आकाशाशी जडले नाते - The God of Time

    16-Nov-2016   
Total Views |

The God of Time

"काय आबा! आजची गोष्ट कुठे रंगणार?", घरात पाऊल टाकताच सुमितने विचारले.

"सुम्या, गोष्ट सांगण्यासाठी दुर्गाबाई काही मला स्मशानात जाऊ देणार नाही. त्यामुळे इथेच बसून आपली गोष्ट करावी लागेल!" आबा म्हणाले.

"तुम्ही विक्रम - वेताळ असला तरी ते घरचे, तेवढं लक्षात ठेवा! जळलं मेलं ते गोष्टीचं bearing!" दुर्गाबाई त्राग्याने म्हणाल्या.

"अगं, खरं का जाणार आहे! तू परवानगी दिलीस तरी जाणार नाही, झालं! पण त्या बदल्यात एक फक्कड चहा मात्र करा!" आबांनी मांडवली केली.

"आबा, आज अशी आहे तरी कोणती गोष्ट?" सुमितने आबांना मुद्द्यावर आणले.

"आहा! आजची गोष्ट आहे उज्जैनच्या अजून एका astronomical मंदिराची.

“उज्जैनची खासियत अशी आहे की फार पूर्वी पासून उज्जैन हे विद्येचे माहेरघर होते, विद्याभ्यासाचे केंद्र होते. महाभारत काळी, शिप्रा नदीच्या काठावर, सांदिपनी ऋषींचा आश्रम होता. श्रीकृष्ण व बळीराम याच आश्रमात शिकले. वराहमिहिर, भास्कराचार्य व ब्रह्मगुप्त यांसारखे थोर गणिती व ज्योतिष विशारदांची कर्मभूमी, उज्जैन होती.

“वराहामिहीर बद्दल आपण मागे बोललोच आहोत. त्यामुळे आज भास्कराचार्य व ब्रह्मगुप्त बद्दल सांगतो.

“भास्कराचार्य उज्जैनच्या वेधशाळेचे प्रमुख होते. सिद्धांत-शिरोमणी या ग्रंथात – अंकगणित (लीलावती), बीजगणित, गोलगणित व ग्रहगणित याबद्दल सिद्धांत मांडले आहेत. शून्य, negative numbers, π ची किंमत, पायथागोरसचा सिद्धांत, quadratic equations, spherical trigonometry, calculus, ग्रहांचे वेग, ग्रहणाचे भाकीत, पृथ्वीचे अक्षांश व रेखांश, चंद्रकलांचा अभ्यास, या सर्व विषयांवर त्याने प्रचंड काम करून ठेवले.

“तर ब्रह्मगुप्तने अंकगणित, भूमिती, decimal numbering system यावर ब्रह्मस्फुटसिद्धांत हा ग्रंथ लिहिला. ब्रह्मगुप्ताने चंद्र सूर्यप्रकाशाने प्रकाशित होतो, चंद्र सूर्यापेक्षा जवळ आहे, सौऱ्य वर्षाची अचूक लांबी आदी गोष्टी सिद्ध केल्या होत्या. ८व्या शतकाच्या सुरवातीला अल-फाज़रीने या ग्रंथाचे अरेबिक मध्ये भाषांतर केले. १३व्या शतकात या अरेबिक ग्रंथाचे लॅटिन मध्ये भाषांतर झाले. आणि मग युरोप मध्ये decimal numbering system वापरात आली! अरबांनी ती system युरोप मध्ये नेल्यामुळे या system ला Arabic numbering system सुद्धा म्हणतात.

“अगदी अलीकडच्या काळात राजा जयसिंगने उज्जैन येथे यंत्र-मंत्र, अर्थात जंतर-मंतर ही वेधशाळा बांधली. या वेधशाळेत सम्राट यंत्र नावाचे मोठे Sun Dial आहे, ते अर्ध्या सेकंदा पर्यंत अचूकपणे वेळ सांगू शकते. शंकू यंत्र सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा दिवस, सूर्याची राशी इत्यादी दर्शवते. उत्तरायण व दक्षिणायन दाखवणारे नाडी वलय यंत्र आहे. व इतर अनेक यंत्र या वेधशाळेत आहेत.

“एकूण, फार पूर्वीपासून उज्जैन, उज्जैयिनी किंवा अवंतिका हे गणित, भूमिती, कालनिर्णय, पंचांग, ज्योतिर्विद्येच्या अभ्यासाचे केंद्र होते. It was a center for the study of Light & Time. आणि म्हणूनच अति प्राचीन काळापासून उज्जैन हे महाकालेश्वर शिवाचे स्थान आहे!”

“पण महाकालेश्वराचा आणि Light & Time काय संबंध आहे?" सुमितने विचारले.

“सांगतो! १२ ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर! ज्योतिर्लिंग म्हणजे infinite beam of light, अनादी अनंत असा प्रकाशस्तंभ. ब्रह्मा आणि विष्णूला सुद्धा त्याचा अंत लागला नाही असा प्रकाशस्तंभ ज्याचं प्रतीक आहे, तो महाकालेश्वर!

"महाकालेश्वराला रोज पहाटे भस्माचा अभिषेक होतो. पूर्वी अभिषेकाचे भस्म स्मशानातुन येत असे. आता गोवऱ्या जाळून तयार केलेले भस्म वापरतात. भस्म हे काळाच्या महिम्याचे प्रतीक आहे. जे काही अशाश्वत आहे, ते काळाच्या ओघात, शेवटी जळून भस्म होते. त्या काळाचा ईश्वर म्हणजे महाकालेश्वर!

“जेथे आकाशातील ज्योतींचा अभ्यास केला, त्या ज्योतींच्या साहाय्याने काळ मोजायच्या पद्धती विकसित केल्या, पंचांग निर्मिती केली, काळ मोजायची यंत्र स्थापन केली, तिथला देव म्हणजे महाकालेश्वर!

“म्हणूनच उज्जयिनीला जो ईश्वर प्रकट झाला, तो काळाचा ईश्वर आहे! The Great God of Time!”


 

 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121