(Survey tribal villages in Mumbai suburbs) आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, याचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याचा अहवाल दि. 30 मे रोजीपर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी दिले.
Read More
( Chandrashekhar Bawankule on tribal families ) अल्याळी (नवापाडा) येथील ५८ आदिवासी भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रालयात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या कुटुंबांना आता अधिकृतपणे वास्तव्याचा अधिकार मिळणार आहे. गेली ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांना शासनाच्या विविध विभागांकडून पूर्वीच मंजुरी मिळालेली आहे.
आदिवासी समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सीएसआर निधीच्या उपयोगातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'कडून कोकणात राबविण्यात येणाऱ्या कालवे पालन प्रकल्पासाठी 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'ने (सीएमएफआरआय) गुणवत्ता पूर्ण कालवे बीजांचा पुरवठा केला आहे (Maharashtra tribal farmers). कालव पालन प्रकल्पातील उत्पादन क्षमता वाढवून स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा म्हणून केरळमधील 'सीएमएफआर'च्या कालवे बीच निर्माण केंद्रामधून १ लाख बीजांचा पुरवठा करण्यात आला आहे (Maharashtra tribal farmers). हे बीज लवकरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील कालवे पालन प्रकल्पामध्ये
आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
९०च्या दशकात औद्योगिक प्रशिक्षणासारखी ( Development Trainer ) वेगळी वाट निवडून शेकडो आदिवासी विद्यार्थिनींना लघुउद्योजिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार्या दिपाली कुलकर्णी यांच्याविषयी...
भारत अनेक जनजातींच्या परंपरांनी समृद्ध झाला आहे. या परंपरांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभावण्याचे कार्य करणार्या दामोदर थाळकर यांच्याविषयी...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावर
मुंबई : ‘माय होम इंडिया’ आयोजित ‘जनजातीय युवा गौरव पुरस्कार’ ( Tribal Youth ) सोहळा शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी बजाज इमेराल्ड, अंधेरी पूर्व येथे संपन्न झाला. यावेळी, जनजातीय समाजासाठी कार्य करणार्या दहा प्रख्यात समाजसेवकांना सुविख्यात मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कारार्थी स्वतः जनजातीय समुदायातील असून, आज ते आपल्याच समाजाच्या कल्याणाकरिता काम करत आहेत. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उदय देशपांडेंसह अंधेरी पूर्व मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. मुरजी पटे
जगाच्या पाठीवर विविध प्रकारचे आदिवासी समाज वास्तव्यास आहेत. प्रत्येक आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या परंपरा आणि चालीरीती. असाच एक आदिवासी समुदाय जो गेली ७०० वर्षे न्यूझीलंडमध्ये स्थायिक आहे, तो म्हणजे ‘माओरी’ समुदाय. हा समुदाय सध्या प्रचंड चर्चेत आला आहे, तो न्यूझीलंडच्या माओरी खासदार हाना रावहिती करियारिकी मॅपी क्लार्क यांच्यामुळे! वास्तविक, गेल्या गुरुवारी न्यूझीलंडच्या संसदेत सर्व खासदार या विधेयकावर मतदान करण्यासाठी जमले होते. त्यावेळी झालेल्या जोरदार राड्यामुळे माओरी खासदार हाना रावहिती या पुन्हा एकदा चर्
९ ऑगस्ट रोजी जगामध्ये 'वर्ल्ड इंडिजिनस डे' म्हणजेच जागतिक मूलनिवासी दिन साजरा केला जातो. काही वर्षांपासून भारतातही हा आदिवासी दिन म्हणून साजरा होऊ लागला आहे, पण त्यामागे दडलेला क्रूर इतिहास बहुतांश लोकांना माहीत नाहीये, आणि या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही राष्ट्रविरोधी शक्ती फक्त तुम्हीच मूलनिवासी आहात, आदिवासी आहात, उर्वरित भारतीय वेगळे आहेत, असा भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा करण्यासाठी त्यांना प्रेरित करत आहेत.
( Hemant Sawara )आदिवासी युवा पीढीच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्या जाळीवरून उडीच काय, कोणतेही पाऊल उचलण्याची तयारी असल्याचे मत पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी व्यक्त केले.
( ITI )काही विद्यार्थी आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरण करून देखील आदिवासींसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेत असल्याचे २०२३ सालच्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेदरम्यान निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात सखोल चौकशीचे निर्देश दिले होते.
