आयपीएलच्या रंगतदार सामन्यात १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने केवळ ३८ चेंडूंमध्ये झंझावाती १०१ धावा करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या दमदार खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.
Read More
एका वैज्ञानिक शोधाने आपल्याला झालेले आश्चर्य कमी व्हायच्या आधीच दुसरा एखादा वैज्ञानिक शोध लागलेला असतो, इतक्या वेगाने विज्ञान सध्या प्रगती करत आहे. मानवी जीवनाचे तर प्रत्येक अंगच विज्ञानाने व्यापले आहे. विज्ञानाच्या आपल्या जीवनावरील याच प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी, काल जगभरात ‘जागतिक विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला.
भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे. एक्स समाजमाध्यमावर श्री बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना त्यांनी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी व अर्थमंत्री मा.निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक विश्वसनीय आणि अभ्यासपूर्ण नाव म्हणजे दीपक राजा. दीपक राजांचा संगीताच्या नोट्स लिहिण्यापासून सुरू झालेला प्रवास थोडक्यात जाणून घेऊया...
भारतातील ७० टक्के विवाहित जोडपी जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्रासलेली असून झोपेच्या चक्रात त्यांच्या जोडीदारांनी किमान एकदा तरी झोपमोड केली असल्याचे जागतिक निद्रा दिनानिमित्त सेन्चुरी मॅट्रेसेसने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे ३२ टक्के विवाहित जोडप्यांना वाटते की, त्यांच्या जोडीदाराचे घोरणे हे मोटरसायकलच्या आवाजासारखे असल्याचे सांगतात. भारतीय झोपेच्या गुणवत्तेला किती महत्त्व देतात याचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
राष्ट्रीय शिक्षण संस्थाचा दि. 3 जुलै रोजी शताब्दी सोहळा साजरा करत आहे. 100 वर्षांपूर्वी मनमाडसारख्या कामगार वस्तीच्या गावात शाळा सुरू करणे, हे एक आव्हानच होते आणि विपरित परिस्थितीतदेखील हे आव्हान रावसाहेब यांनी लीलया पेलले व शाळेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा करंदीकरांसारखे सारस्वत विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. ज्ञानदानाची सदावर्ते घालणार्या या संस्थेने पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम नि:स्वार्थपणे केले आहे, त्याविषयी...
खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार १५ मे ला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे.
गेल्या आठ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या स्थापनेची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे, याच काळात भाजपने राज्यसभेत आपल्या सदस्यांची संख्येची शंभरीही पार केली आहे. त्यामुळे आता महत्त्वाची विधेयके संमत करून घेणे अधिक सोपे होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अर्थव्यवस्थेबद्दल महत्वपूर्ण विधान केले आहे. भारत हा आर्थिक सुधारणांच्या जवळ आहे. वित्तीय संस्थांकडे आवश्यक निधी आहे, असेही ते म्हणाले. माजी नोकरशाह वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंह यांच्या ‘पोट्रेट्स ऑफ पावर – हाफ ए सेंच्युरी ऑफ बिंग एट रिंगाईड’च्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यावरील केमिकल लॅबमध्ये स्फोट
ज्या वयात मुले मोबाईलमधील गेम्स खेळण्यात दंग असतात, त्याच वयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकत एक नवा विक्रम आपल्या नावावर रचणार्या यशस्वी जोशीच्या आयुष्याविषयी...
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ‘एएसआय’ने असे काही प्रकल्प हाती घेतले. १९५५ मध्ये बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापूर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इ. स. पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या.
डोक्याला गंभीर दुखापतीनंतरही ठोकले दमदार शतक
शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वरक्त सांडुन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती त्या प्रकारे कुमार सचिन ने सियालकोटच्या रणांगणावर स्वरक्ताच्या साक्षिने प्रति केली "मी तेंडुलकर कुलोत्पन्न..रजनी रमेशपुत्र प्रतिज्ञा करतो जोवर स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन निवृत्त होणार नाही!"
अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनानी यांचे प्रेमप्रकरण कुणाच पासून लपलेले नाही. या दोघांच्या जोडीने आता ऑनस्क्रीन देखील प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळविली आहे.
३५ चेंडूत रोहितने केली विक्रमी शतकी खेळी!!!
विराट कोहलीचे कसोटी सामन्यातील हे सहावे द्विशतक आहे. या द्विशतकी खेळीमुळे तो सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याबरोबरीला येऊन गेला आहे.
सलग द्वीशतक झळकवणारा विराट हा जगातील केवळ सहावा फलंदाज आहे. यापूर्वी ब्रॅडमन, कांबळी यांच्यासह केवळ पाच फलंदाजांनी हे केले आहे.
कोहलीचे ३१वे शतक | भारताच्या ४ बाद २५३ धावा
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित होतात. त्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दिवस तसा विशेष म्हटला पाहिजे. कारण एकदिवसीय सामन्यांमधील कोहलीचा हा २००वा सामना आहे. त्या सामन्यात कोहलीने संघातील आपले महत्त्व पुन्हा एकदा दाखवून दिले. सातत्याने पहिल्या फळीतले फलंदाज बाद होत असताना भारताचा कर्णधार मात्र एका बाजूने टिकून राहिला. आज कोहलीने एकदिवसीय सामन्यांत नवा विक्रम प्रस्थापित करत ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचा एक विक्रम मागे टाकला. आज ३१वे शतक पूर्ण करत विराट कोहलीने ३१व