पार्वतीबाई आठवले म्हणजेच मावशींची ओळख फक्त महर्षी कर्वे यांची मेव्हणी म्हणून नव्हती, तसेच त्यांची ओळख ही केवळ आनंदीबाई (बाया) कर्वे यांची धाकटी बहीण एवढीच नव्हती, तर त्यांची ओळख एक थोर सामाजिक कार्यकर्ती, एक लेखिका म्हणून, १९१८ मध्ये निर्भीडपणे परदेशात एकटी जाऊन तिथे उत्तम व्याख्याती म्हणून नाव कमाविणारी, अनाथ व गरीब बालविधवा मुली व महिलांना मायेची ऊब देणार्या मावशी अशी होती. अण्णांच्या आश्रमात येणार्या प्रत्येक मुलीसाठी त्या एक आधारवड होत्या. त्यांचे पुण्यस्मरण...
Read More