( good response in America to Wada Chirebandi marathi play ) प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत.
Read More
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रसिद्ध चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे यांच्या नवनिर्मित चित्रकृतींच्या प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनात त्यांनी धोत्रे यांच्या विविध कलाकृतींचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या अप्रतिम चित्रशैलीला दाद दिली.
मुंबई : लव फिल्म्सचा पहिला मराठी चित्रपट ‘देवमाणूस’, नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून उत्कट कथानकाने, उत्कृष्ट अभिनयाने, नेत्रदीपक दृश्यांनी आणि लोकप्रिय संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सर्वत्र यशस्वी कामगिरी केली आहे.
गेल्या २३ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं ‘सही रे सही’ हे नाटक आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. मराठमोळ्या हास्यनायक भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाने सजलेलं हे नाटक आजवर ४ हजारांहून अधिक प्रयोग गाठून रंगभूमीवरचा विक्रम प्रस्थापित करत आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच या नाटकाबाबत एक अत्यंत मोलाचं विधान केलं आहे. “सही रे सही कधी बंद होणार?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर भरत जाधवप्रेमींसाठी अत्यंत भावनिक ठरणारं आहे.
सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज असून या प्रमोशनल साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्
मराठी रंगभूमीवरचा एक अविस्मरणीय ठेवा पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येत आहे. निमित्त आहे पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि त्यांच्या पत्नी, लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष. या खास पर्वावर सादर होणाऱ्या नव्या प्रयोगात ‘बेबीराजे’ ही महत्त्वाची भूमिका साकारतेय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर.
"कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष
interview with Shantanu Dalal who provides free guidance through Marathi Naukri नोकरी मिळवणे, नोकर्यांच्या स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे, नोकर्यांच्या या अफाट बाजारात आपल्यासाठी योग्य नोकरी शोधणे, हे आजच्या युगात आव्हानात्मकच. त्यात विशेषत: ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी वणवण फिरणार्यांना याबाबत फारशी कल्पना नसते. मराठी मुलांची हीच अडचण लक्षात घेऊन, मराठी मुलांना नोकर्यांची माहिती देणारे, तसेच नोकरी मिळण्यायोग्य बनवण्यासाठी ‘मराठी नोकरी’च्या माध्यमातून नि:शुल्क मार्गदर्शन करणार्या शंतनु दलाल यांची ही
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्
लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने 'देवमाणूस' मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले असून त्यांच्या या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, या चित्रपटातील नवीन रोमँटिक गीत 'सोबती' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मैत्रीला अर्पण केलेले हे हृदयस्पर्शी गीत आहे. 'सोबती' हे या चित्रपटातील तिसरे गाणे असून, याआधी 'पांडुरंग' या भावस्पर्शी गाण्याने आणि 'आलेच मी' झगमगत्या लावणीने रसिकांची मने जिंकली आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी आहे. फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' हे तीन चित्रपट अधिकृत निवडीस पात्र ठरले आहेत, तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची खास निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय घोषणेची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून अनेकांकडून याला विरोध करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
ratri 2 vajun 22 mintani marathi natak भय आणि वास्तव या दोन्हींची सांगड घालणार्या ’रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी’ या नाटकाच्या निमित्ताने...
मराठी भाषेबद्दल कुणीचीही तडजोड नाही. पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १९ एप्रिल रोजी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते भाषेवरून वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आले. परंतू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला आहे. यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम कीर्तनकारांचा शोध घेणाऱ्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय शो ची भुरळ अगदी सेलेब्रिटीनांही पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतीच या मंचावर उपस्थिती लावली. महेश मांजरेकर यांनी या शोसाठी खास धोतर-कुर्ता असा पोशाख परिधान केला होता. अशा प्रकारचा शो करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून, सोनीने आणलेल्या अनोख्या संकल्पनेला त्यांनी मनापासून दाद दिली.
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहेच. परंतू, हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषादेखील शिकू शकतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिली.
( marathi in school ) ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. शिक्षण विभागाने या तक्रारींची तत्काळ दखल घेत, विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मानवी मन हे एक अलौकिक अस्तित्व आहे. त्याचे लौकिक जीवनाशी असलेले नाते अनेकदा इतके गूढ असते की त्याची व्याप्ती आपणास खोलवर जाणवते. माणसाचे मन हे प्रत्येक नात्याच्या, प्रत्येक भावनिक क्षणाच्या केंद्रस्थानी असते. नात्यांमध्ये जे परस्पर आकर्षण किंवा दुरावा निर्माण होतो, तो प्रत्यक्षात मनाच्या स्थितीवर आणि त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. हेच गूढ आणि गुंफण व्यक्त करतोय निर्झरा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'नाते मनाचे' हा चित्रपट.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात दिवंगत लेखक, पत्रकार जयवंत दळवी यांच्या साहित्याचा स्मृतीजागर पार पडला. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात जयवंत दळवी यांच्या साहित्याच्याअभिवाचनचा कार्यक्रम संपन्न झाला. दिग्गज लेखक तथा नाट्यकर्मींच्या उपस्थिती मध्ये हा साहित्य सोहळा संपन्न झाला.
मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
दि. १८ एप्रिल रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात ज्ञानेश्वरांसह त्यांच्या भावंडाना त्रास देणार्या विसोबा खेचर यांची भूमिका अभिनेते योगेश सोमण यांनी साकारली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाबरोबरच, सावरकरांवरील वेबसीरिज, ओटीटी माध्यमांविषयी योगेश सोमण यांची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने जाणून घेतली.
यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करता यावा, यासाठी मे महिन्यात सगळ्यांच्या मनाला थंडावा देणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट दि. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते आणि विनोदवीर समीर चौघुले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही दिलखुलास बातचीत...
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
वास्तविक जीवनावर आधारित झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट 'आता थांबायचं नाय!' च दमदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला !
मराठी रंगभूमीवरील एक आगळावेगळा आणि मनाला भिडणारा प्रयोग, ‘पत्रापत्री’, आपला सुवर्ण सोहळा साजरा करत आहे! ६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वा. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या नाटकाचा ५०वा प्रयोग सादर होणार आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून, रसिक प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते देविदास सौदागर यांच्या बहुचर्चीत कादंबरीचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देविदास सौदागर यांच्या 'उसवण' कादंबरीला २०२४ सालचा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एका शिंप्याची गोष्ट सांगणारी ही कादंबरी अल्पवधितच लोकप्रिय ठरली.
नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक रंगभूमी दिना’चे औचित्य साधत, अभिनेता सुयश टिळकशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने विशेष संवाद साधला. अभिनयाच्या प्रवासात रंगभूमीचे योगदान, आणि नाट्यसृष्टीतील स्थित्यंतरे याविषयी आणि सुयशशी केलेली ही दिलखुलास बातचीत...
महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित ‘आता थांबायचं नाय' हा नवा मराठी चित्रपट १ मे पासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महिलादिनी झी स्टुडिओज, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. आता ह्याच सिनेमाचं मनाला भिडणारं शीर्षक गीत ‘आता थांबायचं नाय’ प्रदर्शित झालंय. हे गाणं, असं सेलिब्रेशन आहे जे जीवनाच्या नवीन प्रवासाचा, उंच भरारी घेण्याचा, नवे स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेला ध्यासाचा आनंद व्यक्त करते
मुंबई : प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला, पण सर्वांंना प्रेम सहज मिळत नाही. अशीच एक अभूतपूर्व प्रेम कथा येत्या ९ मे २०२५ ला आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पद्माराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" हा नवा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. ह्याच चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित झालाय.
मुंबई : ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'जयभीम पँथर – एक संघर्ष' या चित्रपटाचं म्युझिक लाँच नुकतेच करण्यात आलं. याप्रसंगी निर्माते भदंत शीलबोधी थेरो, भिक्खू संघ, मा भीमराव आंबेडकर साहेब, सिद्धार्थ कासारे, मा. सागर संसारे, मिलिंद शिवशरण, संजय भाऊ खंडागळे चित्रपटातील कलाकार आणि प्रोजेक्ट हेड संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील, कलादिग्दर्शक प्रकाश सिंगारे आवर्जून उपस्थित होते.अत्यंत संवेदनशील आणि दमदार गाणी या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.
मुंबई : 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ सहभागींसह, सुरु होणारा हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या रिअॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनाव
मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या हटके विनोदशैलीने लोकप्रिय झालेली अभिनेत्री नम्रता संभेराव ही केवळ हास्यकलाकार नाही, तर ती एक संवेदनशील अभिनेत्री देखील आहे. नुकत्याच झालेल्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात तिने आपल्या मुलासोबत घडलेला एक खास प्रसंग शेअर केला, ज्याने तिच्या अभिनयाच्या ताकदीची जाणीव तिला झाली.
कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील शोवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगात्मक गाणी सादर केली होती. या प्रकारानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तोडफोड केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल केले आहेत.
