( 287th Vasai Vijayotsav Din ) वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार दि.१२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
Read More
(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
( Vasai Virar Municipal Corporation ) आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी पर्यावरण व हवामान बदल विभाग, राज्य शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली होती. सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग, सर्वोच्च कचरा संकलन, प्लास्टिक कचर्याचे रिसायकलींग या तीन श्रेणीमध्ये वसई-विरार महानगरपालिकेला आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे, अशी माहिती उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून तेथील हा भाग झोपडपट्टीमुक्त व्हावा याकरिता वसई-विरार महानगपालिका परिसरात मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून गुरुवार, दि.२८ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रात वसई रोड येथे नवीन बाह्य टर्मिनसची योजना आखली आहे. वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसद्वारे हाताळल्या जाणाऱ्या बाहेरच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. अखेर वसई रेल्वे टर्मिनलची मागणी मान्य करण्यात आली आहे, ही घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर पराभूत झाले असून भाजपच्या स्नेहा दुबे पंडित विजयी झाल्या आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना आपल्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
वसई विधानसभा मतदारसंघात यंदा तीन नेत्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. वसईमधून भाजपने स्नेहा दुबे यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन विकास आघाडी कडून विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर हे पुन्हा एकदा रिंगणात आहेत . तर काँग्रेस कडून विजय पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने यंदा वसई विधासभेट रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत.
एखादी कला विकसित करायची असेल, तर त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची. त्याच बळावर मोत्यांच्या विश्वात रमणार्या वसई येथील माधवी देशपांडे यांच्या कार्याविषयी...
ऑलेक्ट्राने ४० बसेसचा संपूर्ण ताफा वसई विरार महानगरपालिकेच्या वाहतुक विभागाकडे सुपुर्द केला आहे. महापालिकेसोबत ऑलेक्ट्राने ४० इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्यासाठी २४ जानेवारी २०२४ रोजी करार केला होता. २३ ऑगस्ट ला व्हीव्हीसीएमसीद्वारे प्रोटोटाइप बसला अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यांनतर ऑलेक्ट्राने एका महिन्याच्या ऑलेक्ट्राने बसेसचे वितरण पूर्ण केले आहे.
तालुक्यात घराघरात बसवलेल्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पान्चे सर्वत्र मोठ्या भक्ती भावाने विसर्जन करण्यात आले . यामध्ये वसईच्या ग्रामीण भागात पूर्ण गावभर पूर्ण गावांत मिरवणूक काढून साऱ्या गावांत बसवण्यात आलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे एकत्रित श्रीगणेश विसर्जन करण्याची परंपरा आजही कायम असून गावातील आबालवृद्ध या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात .
काही दिवसांपूर्वीच वसईमध्ये भर रस्त्यात आरती यादव या तरुणीचा लग्नाला नकार दिल्यामुळे तिच्या माथेफिरु प्रियकराने भर रस्त्यात निर्घृण पद्धतीने खून केला. नेहमीप्रमाणे यंदाही लोकांनी बघ्याचीच भूमिका घेतली. काहींनी आरतीला मदतीचा हात देण्यापेक्षा हातातील मोबाईलमधून व्हिडिओ शूट करुन ते व्हायरल करण्याचा खटाटोप केला. यानिमित्ताने घडलेल्या घटनेतून घ्यावयाचा धडा आणि समाजाने असले व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा माणुसकीच व्हायरल करण्याची गरज याविषयी...
वसई किल्ल्यात मागील पंचवीस दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला मंगळवार दि. २३ मार्च रोजी पहाटे जेरबंद करण्यात आले (vasai fort leopard). वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या जेरबंद झाला. (vasai fort leopard)
वसई तालुक्यात मंगळवार पासून सुरू झालेल्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. वसई-विरार शहरात भाद्रपद महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईजवळील मीरा रोड परिसरात दि.२१ जानेवारी रोजी रात्री उशिरा हल्लेखोरांनी गोंधळ घातला. ज्या वाहनांवर श्री राम नावाचे झेंडे लावण्यात आले होते त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. हल्लेखोरांनी केलेल्या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तोडफोड करताना हल्लेखोरांनी रस्त्यावर ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा दिल्याचे बोलले जात आहे. या गोंधळाचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. दरम्यान या घटनेबद्दल भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, 'काल रात्री मीरारोडमध्ये जे झाले. एक लक्षात ठेवा, चुन चुन के मारेंगे'
घरातली लाडकी अल्लड मुलगी जेव्हा मुख्याध्यापिका होते, तेव्हा आलेल्या जबाबदार्यांसोबत एक मराठी माध्यमाची संस्था टिकवण्यासाठी, एकाकी लढा देणारी पल्लवी चौधरी हिची यशोगाथा...
वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक असा होता. पुढील काळात कृत्रिम बुध्दीमत्ताच जगावर अधिराज्य गाजविणार आहे. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता काम करणार आहे. कृत्रिमबुध्दीमत्तेचा सकारात्मक वापर फायदेशीर ठरणार असल्याचे मत परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" ज्येष्ठ साहित्यिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने हा कार्यक्रम वसई - विरार शहर महानगरपालिका आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता वसई पश्चिम येथील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात संपन्न झाला.
साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई विरार शहर महानगरपालिका आणि गोन्सालो गार्सिया महाविद्यालय,वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकविसाव्या साहित्य जल्लोषच्या पूर्वसंध्येला शुक्रवार दि. ६ ॲाक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वरचित काव्यस्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू , चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
"स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास" या मोहिमेत रविवारी १ ऑक्टोबर रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या अभियान अंतर्गत जीवदानी पायथा, कातकरी पाडा, मानवेल पाडा रोड, विराट नगर/ विरार बस डेपो, विरार महानगर पालिका (विरार पूर्व), अंबाडी रोड वसई वेस्ट येथे पथनाट्य आयोजित करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन मा. खासदार राजेंद्रजी गावित, मा. प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते झाले.
वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिकेने “लेखा अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी” या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सबमिट करावयाचे आहेत.
वसईत गुरुवारी पहाटे पासून दमदार हजेरी लावलेल्या पावसाने करपणाऱ्या भातपिकांना जीवदान दिले असून हा पाऊस हळव्या पिकांना संजीवनी ठरला आहे. यामुळे आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोकुळ अष्टमी च्या दिवसात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वरूण राजाचे आभार मानले आहेत.
आम्ही सारे, वसई आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या वतीने कै . निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन दि . २० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकपात्री अभिनयासाठी ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच नाटुकली स्पर्धेसाठी २३ संघानी सहभाग घेतला होता. तरी एकपात्री अभिनयात प्रथम क्रमांक सानिका देवलकर, द्वितीय क्रमांक स्नेहा प्रसाद, तृतीय क्रमांक कृपा गायकवाड हिने मिळवले. तसेच मानसी जाधव, समीक्षा पाटील, उत्तरा बोस, विजया गुंडप यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक आणि विशेष लक्षव
वसई तालुक्यातील पूर्वेला असलेल्याआडणे येथील शेतकरी मोरेश्वर कमलाकर पाटील यांच्या शेतीवर कृषी विभागाकडून यांत्रिकी पद्धतीने भात लागवड कशी करतात याचे प्रात्येक्षिक करून दाखवण्यात आले. महागाई आणि मजूर टंचाईच्या काळात भात शेती करणे हे परवडत नाही . यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात शेती कसणे सोडून दिले आहे .
वसईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अधून मधून हजेरी लावत काहीशी उसंत घेतल्यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. अनेक शेतांमध्ये मोठा ट्रॅक्टर , पॉवर टिलर यांच्या आवाजाने शेत शिवार गजबजून गेले आहेत .यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे वसईतील आवण्या लांबणीवर पडल्या आहेत .त्यामुळे जमेल तशी आवणी उरकण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत .यंदा जवळ पास निम्म्या आवण्या उरकत आल्या असून उरलेल्या आवणीसाठी भात खाचरात शेतकरी आणि मजूर यांची लगबग सुरू आहे .
खानिवडे : वसईत गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्णता प्रचंड जाणवत असून वसई एक प्रकारे तापली आहे .या वर्षातील गर्मीचा पारा हा मागील बुधवारपासून सर्वोच्च ठरला असून कमाल ४०च्या पार पारा चढला होता . यामुळे उष्णतेचे चटके नागरिकांना बसू लागले आहेत. गुरुवारी पालघर मध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे आपले आरोग्य सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर उन्हाचा पारा असे हवामानात बदल निर्माण होत आहेत.
विविध समस्यांनी ग्रासलेल्या आणि आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्या वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’चे माजी खजिनदार उमेश मेस्त्री यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
वसईतील विश्वकर्मा हॉलमध्ये घेतलेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीस व्यापाऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद
मुंबई, वसई, मालाड व राईगाव येथून आलेल्या १५ दुर्गमित्रांनी तुंगार गडाच्या वास्तुदेवतेचे पूजन करून कुंडांची स्वच्छता केली. यामध्ये कुंडाचे खांब टाके क्रमांक १ व छप्पर टाके क्रमांक ४ या दोन मोठ्या क्षमतेच्या कुंडांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली.
देशात लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मोठी लाट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात एनडीएचे सरकार येणार हे निश्चित आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उत्तरेकडील परिक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या रस्ते आणि रेल्वे विकास प्रकल्पांचे बांधकाम उन्नत स्वरुपाचे करण्याच्या सूचना उद्यान प्रशासनाने संबंधित प्राधिकरणांना दिल्या आहेत. विकास प्रकल्पांमुळे वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अशी सूचना देण्यात आली आहे.
धुळवड साजरी करण्यासाठी वसईतील अर्नाळा समुद्र किनारी गेलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी दाखल झाले आहेत.
इमारतीच्या गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व नसेल तर सदनिकाधारकाला महिन्याचे देखभाल शुल्कही (मेंटेनन्स) द्यावे लागणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणा या स्थानकादरम्यान महिलांच्या डब्यात भुरट्या चोरांकडून गेल्या पाच वर्षांत ३९ लाख ३६ हजार ८२ हजारांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून समेळपाडा या ठिकाणी असलेल्या वैकुंठभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.