नवी दिल्ली : (Raghav Chadha) देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत राघव चढ्ढा यांनी अखेर आम आदमी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांचा शेवट आता थेट राजकीय विभाजनात झाला असून, राजधानीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत या निर्णयाने खळबळ उडाली आहे.(Raghav Chadha)
पत्रकार परिषदेत चड्ढा यांनी ‘आप’वर थेट निशाणा साधत तीव्र शब्दांत टीका केली. “ज्या पक्षासाठी मी माझं तारुण्य दिलं, तो पक्ष आज आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटला आहे. देशहिताऐवजी वैयक्तिक स्वार्थ महत्त्वाचा झाला आहे,” असे ते म्हणाले. “मी योग्य व्यक्ती असूनही चुकीच्या पक्षात होतो,” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.(Raghav Chadha)
<!-- Inject Script Filtered -->
या राजकीय घडामोडीत आणखी मोठा ट्विस्ट म्हणजे चड्ढा यांच्यासोबत इतर खासदारांचाही मोठा गट बाहेर पडला आहे. संदीप पाठक, अशोक मित्तल यांच्यासह सहा राज्यसभा खासदारांनीही ‘आप’ला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदारांच्या पाठिंब्याने संविधानातील तरतुदींनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे ‘आप’च्या संघटनात्मक आणि संसदीय ताकदीला मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.(Raghav Chadha)
<!-- Inject Script Filtered -->
कोणते सहा खासदार राघव चढ्ढांसोबत 'आप'मधून बाहेर पडले?
१. हरभजनसिंग
२. स्वाती मालीवाल
३. विक्रमजीत सिंह सहनी
४. राजेंद्र गुप्ता
५. संदीप पाठक
६. अशोक मित्तल
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षनेतेपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळले आणि शाब्दिक चकमकी वाढल्या. त्यामुळे हा निर्णय अचानक नसून, मागील काही दिवसांपासून तयार होत असलेल्या तणावाचा परिपाक मानला जात आहे.(Raghav Chadha)
भाजपमध्ये प्रवेशाबाबत बोलताना चड्ढा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “देशाला मजबूत आर्थिक आणि सुरक्षा दिशा देणारे धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत,” असे ते म्हणाले. तसेच अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणे हे “भाग्य” असल्याचे त्यांनी नमूद केले. “माझा आवाज दाबला गेला, पण मी जनतेचे प्रश्न मांडणे थांबवणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी दिले.(Raghav Chadha)
या मोठ्या राजकीय धक्क्यानंतर ‘आप’नेही तात्काळ प्रतिक्रिया दिली. पक्षाचे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी चड्ढा आणि इतर खासदारांवर तीव्र टीका करत त्यांना “विश्वासघातकी” ठरवले.
“पक्षाने चड्ढा यांना आमदार आणि खासदार बनवले, पण अखेरीस ते भाजपच्या हाती लागले. त्यांनी पक्षाचा आणि पंजाबच्या जनतेचा विश्वासघात केला आहे,” असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
तसेच त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाहयांच्या नेतृत्वाखाली भाजप ‘ऑपरेशन लोटस’ राबवत आहे. हे हलक्या दर्जाचे राजकारण असून पंजाबमधील भगवंत मान यांच्या सरकारच्या चांगल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे,” असा दावा त्यांनी केला.
'आप’चे सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये जात आहेत, पंजाबच्या जनतेने ही नावे लक्षात ठेवावीत. जनता त्यांना कधीही विसरणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला
या संपूर्ण घडामोडींमुळे ‘आप’ला राज्यसभेत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भाजपची ताकद वाढण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय बदल निर्णायक ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.(Raghav Chadha)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.