पक्षीय राजकारणापेक्षा राजकीय विश्लेषक व्हायला आवडेल : सायली संजीव
‘काहे दिया परदेस’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा गाजलेल्या मराठी मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. पण, आज अभिनय क्षेत्रात मनस्वी रमणार्या सायलीने राज्यशास्त्राची पदवी घेतली असून, तिला पक्षीय राजकारणापेक्षा राजकीय विश्लेषक व्हायला आवडेल, असे ती आवर्जून सांगते. त्यानिमित्ताने पडद्यावर विविध भूमिकांमध्ये झळकणार्या सायलीबरोबर तिचा आजवरचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि राजकारणाची आवड याविषयीचा हा दिलखुलास संवाद...





