'असे' स्वागत होणारे मोदी पहिले पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2018
Total Views |


 


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक २८ व २९ ऑक्टोबर दरम्यान दोन दिवसाच्या जपान दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची भेट घेणार आहेत. मोदी त्यांच्या यामानाशी येथे असलेल्या खासगी हॉलिडे होममध्ये जेवणासाठी थांबणार आहेत. कोणत्याही विदेशी नेत्यासाठी आयोजित केलेला हा असा पहिला भोजन समारंभ असेल. मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत भारत-जपान यांच्या वार्षिक शिखर बैठकीत भाग घेतील.

 

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, "या दोन देशांमधली ही १३वी शिखर बैठक असेल. ही पाचवी अशी बैठक असेल ज्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा सहभाग असेल. जपानचे पंतप्रधान आबे हे मोदींना रविवारी रात्री खासगी भोजन कार्यक्रमासाठी त्यांच्या यामानाशी इथल्या निवास्थानी घेऊन जातील. त्यानंतर दोन्ही नेते रेल्वेने  टोकियोला जातील." पुढे त्यांनी असेही सांगितले की, "असे पहिल्यांदाच होत असेल की कोणता विदेशी नेता पंतप्रधान आबे यांच्या हॉलिडे होममध्ये आमंत्रित असेल."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@