उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. अटकेत असलेल्या देवप्रकाश मधुकर याचे राजकीय पक्षांसोबत लागेबांधे असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
Read More
“मी निरपराध आहे. ती घटना घडली, त्यावेळी मी तिथे नव्हतो. मी गेल्यानंतर काही समाजविघातक शक्तींनी हे हत्याकांड घडवले,” असे नारायण साकार हरी उर्फ सुरज पाल जाटव याने म्हटले, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याआधीच म्हणाले की, “ही घटना आहे की षड्यंत्र याची पूर्ण चौकशी होईल. गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच.” त्यानिमित्ताने हाथरसच्या त्या दुर्दैवी घटनेनंतरचे वास्तव मांडणारा हा लेख...
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये नारायण साकार हरीच्या प्रवचनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणी प्रशासनाने एका आयोजकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, ज्यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, त्या स्वयंघोषित गुरूच्या शोधात छापेमारी सुरू आहे. या घटनेतील मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बुधवार, दि. ३ जुलै २०२४ हाथरसला जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.
२०२० साली १९ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने हादरलेले हाथरस, परवाच्या चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर पुन्हा आक्रोशात बुडाले. चेंगराचेंगरीच्या या प्रकरणात त्या सत्संगाचा आयोजक भोलेबाबा गजाआड होईलच. पोलीस, प्रशासकीय व्यवस्थेतही कदाचित निलंबनाच्या कारवाया होतील. पण, यापूर्वीच्या अशाच घटनांमधून आपण कोणताही बोध घेतलेला नाही, हेच या प्रकरणावरून सिद्ध होते.