गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला आहे
Read More
(Beed District Jail) बीडच्या जिल्हा कारागृहात सोमवार दि. ३१ मार्चला वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते टोळीचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. कारागृहात गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर महादेव गितेसह आणखी चार जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. तसेच आता मकोका मधील आठवले टोळीतील आरोपींची रवानगीही नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
(Gangwar in Beed Jail) गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरलेला वाल्मिक कराड. कुठल्यान कुठल्या कारणामुळे हे नाव सतत समोर येत राहिले. सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र चर्चा त्याच्या दहशतीची नसून त्याला झालेल्या मारहाणीची आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली.
(Santosh Deshmukh Case Hearing) संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज दि. २६ मार्च रोजी बीड सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. तसेच या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
( Santosh Deshmukh Case Hearing Updates ) संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयात २६ मार्चला रोजी सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचे म्हटले. यावर आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद करत आरोपनिश्चितीस विरोध दर्शवला आहे.
(Beed Case Update) बीडच्या संतोष देशमुख ह्त्याप्रकरणात (Santosh Deshmukh Case) दि. २७ फेब्रुवारी रोजी सीआयडीकडून १८०० पानांचे दोषारोप पत्र बीड सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात १८४ साक्षीदारांचे जबाब आणि ६६ सबळ पुरावे देण्यात आले आहेत. यापैकीच मोकारपंती या व्हॅाट्सअॅप ग्रुपच्या चार सदस्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत दिलेल्या जबाबातील माहिती समोर आली आहे.
(Dhananjay Deshmukh) 'आम्हाला धमकावलं जातंय', असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय देशमुख आपले भाऊ दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाचा सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहेत. अशातच आता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
(Beed Case ) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड प्रकरणात आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी करण्यात आली आहे.
(Beed Case) बीडमधील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी वादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि बालाजी तांदळे एकत्र असल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर आरोपी कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटेदेखील यात दिसले आहेत.
: (Walmik Karad) बीडमधील संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणांमधील संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
(Beed) बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
दोन कोटी रुपये खंडणीप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. केज कोर्टात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
(Walmik Karad) अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची १४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून कराडला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. केज न्यायालयात न्यायाधीश एन डी गोळे यांच्या समोर सुनावणी झाली.
(Santosh Deshmukh) बीड-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला मात्र अद्याप या प्रकरणातील एका आरोपी फरार आहे. तसेच अटकेत असणाऱ्या इतर आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने संतप्त मस्साजोगकरांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड हे नाव गेला महिनाभर राज्यात चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
(Dharashiv) पैठण, जालन्यानंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनसमुदाय रस्त्यावर उतरणार आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीड मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी तसेच सरपंच देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अश्या मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात येत आहेत. आज आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच देशमुखांच्या हत्येविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोठा जनसमुदाय एकवटलेला दिसून आला.
(Nitin Bikkad) मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी नितीन बिक्कड यांचे नाव घेतले होते. खंडणी प्रकरणातील व्यवहारासाठी धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी जी चर्चा झाली ती नितीन बिक्कड यांनी घडवून आणली, असा आरोप आमदार धस यांनी केला आहे . यावर नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाल्मिक कराडशी आपला काहीही संबंध नाही, असे नितीन बिक्कड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
(Santosh Deshmukh Murder Case Update) बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपींसह देशमुखांचे लोकेशन देणाऱ्यालाही स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. देशमुख यांची ज्याने टीप दिली तो सिद्धार्थ सोनवणे त्यांच्या अंत्यविधीलाही हजर असल्याची माहिती समोर आली आहे.
(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी ३१ डिसेंबरला पुणे सीआयडी मुख्यालयात शरण आला. शरणागतीनंतर सायंकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर रात्री उशिरा कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयातील युक्तिवादानंतर त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.
दोन कोटींच्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ऑफिसला शरण आला आहे. शरण येण्याआधी त्याचा एक व्हिडीओ पुढे आला होता. यात त्याने आपण शरणागती पत्करत असल्याची माहिती दिली आहे.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.