US President Donald Trump has announced Proposing a 100 percent import tariff on foreign films, he cited the threat to national security अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारयुद्धाला तोंड फोडल्यानंतर आता पुन्हा एका धक्कादायक निर्णयाची घोषणा केली. विदेशी चित्रपटांवर 100 टक्के आयातशुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडत, त्यांनी यामागे राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे कारण सांगितले. पण, ट्रम्प यांचा हा निर्णय केवळ व्यापार धोरणाचा भाग नाही, तर एका व्यापक राजकीय-सांस्कृतिक चर्चेचा केंद्रबिंदू बनू शक
Read More
US President Donald Trump decision to hold $2.2 billion in funding from Harvard University अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स येथील एक नावाजलेले जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून हार्वर्ड विद्यापीठ ओळखले जाते. हार्वर्ड विद्यापीठात देश-विदेशातून उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्यांची संख्याही लक्षणीय. एमबीए, विधि, वैद्यक, सरकारी धोरण, विज्ञान, अभियांत्रिकी असे टॉप कोर्सेस इथे शिकवले जातात. म्हणूनच या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरब
(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे.
'सोशालिस्ट डेमोक्रेटिक’ समूहाचे राफेल ग्लुक्समन यांनी अमेरिकेने ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चा अर्थात स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा परत फ्रान्सला द्यावा, अशी तीव्र शब्दांत नुकतीच मागणी केली. यावर अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’च्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या, “फ्रान्सच्या राजनीतीतज्ज्ञाने लक्षात घ्यावे की, अमेरिका नसती तर फ्रान्स जर्मन भाषा बोलत असता. अमेरिका होती म्हणून फ्रान्स आत जर्मन भाषा बोलत नाही. त्यासाठी फ्रान्सने आमच्या महान देशाविषयी नेहमी कृतज्ञ राहायला हवे. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा फ्रान्सला कधीही परत दि
इस्रायल-हमास युद्धाची ठिणगी पुन्हा शिलगावली गेली असली, तरी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरती युद्धबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, युद्ध टाळण्यातच दोन्ही बाजूंचा विजय आहे, इतकी साधी गोष्ट या नेत्यांना कोण समजावून सांगणार, हाच खरा प्रश्न.
"लाल समुद्रामध्ये ‘हुती’ दहशतवाद्यांनी गोळीबार केलेली एक-एक गोळी एक-एक हत्याराच्या वापराबद्दल इराणलाच जबाबदार ठरवण्यात येईल. ‘हुती’ आताही सुधारले नाहीत, तर त्यांची अवस्था नरकापेक्षाही वाईट केली जाईल,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच म्हणाले. यावर इराणने स्पष्टीकरण दिले की, ‘हुती’ विद्रोही यांचे इराणचे काही संबंध नाहीत, तर ‘हुती’ दहशतवादी संघटनेचे प्रवक्ता मोहम्मद अल-बुखायती यांनी ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर दिले की, “इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमण केले आहे. आमचे युद्ध अमेरिकेशी नाही, तर
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, एकामागोमाग एक निर्णयांचा धडाकाच लावला आहे. अमेरिकन जनता आणि राजकारण्यांना ट्रम्प यांचे निर्णय पटो अथवा न पटो, आता त्यांच्या पालनाशिवाय गत्यंतर नाहीच. असाच एक निर्णय म्हणजे, पेपर स्ट्रॉऐवजी पुन्हा प्लास्टिक स्ट्रॉच्या सरसकट वापराची अंमलबजावणी.
जपानमधील शिखर परिषदेत अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या लसीकरण कार्याचे कौतुक केले आहे.