सोनल : अद्वैत आज आपण भेटणार आहोत राईट!
अद्वैत : यप
सोनल : अरे यप काय? काही नीट उत्तर तर दे.
अद्वैत : हो भेटणार आहोत.
सोनल : इतकं कोरडं... शी बाबा.. जाऊ देत.. तुला ना काही इंट्रेस्टच राहिला नाहिये मला भेटण्यात
अद्वैत : सोना आता परत नको ना सुरु होऊस. भेटतोय म्हटलं ना..
सोनल. हम्म्म्म !! ठीक आहे.
( २ तासांनंतर )
प्रत्यक्ष भेट :
सोनल : अॅडी... वॉव कसलं भारी कॉफी शॉप आहे रे. मस्त.
अद्वैत : हम्म्म्म मला ही आवडतं.
सोनल : अरे आता आपण भेटलोय आता तरी तो मोबाईल बाजूला ठेव, आपण इथे गप्पा मारायला आलोय ना.
अद्वैत : अगं. इट्स इंपॉरटंट. कलीग्स सोबत पार्टी ठरतेय रात्री, ग्रुप वर त्याचच डिस्कर्शन सुरु आहे.
सोनल. : अरे पार्टी रात्री आहे ना! मग आता तरी माझ्या कडे लक्ष दे. मी नसणारे की नई रात्री. तेंव्हा याच कलीग्स सोबत असणार आहेस तू.
अद्वैत : सोना अगं किती कटकट करतेस तू. जस्ट वेट फॉर अ मिनिट यार.
सोनल : अद्वैत सी तू मला लास्ट इयर गिफ्ट केलेली बॅग आणलीये मी आज. भारी आहे ना.
अद्वैत : हम्म्म्म्म.
सोनल : कमीत कमी एकदा बॅग कडे बघ तरी.
अद्वैत : (एक नजर टाकून परत मोबाईल मध्ये..) हान छान आहे.
सोनल : अद्वैत अरे बोल ना माझ्याशी काही तरी..
अद्वैत : काय बोलू सोना.. रोज तर दिवस रात्र चॅट करतो आपण. वेगळं काय बोलणार. खाऊ पिऊ मजा करु.. बोलायचं काय त्यात.
सोनल : अरे मग भेटलो तरी का आपण? आणि आजकाल चॅट मध्ये हम्म्म्म आणि के, या शिवाय लिहितोस काय तू दूसरं?
अद्वैत : हम्म्म्म..
सोनल : कसला आहेस अरे तू. ऐक काय ऑर्डर करायचं? कोल्ड कॉफी का हॉट कॉफी?
अद्वैत : (पुन्हा मोबाईल मध्येच) तुला आवडेल ते.
सोनल : (हिरमुसून) मला नकोय काही.
अद्वैत : हम्म्म्म्म..
सोनल : अद्वैत आपण चॅट नाही करत आहोत. इथे तरी हे हम्म्म्म हम्म्म्म बास आता. इरिटेट होतय मला. नको आहे काही म्हणतेय मी ते ही रागवून.. तर तू आपला हम्म्म्म्म हम्म्म्म.. काय हे. मी चिडलेय हे पण सांगायचय मी आता.
अद्वैत : अगं! सोना बस दोनच मिनिट ना. झालच आहे.
सोनल : बर.
(१० मिनिट जराही संवाद नाही)
सोनल : अद्वैत मला वाटतं २ ची १० मिनिटं झाली आहे. आणि मी मूर्खा सारखी तुझ्या समोर वाट बघत बसलेय.
अद्वैत : मग ऑर्डर दे ना. वाट काय बघतेस?
सोनल : तुला एक तर कळत नाहीये किंवा ऐकायचं नाहीये ठीक आहे. मी निघाले. तू तुझ्या पार्टीची जागा, खाणं, पिणं, मित्र हेच करत बस. आणि हो ऑर्डर काय द्यायची ना आता ती रात्रीच दे तू पार्टीत.
बाय...
अद्वैत : सोना ए.. अगं ऐक तरी.. अगं थांब... सॉरी ना...
(मोबाईल हातात घेवून पाठमोऱ्या सोनल कडे बघत.....)
हे असंच झालयं ना आपलं. व्हर्चुअल जग, व्हर्चुअल संवाद इतका आवडायला लागलाय की समोर बसलेल्या माणसाशी बोलायला वेळही नाही. बर वेळ असला तरी बोलायचं काय ? आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्ति सोबत दिवस रात्र बोलले तरी काही ना काही शिल्लक रहायचच की आधी. पण आता? आता नाही तसं. एकमेकांसमोर असूनही आपण मोबाईल, व्हॉट्सअॅप मुळे तीसऱ्या व्यक्तितच जास्त रमलेलो असतो, नाही का?