राज्य सरकारने पोलिस भरतीत आदिवासी उमेदवारांना ५ से.मी. उंचीची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता आदिवासी तरुणांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
(Pradhan Mantri Janjatiya Unnat Gram Abhiyan) देशातील आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता “प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान” ही योजना राबविण्यात येत आहे.
कष्टकरी आदिवासी बांधवांच्या लहान मुलींचे आयुष्य शिक्षणाने उजळावे म्हणून वसई पूर्वेतील उसगाव डोंगरीत श्रमजीवी संघटना मुख्यालय असलेल्या पूज्य साने गुरुजी संकुलात फुलबाग या नावाच्या वसतिगृहाचा शुभारंभ करण्यात आला.
धर्मांतरण केल्यानंतरही वनवासींच्या सवलतींचा दुहेरी लाभ घेणारे २५७ विद्यार्थी रडारवर आले आहेत. या प्रकारांना चाप लावण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून, शुक्रवारी तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करण्यात आला.
चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना, जगातील पहिल्या फ्युजन वारली कलाकार होण्याचा नावलौकिक कमावलेल्या नाशिक जिल्ह्यातील हेमा विजयकुमार ठाकूर यांच्याविषयी...
आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शहापूर, मुरबाड आणि कर्जत येथील धान्य खरेदी केंद्रांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश आ. संजय केळकर यांनी केला होता. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी अशा १४ जणांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यापूर्वीच तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे संपूर्ण राज्यभर पसरली असल्याने एसआयटी द्वारे चौकशीची मागणी आ.केळकर यांनी केली आहे.
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत. परंतु, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
देशात वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बुधवारी दिली.
रानावनातील दगडमातीशी संघर्ष करीत घडलेल्या कविमनाच्या ‘रानवाकार’ सखाराम डाखोरे यांचा जीवनप्रवास...
जव्हार तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या काशिवली या गावी आज, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा यांची भेट घेतली. या भेटीने आदिवासी संस्कृती, परंपरा आणि संगीत यासंदर्भातील चर्चा झालीच शिवाय, मोदी सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची मांडणी सुद्धा धिंडा यांनी केली.
महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीशभाऊ आणि शुभदाताई हे दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावलेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ने आयोजिलेल्या आंदोलनात त्या युवापिढीसोबत सहभागी झाल्या. मात्र, आंदोलन विघटित होत गेल्यानंतर शुभदाताईंनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सतीश गोगुलवारांसोबत त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. याच काळात उभयतांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शुभदाताईंनी लग्नानंतरही आपल्या नावात बदल
वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष सुरू असला तरी, वन्यजीवांची संरक्षणाची जबाबदारी माणसांचीच आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत येऊर वन परिक्षेत्राच्या वतीने वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसह येऊर मधील आदिवासी पाड्यात प्राण्यांबद्दल जनजागृती, चित्रकला, स्वच्छता मोहीम, चित्रफित दाखवून निसर्ग आणि प्राण्यांचे महत्व पटवून देण्यात आले.
येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील माणूस उभा करण्याची क्षमता फक्त शिक्षकात आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
राज्यातील विविध क्षेत्रातील विविध रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून अप्पर आयुक्त आदिवासी विकास महामंडळ,नाशिक येथे भरती करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, या भरतीप्रक्रियेतून पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
आजच्या लेखाचे नायक हेमंत सुर्यवंशी हे एका अमूर्त शैलीचे जाणकार, अनुभवी दृश्यकलाकार आहेत. सांस्कृतिक विभागात महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. व्याकरण नसलेली त्रिवेणी कला, रोमांचक आहे. म्हणूनच या कलेला आत्मसात करण्यासाठी चित्रकार सूर्यवंशी यांनी अथक मेहनत घेतली. त्यातूनच निर्माण झालेली त्यांची अमूर्त शैली उत्स्फूर्त अभिव्यक्तीची चैतन्यदायी मूर्तिमंतता भासते.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे बॅनर फाडल्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
‘वारली’ने कात टाकली आहे. जिव्या सोमा मशेंनी ‘वारली’ला जगाच्या कानाकोपर्यात पोहोचविलं आहे, तर हर्षल त्याच ‘वारली’ला विविध रंगात वैविध्यपूर्ण ढंगात आणि आदिवासी जीवनातील सर्वच प्रकारच्या वार्षिक दिनमानांना चित्रस्वरुपात जगभर पोहोचविणार असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते. अशा या कलाकाराचा कलावेध घेणारा हा लेख...
