पाकच्या पाठीशी चीन : मसूद अजहरविरोधातील प्रस्ताव रद्द
महा एमटीबी   14-Mar-2019
न्युयॉर्क : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासंबंधितील संयुक्त राष्ट्रात अखेर फेटाळण्यात आला. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता मात्र, चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळत पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे मदत केली.

सातत्याने भारताविरोधात कारवाया करणाऱ्या मसूद अजहरविरोधात
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यांनी २७ फेब्रुवारी रोजी 'अल कायदा निर्बंध समिती'च्या अंतर्गत अझरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला.

सुरक्षा परिषदेतील कायम पाच व हंगामी १० सदस्यांना कामकाजाच्या १० दिवसांमध्ये आक्षेप सादर करावा लागतो. ही मुदत भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर संपली. तोपर्यंत आक्षेप आला नाही
, तर संबंधित दहशतवादी हा जागतिक दहशतवादी ठरतो.

चीनने आत्तापर्यंत अझरला पाठिशी घातले. २००९
, २०१६ आणि २०१७ मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला. आताही चीनच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. बीजींगमध्ये चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लू कांग यांनी 'या मुद्द्यावर चीनने कायमच जबाबदार दृष्टिकोन मांडला आहे. नियमांनुसार, सर्व पक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्याची आवश्यकता आहे,' अशी भूमिका मांडली होती. यानंतर अपेक्षेनुसार चीनने या प्रस्तावात खोडा घातला.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat