( BJYM Mumbai ) BJYM मुंबईचे अध्यक्ष श्री तजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आज BJYM मुंबईच्या प्रतिनिधी मंडळाने DCP झोन ९ श्री निमित गोयल यांची भेट घेतली आणि Why Loiter Campaign विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली.
Read More
( Navi Mumbai Airport connectivity ) ‘सिडको’ आणि ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ (एनएचएआय) यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलामुळे आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
( mumbai BEST Fare hike ) बेस्टला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तिकीटाच्या दरात वाढ केली आहे. बेस्टच्या तिकीट दरात दुपटीने वाढ करण्याच्या निर्णयास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली असून ही दरवाढ गुरुवार,दि. ८ मेपासून लागू होणार आहे. बेस्ट प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढून याची माहिती दिली आहे.
( Metro 3 & mumbai BEST connectivity ) मुंबई मेट्रो-३ कुलाबा-बीकेसी-आरेच्या दुसऱ्या टप्प्याची सेवा लवकरच सुरू होणार असून, या मार्गाला अंतिम टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट(बेस्ट)ने ३२ बस मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
( Navi Mumbai Municipal Corporation officers employees are taking online advantage of the knowledge from Tech Wari ) महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा अभिनव उपक्रम दि. ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंविकास घडवित विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पा
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे दादर चौपाटी बंद करण्यात आल्याची खोटी माहिती व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर पसरवल्या जात आहेत तर याबाबत मुंबई पोलिसांनी X च्या माध्यमातून सहास्पष्टीकरण दिले आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असता, मुंबईतील नालेसफाईची कामे कुर्मगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात सव्वा महिन्यात केवळ १० टक्के नालेसफाई झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra #maharashtra_desha #ganpatibappamorya #ganpatibappa #bappamorya #ganpati #ganapati #bappa #morya #ganesh #mum_ganpati #bappa_maza #ganpati_bappa_morya #ganpativisarjan #siddhivinayak #siddhivinayaktemple #siddhivinayakmandir #siddhivinayakonline
कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने प्
(Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील घेऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं, या सगळ्याचा सर
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी खारघर व्हॅली गोल्फ कोर्स (केव्हीजीसी) येथील ड्रायव्हिंग रेंज जनतेसाठी खुली केली. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गोल्फ कोर्सची पाहणी केली.
वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.
राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात ११ वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील दोन राजधान्यांना जोडणारी असेल. सद्यस्थितीत राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर,नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या ११ महत्त्वाच्या मार
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, आपल्या गीतांच्या माध्यमातून लोकमानस जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शांताबाई साठे यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवार दि. ४मे रोजी कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बोरिवली येथील महापालिकेच्या दौलतनगर स्माशनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी मुंबईत जागतिक थीम पार्कबाबत राज्य शासन सकारात्मक असून नवी मुंबईत निर्माण होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २ मे रोजी केले.
(Survey tribal villages in Mumbai suburbs) आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, याचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याचा अहवाल दि. 30 मे रोजीपर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी दिले.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत परदेशी विद्यापीठांना देशामत त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युकेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २ मे रोजी केली.
कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीच्यावतीने गुरुवार, दि.१ मे महाराष्ट्र दिन अणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या ११ इमारतींना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत.गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलतील ११ इमारतीना ११ गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे, अशी माहिती कोनगाव, पनवेल गिरणी कामगार संकुल एकता
राज्यातील शिक्षण क्षेत्राला मोठा हातभार लावत, दोन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे — द युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके) आणि द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (UWA) यांनी नवी मुंबई एज्युसिटीमध्ये कॅम्पसेस स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoUs) केले आहेत. हा स्वाक्षरी समारंभ दिनांक २ मे २०२५ रोजी वेव्ह्ज २०२५ समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
(WAVES 2025 - Rajinikanth praises PM Modi) 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फायटर आहेत. ते सध्या सुरू असलेल्या परिस्थितीशी लढतील. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करतील', असा विश्वास सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सुरू असलेल्या चार दिवसीय जागतिक जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) ते बोलत होते.
( great opportunity that brings the world together Jackie Shroff WAVES 2025 grand launch in Mumbai ) जगभरातील कलात्मक सहकार्याला चालना देणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट वेव्स २०२५ चा शानदार शुभारंभ गुरुवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाला. उद्घाटनाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी उपस्थिती लावून या समिटचे महत्त्व अधोरेखित केले.
भारतात पहिल्यांदाच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे, अशी माहिती रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी दिली.
