मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
Read More
फक्त जन-धन योजना आणि उज्ज्वला योजना यांचा थेट लाभ जवळपास ८० कोटींपेक्षा जास्त भारतीयांना एकत्रितपणे झालेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात थेट लाभार्थींचे जीवनमान उंचावले आहे, हा एक जागतिक विक्रम असेल. त्यानिमित्ताने गेल्या दहा वर्षांतील मोदी सरकारने यशस्वीपणे राबविलेल्या आणि भारतीयांचे जीवनमान उंचावणार्या काही महत्त्वाच्या योजनांचा धांडोळा घेणारा हा लेख...
अंत्योदय विरुद्ध घराणेशाही, दंगल विरुद्ध शांतता, एक जिल्हा-एक उत्पादन विरुद्ध एक जिल्हा-एक माफिया, जातिद्वेष विरुद्ध प्रबोधन, गुन्हेगारीकरण विरुद्ध आधुनिकीकरण, विकास विरुद्ध विनाश, समाधान विरुद्ध तुष्टीकरण आणि सार्वजनिक कल्याण विरुद्ध स्वार्थकारण, असे उत्तर प्रदेशमधील यंदाच्या निवडणुकीचे चित्र. त्यामध्ये केंद्रस्थानी आहेत; अर्थातच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ!
मागील दशकात लोककल्याणकारी ‘मोदीनॉमिक्स’च्या माध्यमातून ‘अंत्योदय’ अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि सरकारी मदत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या याचं प्रयत्नांची फलश्रुती आता दिसून येते. मागच्या दशकात देशातील गरिबीत घट होऊन नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याची माहिती ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालया’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आली. त्यानिमित्ताने...
मुंबईतील डी.एच.गोखले आणि शामला गोखले न्यासाच्या निधीतून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठित असा ‘अंत्योदय पुरस्कार’ यंदा ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून एका प्रकट समारंभात हा पुरस्कार सदाशिव चव्हाण यांना प्रदान करण्यात येईल.
देवेंद्र फडणवीसांनी काल विधिमंडळात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे ‘अंत्योदया’चे पंचामृतच! केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांना पूरक, राज्याच्या सर्वांगीण विकासाला समर्पित, सर्व जातीधर्म-व्यवसायांना सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक, संतुलित अर्थसंकल्प निश्चितच महाराष्ट्राचा भाग्योदय करणारा ठरेल.
प्रत्येक गावात ‘कोऑपरेटिव्ह‘ संलग्न करून ‘सहकारातून समृद्धी‘च्या मंत्रासह प्रत्येक गावाला समृद्ध करणं, ही सहकाराची मुख्य भूमिका आहे. सत्तारूढ सरकारचे धोरण हे दीनदयाळ उपाध्याय यांच्या या कल्पनेनुरूप आहे. शहरासमवेत सरकार ग्रामीण क्षेत्रात सहकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलत आहे. दुग्धोत्पादन, खते तसेच बँकिंगसारख्या क्षेत्रांत सहकाराच्या यशानंतर आता सरकार सर्व क्षेत्रांत हे लागू करण्यासाठी पुढाकार घेते आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय शैलीवर पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदया’च्या तत्वज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव आहे. ‘अंत्योदया’मध्ये कोठेही आक्रमकता नाही, जबरदस्ती नाही आणि हिंसाही नाही. त्यामुळेच गरीब कल्याणाचा दावा करणार्या कम्युनिस्ट तत्त्वज्ञानापेक्षाही मोठे सामर्थ्य ‘एकात्म मानवतावाद’ आणि ‘अंत्योदया’त आहे. ‘अंत्योदया’चे प्रतिबिंब गेल्या आठ वर्षांत सरकारी धोरणांमध्ये आणण्याचे श्रेय निश्चितच पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल.
मोदी सरकारच्या आजवरच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात महिला विकास आणि सक्षमीकरणाची अनेकविध योजना, धोरणे राबविली गेली. त्याचा निश्चितच लाभ अगदी ग्रामीण भागातील महिलांपासून ते शहरी भागातील स्त्रियांनाही झालेला दिसतो. त्यानिमित्ताने मोदी सरकारच्या काळातील अशा विविध महिला सक्षमीकरणाच्या योजना आणि त्यांचे सकारात्मक परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
तृणमूलच्या हिंसक राजकारणास चंदनांच्या विजयाने चोख प्रत्युत्तर मिळाले आहे
एनडीएच्या जाहीरनाम्यात किमान वेतनाची तरतूद