प्रेम, नातेसंबंध आणि हास्याचा सुरेख संगम साधणारा ‘हार्दिक शुभेच्छा’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. चित्रपटाची सुरुवातच मुळी एका मजेशीर ‘व्हॉईस ओव्हर’ने होते, जो लगेचच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. माधव (पुष्कर जोग) हा एक सरळसोट, प्रेमाच्या शोधात असलेला तरुण. त्याच्या पालकांनी त्याच्या लग्नाची जबाबदारी उचलली असून, सतत नव्या मुलींचे फोटो ते त्याला पाठवत असतात. पण, माधवला त्याच्या मनासारखी मुलगी काही पसंत पडत नाही. त्याचा मित्र रवी (पृथ्वीक प्रताप) त्याला सतत प्रोत्साहन दे
मुंबई : दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे. वेगवेगळ्या शोज, मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले. मात्र आता ही जोडी एक वेगळा जॉनर घेऊन मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडगोळीची अनोखी जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका अस
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार यशस्वी ठरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत हा ऐतिहासिक सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. रिलीजनंतर ३५ दिवसांनंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जोरदार सुरू असून, कमाईचे विक्रम मोडत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. संभाजी महाराजांना औरंगजेबाने दिलेल्या अत्याचारांचे चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आले असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरू असताना अभिनेता किरण माने यांनी एक ठाम भूमिका घेतली आहे. किरण माने यांनी एका पोस्टमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचे आरोप करणाऱ्यांच्या स्मारकांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : मराठी कलाकार मराठी चित्रपटसृष्टी सोबतच, बॉलीवूड आणि टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसतात. अश्यातच मराठमोळी अभिनेत्री प्रांजली कंझारकरने 'डॉली - स्टोरी ऑफ अ वॉरीअर' या तेलुगू चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती बॉक्सरच्या भूमिकेत आहे. डॉली या चित्रपटाचे दिग्दर्शक के के किरण कुमार दुर्गा असून कथा - संवाद ही त्यांनीच लिहीली आहे. या चित्रपटाची निर्मिती के क्रांथी यांनी केली असून संगीत माही कोंडेती यांचे आहे. अभिनेत्री प्रांजली कंझारकर आणि अभिनेता के के किरण कुमार द
‘अंजू उडाली भुर्र’ या बालनाट्याचा तालमीचा मुहूर्त नुकताच झाला. श्री अशोक पावसकर आणि सौ चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने ‘अंजू उडाली भुर्र’ हे एक भव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य नरेंद्र बल्लाळ लिखित हे नाटक ५५ वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालं होतं.त्या वेळी आताच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ईला भाटे ह्यांन
भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संत मुक्ताईची भूमिका ती साकारणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची उत्
ठाकूर की देव? जुहू येथे स्थायिक होणारे पहिले मराठी स्टार कोण? सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या आयुष्याचा हा खास आढावा! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जाणून घेऊया या व्हिडीओत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सोमवारी माटुंगा यशवंत नाट्यसंकुल येथे झालेल्या नियामक मंडळीच्या बैठकीमध्ये कामाच्या तणावामुळे नाट्य परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, मात्र बैठकीमध्ये हा राजीनामा नामंजुर झाल्याने त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. नाट्य परिषदेमधील वादामुळे हे राजीनामा नाट्य घडल्याची कुजबूज असली तरी दामले यांनी राजीनाम्यासाठी कोणतेही वाद कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.
बिग बॉस मराठी सिझन ५ च्या विनर ट्रॉफीवर सूरज चव्हाण ने आपलं नाव कोरलं आहे. सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आणि आता पुन्हा एकदा तो आपला जलवा दाखवायला सज्ज आहे. सूरज चव्हाण लवकरच "झापुक झुपूक" ह्या त्याच्या पहिल्या मराठी सिनेमात दिसणार आहे आणि आज जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" चा धमाकेदार टिझर प्रदर्शित झालाय.
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम केवळ पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही आपल्या भारतीय ओळखीचा अभिमान बाळगतो. सध्या आपल्या नवीन चित्रपट द डिप्लोमॅटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जॉनने भारतातील सुरक्षितता, धर्म आणि राजकारण याविषयी मत व्यक्त केले.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंग नेहमीच आपल्या अनोख्या स्टाइल आणि दमदार गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली असून, त्याचा चाहता वर्ग संपूर्ण देशभर पसरलेला आहे. मात्र, सध्या हनी सिंग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मराठीत संवाद साधताना आणि मराठी गाणं गाताना दिसत आहे!
पुणे महापालिकेच्या नाट्यगृह आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या 'रंगयात्रा' या ऑनलाइन ॲप्लिकेशनला नाट्यनिर्माते, रंगकर्मी, तंत्रज्ञ आणि विविध सांस्कृतिक संस्थांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते आणि राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही सहभाग घेतला.