्धाच्या विविध व्हॉट्सएप ग्रुप्स वर :

अमित : Get well soon shradhha.. 

राघव : Hey shradhha get well soon...
आर्या : Take care shradhha... 
शाल्मली: लवकर बरी हो..
सुबोध : काळजी घे...

(इतक्यात श्रद्धाची मैत्रिण ऐशु चा फोन..)

ऐशु : अगं श्रद्धा काय ऐकतेय मी हे. कधी झाला एक्सीडेंट.??

श्रद्धा : झाले दोन दिवस.. तू तुझ्या ऑफिसच्या गडबडीत होतीस when i called you. सो राहुन गेलं गं सांगायचं.

ऐशु : आत्ता व्हॉट्सएप चेक केलं तर सगळीकडे 'गेट वेल सून श्रद्धा' असंच दिसतयं.. मग अनिकेत म्हटला मला असं झालं ते..

श्रद्धा : हो अगं ते झालं असं...

ऐशु : बरं बरी आहेस का आता?


श्रद्धा : हो म्हणजे डोक्याला लागलंय.. टाके घातलेत.. i know it is going to b painful.. असा विचित्र झाला ना एक्सीडेंट.. ते झालं असं..

ऐशु : बरं ऐक ना.. मी जरा घाईत आहे.. आरामात बोलूयात का नंतर.?

श्रद्धा : ओहह... सॉरी हान.. हो चालेल...

(उदासवाण्या चेहऱ्याने फोन ठेवते... फेसबुक ओपन करुन पोस्ट लिहायला सुरुवात करते...)

 

Shradhha darshney 
Feeling alone...

कधी कधी कसं होतं ना.. you badly want to talk to someone but no one is there.. तुमचा एक्सीडेंट कसा झाला हे सांगण्यासाठी.. तुम्हाला दुखतय हे सांगण्यासाठी... खूप त्रास होतोय का हे विचारुन घेण्यासाठी. आणि जस्ट बोलण्यासाठी... काल पासून गेट वेल सून चे मैसेजेस येतायेत पण एक्सीडेंट झाला कसा हे कुणीच नाही विचारलं.. no one asked is it paining or not... No one just came to meet me to see how i am... आधी आई-बाबा जरा जरी आजारी पडले की शेजारचे कुलकर्णी काका काकू, वरचे दाभोळकर आजोबा, कदम काका भेटून जायचे. आईच्या भिशी ग्रुपच्या मैत्रिणी, पोळ्या करणाऱ्या मावशी, बाबांचे ऑफिस फ्रेंड्स सगळे यायचे. Now i have 500 facebook friendz, 22 watsapp groups, 30 personal chats.. पण बोलण्याचा भेटण्याचा वेळ कुणालाही नाही...Still i am alone....

(तिच्या फेसबुक वर तासाभरात 270 लाईक्स आणि 32 कमेंट्स)


Atharva sonavne : very well written shradhha...

Raghav shastri : so truee yar.. get well soon.. i hope you are lil ok now..

Apoorva telang : agreed dear... GWS...

(फेसबुक चे लाईक्स वाढतच आहेत, कमेंट्सही, व्हॉट्सएप ग्रुपवर एक्सीडेंट बद्दल माहीत नसलेल्यांनीही गेट वेल सूनचे मैसेजेस केले....

आणि श्रद्धा अजूनही त्याच खोलीत बसून मित्र मैत्रीणींच्या फोनची आणि भेटीची वाट बघतेय.....)

-निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121