विवेक फणसाळकर यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. संजयकुमार वर्मा, सदानंद दाते, रितेश कुमार, अर्चना त्यागी, देवेन भारती आणि अमिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी देवेन भारती यांच्या गळ्यात माळ आयुक्तपदाची माळ पडली. डॅशिंग आयपीएस अधिकारी, अशी त्यांची ओळख. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कुख्यात दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कणा मोड
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
Elphinstone Bridge Parel Mumbai ( Elphinstone Bridge Parel Mumbai ) “मुंबईतील प्रभादेवी येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणीत परिसरातील १९ इमारती प्रभावित होत आहेत. या प्रभावित इमारतींचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’ करणार असून या १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार आहेत,” अशी माहिती मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय पोलीस सेवेतील १९९४च्या तुकडीचे डॅशिंग अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती यांना मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.
मुंबई भाजपातर्फे दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १०६ मंडलांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
३५ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आयुक्तपदासाठी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासनाचा आदेश जारी करण्यात आला असून उद्या म्हणजे गुरुवार दि. १ मे रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
( Vishwa Hindu Parishad morcha on Mumbai Police Commissionerate today ) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणार्या कारवाईच्या निषेधार्थ ‘विश्व हिंदू परिषदे’चा मोर्चा मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी 3 वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ‘विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांताचे प्र
दाटीवाटीची वस्ती, गॅस सिलेंडर सारख्या ज्वलनशील पदार्थांची अवैध रीतीने केलेली साठवणूक, बेकायदेशीर झोपड्यांची उभारणी आणि इतर कारणांमुळे गेल्या काही वर्षांत धारावीत आगीच्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. धारावीतील निसर्ग उद्यानाजवळ गेल्या महिन्यात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटाने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे वाढत्या दुर्घटना आणि दुसरीकडे दाट वस्तीमुळे अग्निशमन दलाला बचावकार्यात येणारे अडथळे अशा दुहेरी कात्रीत सापडलेले स्थानिक रहिवाशी यामुळे धास्तावले आहेत.
सिडकोतर्फे उत्तर नवी मुंबईतील तुर्भे ते दक्षिण नवी मुंबईतील खारघर नोडला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.तसेच खारघर नवी मुंबईतील एक अग्रगण्य निवासी नोड असून याभागात सिडकोच्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचे काम सुरु आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी खारघर तुर्भे टनेल लिंक रोड व खारघर येथील सिडको गृहनिर्माण योजना या प्रकल्पांना भेट दिली. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल तसेच सिडकोचे सह
( Special precautions in Mumbai after Pahalgam attack ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. “मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे,” अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.
(IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Independent authority in Mumbai for Last Mile Connectivity “मुंबईत नागरिकांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत “यासाठी ‘एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण’ (युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी) स्थापन करावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दि. १ ते ४ मे २०२५ दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे दि. १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
महारेराच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारदाराला व्याजाची तसेच घराची रक्कम परत न करणाऱ्या विकासकांविरोधात वसुली आदेश (रिकव्हरी वॉरंट) जारी करण्यात आले आहेत. मात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत वसुली वेगात होत नसून आजही तब्बल ६८९.९८ कोटी रुपयांची थकीत वसूली आहे.
अधिकाधिक कार्यकर्त्यांना संघटनात्मक पदांवर सामावून घेऊन पक्षविस्तार मोहिमेला बळकटी देण्यासाठी मुंबई भाजपने अधिकारांचे विक्रेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या रचनेनुसार, मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी याबाबतची यादी जाहीर केली.
Navi Mumbai Metro City वेगाने विस्तारणार्या नवी मुंबईतील वाढत्या गर्दीचे नियोजन आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी, राज्य सरकारने बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर मेट्रो मार्गाची प्राधान्याने अंमलबजावणी केली व त्यासाठी ‘सिडको’ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. ‘सिडको’तर्फे एकूण 25 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजित असून, यांपैकी पहिल्या टप्प्यातील सीबीडी-बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग-1 नोव्हेंबर 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला.
( Elphinstone Bridge closed ) शहराच्या मध्यवर्ती भागातील 125 वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर गुरुवार, दि. 24 रोजी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
‘डीप क्लीन ड्राईव्ह’ अभियानांतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा आदींच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. त्यानंतर आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.
दहशतवाद्यांना मदत करणारे हात भारतातमध्ये आहेत. तेच भारत क्रिकेट हरल्यावर किंवा पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके वाजवत असतात. मात्र, आता हे पाकिस्तानप्रेम चालणार नाही. पहलगाममध्ये भारतीयांना हिंदू असल्याने ठार मारले. दहशतवादी आपल्या दारात आहेत, तेव्हा घरात घुसतील, याचा नेम नाही. त्यामुळे एकसंघ राहा. पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणार्यांना थारा देऊ नका,” असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.
“सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी
मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ’टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
शहराच्या मध्यवर्ती भागातील १२५ वर्षे जुना एलफिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर काल रात्री शुक्रवार, दि.२४ रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये काही ठिकाणी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर ७ मार्ग ‘नो पार्किंग’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.