आजच्या दिवशी ज्यावेळी मी माझ्या आदिवासी विभागाचा विचार करतो, तेव्हा 2011च्या जनगणनेनुसार, 11.24 कोटी पैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1.05 कोटी इतकी आहे. जवळपास 9.35 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असलेले प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, गोंदिया हे जिल्हे आहेत. आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्याविषयी सविस्तर...
नंदुरबार : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या १० वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांमुळे राज्यातील ६४५ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.
राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेलं विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून राज्याला गती देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्ताव व नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, सर्वसामान्यांचे सरकार स्थापन होऊन नऊ महिने पूर्ण झाले आहे. पूर्ण काळ अधिवेशनं घेऊन विक्रमी कामकाज केले आहे. लोकशाहीत चर्च
दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील ‘यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था’ संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संकेत ज्ञानेश्वर गालट असे विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्यास दोन दिवसांपासून खोकला असल्याचे शाळा प्रशासनांकडून सांगण्यात आले.
शेतमजुरी, वीटभट्टी स्थलांतर या चक्रातच आयुष्य होरपळणार्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी सर्वंकष प्रयत्न करणारे रवींद्र नागो भुरकूंडे यांच्या कार्यविचाराचा घेतलेला मागोवा...
“ईशान्य भारतामध्ये यापूर्वीच्या सरकारच्या काळात २००६ ते २०१४ या कालावधीत लहान-मोठ्या ८ हजार, ७०० हिंसक घटना घडल्या होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात या घटनांमध्ये ७० टक्क्यांची घट झाली,” असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय जनजाती संशोधन संस्थेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
जय भगवान बिरसा मुंडा आपला भारत हा विभिन्न प्रांत, भाषा, संस्कृती यांनी समृद्ध आहे. देशात ३०० जनजातींचे वास्तव्य आहे, त्यातील अनेक वीरांचे आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे. त्यातीलच एक स्वर्णलंकारित नाव म्हणजे बिरसा मुंडा. सहजपणे, उत्स्फूर्तपणे जनजाती बांधवांनी त्यांना मोठ्या प्रेमाने ‘भगवान’ ही उपाधी बहाल केली. ‘जनजाती गौरव सप्ताहा’ निमित्ताने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्याविषयी...
भारत विविध दिन उत्साहाने साजरे करतो आणि त्या परंपरेत १५ नोव्हेंबरची ‘जनजाती गौरव दिन’ या नावाने भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जनजाती गौरव दिनासाठी १५ नोव्हेंबरची निवड केली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या लेखातून जाणून घेऊया बिरसा मुंडा यांच्याबद्दल... १५ नोव्हेंबर, १८७५ या दिवशी महान योद्धे, क्रांतिकारी आणि धर्मनिष्ठ भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झाला आणि ब्रिटिशांशी लढा देत अवघ्या २ ५ वर्षांचे आयुष्य जगून भारतमातेच्या कुशीत ते विसाव
अनेकांनी विष्णुदादांविषयी आपले अनुभव लिहावे यासाठी फोनवर बोलणे केले, पण त्यानंतर मीच थोडा अंतर्मुख झालो. विष्णुदादांच्या घडणीमध्ये माझा वाटा खारीचासुद्धा नसला तरी १९७० ते २०२० या सुमारे ५० वर्षांच्या त्यांच्या प्रवासाचा मी निश्चितच साक्षीदार आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. लिखाणाची फार मोठी सवय नसली तरी विष्णुदादांविषयीच्या आठवणी लिहिण्याचा शब्दबद्ध केलेला हा प्रयत्न...
जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी जाणारच, हे जरी खरं असलं तरी विष्णु सवरा यांचा बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी झालेला मृत्यू राजकीय क्षेत्रात वावरणार्यांना, पालघर जिल्ह्यातील त्यांच्या समाजबांधवांना तमाम कार्यकर्त्यांना, तलासरी केंद्रातील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना, संघ परिवाराला व पालघर जिल्हा भाजपला जबरदस्त धक्का देणारा आहे.
