अनिल कपूरच्या डायलॉगमुळे पोलीस बडतर्फ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



 
 
कल्याणा : अभिनेता अनिल कपूरचे डायलॉग म्हटले म्हणून एका पोलीसला चक्क आपली नोकरी गमवावी लागली आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘शूटआऊट अॅ वडाला’ या सिनेमामधील अनिल कपूरचा डायलॉग म्हटल्यामुळे एका पोलीस निरिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पाकिस्तानातील कल्याणा पोलीस स्टेशनमधील पोलीस निरिक्षक अरशद यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
 

दो वक्त की रोटी खाता हूं, पाच वक्त की नमाज पढता हू, इससे ज्यादा मेरी जरुरत नही और मुझे खरीदनेकी तेरी औकाद नहीहा डायलॉग अरशदने म्हटला होता. डायलॉग म्हणतानाचा अरशदचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. यानंतर पाकपतानचे पोलीस अधिकारी मारिक महमूद यांनी अशरदला नोकरीतून बडतर्फ केले. त्यामुळे ही डायलॉगबाजी अरशद यांना चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 
 
 
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये अशाचप्रकारामुळे एका पोलीसाला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच पाकिस्तानी एअरपोर्टवरील एका कर्मचारी महिलेला भारतीय गाणे गुणगुणल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. भारतातील सुप्रसिद्ध गायक गुरु रंधावा याचे ‘हाय रेटेड गबरु’ हे गाणे ती महिला कर्मचारी गुणगुणत होती. वर्दीत असताना अशरदने भारतीय अभिनेत्याचा डायलॉग म्हटल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. असे समोर आले आहे. भारतातील बॉलिवुड कलाकारांचे डायलॉग, भारतीय गाणी म्हटल्याने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या घटना पाकिस्तानात दिवसेंदिवस वाढत आहेत. यावरूनच पाकिस्तानच्या मनातील भारताविषयी असलेला द्वेष दिसून येतो.
 
  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@