पंतप्रधान मोदी सर्वात विश्वासू मित्र: शिंजो आंबे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Oct-2018
Total Views |


 


 

जपान: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वात विश्वासू मित्रांपैकी एक आहेत, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आंबे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या जपान दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान आंबे यांनी जपानच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, ' भारत एक जागतिक शक्तीच्या रुपाने समोर येत आहे. प्रशांत महासागर क्षेत्रात जपान भारताबरोबरील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी इच्छुक आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यानची बुलेट ट्रेन धावणारच असा विश्वास व्यक्त करत ज्यादिवशी ही ट्रेन धावेल तो दिवस भारत-जपान यांच्या मैत्रीतील नवे पर्व असेल.'

 

भारत आणि जपानच्या संबंधांवर पंतप्रधान आंबे हे पुढे म्हणाले की, ' नरेंद्र मोदी हे भारतातले सर्वोत्कृष्ठ नेता आहेत. जपान आणि भारताच्या संबंधातून जगाला खूप काही देण्याची क्षमता असल्याचे नरेंद्र मोदींचे मत आहे. जपान भारताचा आर्थिक विकास आणि पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना आपला पाठिंबा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही सर्व क्षेत्रात चांगल्या स्थितीत आहोत आणि जपान भारताची आर्थिक वृद्धी आणि जपानच्या सर्वोत्कृष्ट तंत्राचा वापर करत हायस्पीड रेल्वे, भूमिगत मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.'

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@