भारतीय गाणे गायले म्हणून महिलेला शिक्षा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |




 

लाहोर : पाकिस्तानमध्ये एका महिलेने भारतीय गाणं गुणगुणल्यामुळे तिला दंड ठोठावण्यात आला आहे. पाकिस्तानातील एका विमानतळावर हा प्रकार घडला आहे. विमानतळावरील एका सुरक्षा कर्मचाऱ्याने या महिलेला भारतीय गाणे गुणगुणताना ऐकले. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली.

 

ही महिला विमानतळावरीलच एक कर्मचारी आहे. एएसएफने आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा म्हणून या महिलेचे वेतन दोन वर्षांसाठी थांबवले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिला कठोर शब्दांत खडसावण्यात आले आहे. भारतीय संगीताचे जगभरात चाहते आहेत. ही महिला भारतीय गायक गुरु रंधावा याचे ‘हाय रेटेड गबरू’ हे गाणे गुणगुणत आपला व्हिडिओ काढत होती. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पाकिस्तानी नागरिकांवर भारतामुळे कारवाई झाल्याची ही काही पहिलीच घटना नव्हे, तर यापूर्वी २०१६ मध्ये एका पाकिस्तानी नागरिकाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केल्यामुळे त्याला शिक्षा करण्यात आली होती. या पाकिस्तानी नागरिकाने क्रिकेटपटू विराट कोहलीचे कौतुक करण्यासाठी आपल्या घरात भारताचा तिरंगा लावला होता. त्यामुळे त्याला १० वर्षांसाठी शिक्षा सुनावण्यात आली होती.

 

घडलेल्या प्रकारावरून पाकिस्तानचा भारताविषयी असलेला द्वेष कायम आहे हे दिसून येते. त्यामुळे भारत-पाकिस्तान संबध भविष्यात सुधारण्याच्या शक्यातांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. भारताकडून नेहमीच शांततेचा संदेश दिला जातो. भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी भारत नेहमीच प्रयत्न करत आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@