राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती पुढे आली आहे. शरद पवारांची भेट घेण्यासाठी ते त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी मोदीबागेत दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
Read More
पुणे लोकसभा मतदारसंघ यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत उत्तर कामगिरी केली आहे. त्यांनी बैलगाडा संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत. अमोल कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे. त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.