विजय वडेट्टीवारांचे विधान म्हणजे एकप्रकारे शत्रूंना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read More
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी मनोज जरांगेंनी शनिवार, २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली.
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बीड सरपंच हत्या प्रकरण सध्या चांगलेच तापले असून यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
१० एकर शेतीत ३ भाऊ असल्याने एका भावाला ४ एकर तर इतर दोन भावांना प्रत्येकी ३ एकर शेती मिळेल, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर भाजपने आंदोलन सुरु केलं आहे. चंद्रपूरमध्ये युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असलेल्या अमोल लोडे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर, आज देशाचे दोन तुकडे झाले असते. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परभणीत रविवारी १९ नोव्हेंबर रोजी वडेट्टीवार यांनी हे विधान केलं आहे. याबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असं आवाहन केलं. तर यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.
कुणबीप्रमाणे, ओबीसीतील सर्व वंचित जातींच्या नोंदी शोधाव्या. आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या. ओबीसींचं आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण द्या. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध केला आहे. यानंतर आता मराठा आरक्षणविरोधात वड्डेट्टीवार यांनी आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी बनावट प्रमाणपत्राचे केलेले आरोप खोटे असून असे कोणतेही प्रमाणपत्र माझ्याकडे नसल्याचे स्पष्टीकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांनी माध्यमांना माहिती दिली असेल तर त्याचे पुरावे सर्वांसमोर सादर करावे, असे आवाहन दानवे यांनी केले आहे.
अजित पवार हे आमचेचे नेते आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नऊ जण भाजपसोबत ही फुट नाही तर आणखी काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राष्ट्रवादीतील बंडाळी आणि दादांनी उचलेल्या पावलांमुळे महाविकास आघाडीला जबरदस्त मोठा धक्का बसला. दादांच्या रुपाने मैदाने गाजवणारा आणि विधिमंडळातही विरोधकांवर टीका करण्याची क्षमता असणारा नेता आघाडीने गमावला. दादांच्या बंडानंतर थोरल्या पवारांनी बंडखोरांविरोधात कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही. कारवाईची पोकळ घोषणा केली; पण प्रत्यक्षात काहीही घडलं नाही.
नाना पटोले यांनी चंद्रपूर बाजार समितीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत हातमिळवणी केल्याने जिल्हाध्यक्ष देवराळ भोंगळे यांच्याविरोधात कारवाई केली. त्यामुळे देवराळ भोंगळे हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या जवळचे नेते समजले जात असल्याने ते आक्रमक झाले. त्यानंतर "विजय वडेट्टीवार फार मोठे नेते नाहीत की मी त्यांच्यावर इथे प्रतिक्रिया द्यावी", अशी खोचक प्रतिक्रिया नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.त्यावर मविआतील नेत्यांनी जीभेवर संयम ठेवावा , असा निशाणा विजय वडेट्टीवारांनी राऊत-पटोलेंवर साधलाय.
सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत.
विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध केल्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात बहुमत चाचणीदरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार मानले. मात्र, फडणविसांच्या वक्तव्याने, बहुमत चाचणी मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहणारे आमदार हेच शिंदे-फडणवीस सरकारला मदत करणारे अदृश्य हात होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पूर्व विदर्भातील अवकाळी पावसामुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत या संदर्भात प्रश्न विचारला. ज्याला आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक उत्तर देत आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करणार असल्याचे सांगितले
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला सवाल
रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी दोन अशी एकूण चार पथके रवाना होत आहेत. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले
मंत्री विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर थोरातांकडून त्यांना सबुरीचा सल्ला
काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी चिंतन मंथन बैठकीत 'वाघ आमच्या इशाऱ्यांवर चालतो' असे म्हणत जोरदार टोला लगावला. यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं म्हणाले. याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार नारायण राणेंनीही शिवसेनेवर टीका करायची संधी साधली.
सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या आठवड्यात जवळपास १५ जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. या १५ जिल्ह्यांमधून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, मुंबईत सावध पवित्रा म्हणून अजूनही तिसर्या टप्प्यातील निर्बंध मुंबईसाठी लावण्यात आले आहेत. मुंबईचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ हा कमी होत असला तरी जोपर्यंत मुंबई पहिल्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईची लोकलसेवा सुरू केली जाणार नसल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
राज्यात पाच स्तरांमध्ये 'अनलॉक' करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर काहीच वेळात राज्याच्या जनसंपर्क व माहिती कार्यालयाने अनलॉकबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यामुळे राज्य सरकारमध्येच समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील विसंवादाची किंवा मंत्रिमंडळातील बेबनाव समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी परस्परविरोधी वक्तव्यं करून आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसतो.
विविध गुन्हे दाखल असतानाही याबाबतची माहिती लपविल्याने राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना गुरुवार दि. ७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा झटका दिला. वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती पारपत्र (पासपोर्ट) अर्जात लपविल्याचे समोर आल्याने न्यायालयाने त्यांचे पारपत्र जप्त करण्याचे आदेश दिले.
विजय वडेट्टीवार न्याय देत नसल्याचा आरोप; खास जीआर काढूनच नियोजन विभागाकडे कारभार सुपूर्द
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती; राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले मत
राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तैनात