आपल्या चिल्या-पिल्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना पाठीशी घेऊन मोलमजुरी करण्यासाठी दरवर्षी दूरवर परगावी जाणे, ज्याला वनवासी ‘जगाय चाल्लू’ असे म्हणतात. अशा पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम जंगली भागांतील तालुक्यांपैकी वाडा तालुक्यातील गालतरे या वनवासी पाड्यावर दि. १ जून, १९५० रोजी सवरा दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. हिंदुत्वाच्या संस्काराचा पगडा असलेल्या, सवरा कुटुंबीयांनी बालकाचे नाव ‘विष्णु’ असे ठेवले. याच विष्णुने पुढे अखंड दारिद्य्राच्या गाळांत रुतलेल्या, खितपत पडलेल्या वनवासी समाजाचा उद्धार केल
प्रचंड जनसंपर्क, सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची विष्णु सवरा यांची वृत्ती त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवते. तसेच सामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करण्याच्या कार्यपद्धतीमुळे ते आजवर आपलं राजकीय यश टिकविण्यातही यशस्वी ठरले. सलग ३० वर्षं जनमानसावर अधिराज्य गाजवणं, हे बदलत्या राजकीय संस्कृतीत सवरांनी टिकवलं, हे त्यांच्यातील असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारं आहे.
सन १९९० पासून २००९ पर्यंत दोन दशके वाडा विधानसभा मतदारसंघाचे, २००९ पासून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे, तर २०१४ पासून २०१९ पर्यंत विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व ज्यांनी केले, ते महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, विष्णुजी सवरा यांचे वयाच्या ७१व्या वर्षी बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या राजकीय जीवनाचा, कारकिर्दीचा मागोवा घेत असताना अनेक आठवणींचा, भाव भावनांचा चल चित्रपट माझ्या मनश्चक्षूपुढे तरळू लागला.
सामान्यांतून असामान्य माणसे तयार होत असतात. परंतु, असामान्य होऊन सामान्यांसारखे राहावे, वागावे व ते टिकवणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण दादांनी जीवनभर आचरणात आणले. दादांच्या जीवनातील हे विविध पैलू उलगडताना आपल्याला त्यांची अनेक स्वभाववैशिष्ट्ये दिड्.मूढ करतात व दिशा दाखवतात. पहाडाएवढी कामे करूनसुद्धा त्यांची जाहिरात न करणारा राजकारणी हा विरळाच. टीकाकारसुद्धा कालांतराने त्यांचे प्रशंसक होऊन जात असत.
“सोन्या, रागावलीस का माझ्यावर?” फोनवर पलीकडून आवाज आला आणि माझ्या डोळ्यातून गंगा, यमुना, गोदावरी वाहू लागल्या. मी सकाळी चिडून निघून आले म्हणून दादांनी ऑफिसमधली गर्दी आटोपून कामाच्या रगाड्यातून आठवणीने फोन केला होता. इतक्या हळव्या मनाचे माझे दादा, त्यांचा आवाज यापुढे ऐकू येणार नाही. असं का झालं? असं व्हायला नको होतं. तुम्ही का गेलात? वडील हे मुलीच्या आयुष्यातले पहिले ‘सुपर हिरो’ असतात आणि मुलगी कितीही मोठी झाली तरी ती त्यांच्यासाठी राजकन्याच असते. मग मी तरी याला अपवाद कशी बरं असेन?
विष्णुजी २०१४ची विधानसभा निवडणूक विक्रमगडमधून लढले व जिंकले. सहावेळा निवडणूक जिंकणे अजिबात सोपे नाही. पण, प्रचंड दांडगा जनसंपर्क, वैयक्तिक संबंध आणि लोकांची केलेली कामे म्हणूनच ते निवडून आले. सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे पहिल्या यादीतच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. खऱ्या अर्थाने गरीब, वनवासी आणि इतर समाजाचेही अनेक प्रश्न सोडविले होते.
सन १९९५च्या निवडणुकीनंतर सतत साहेबांसोबत राहिलो. त्यानंतर २०००, २००४, २००९ व २०१४ या निवडणुकांमध्येदेखील साहेबांचं काम केलं. साहेब सातत्याने सहावेळा निवडून आले. १९९५च्या काळामध्ये युती सरकारमध्ये १९९९ साली साहेब कॅबिनेट मंत्री झाले. अवघ्या सहा-आठ महिन्यांचाच कालावधी त्यांना मिळाला. परंतु, इतक्या कमी कालावधीमध्येसुद्धा मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
आजही बऱ्यापैकी दुर्गम असलेल्या वाडा तालुक्यात वनवासी कुटुंबात जन्माला आलेले विष्णु सवरा आपले भाग्य घडवायला वनवासी कल्याण आश्रमाच्या तलासरी येथील शाळेत दाखल झाले. तिथे शिक्षण आणि संघ संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडलेल्या विष्णु सवरांनी स्वतःचे भाग्य घडविलेच; पण खऱ्या अर्थाने ते संपूर्ण महाराष्ट्रातील वनवासींचे आणि वाडा-पालघर विभागाचे भाग्यविधाता झाले.
विष्णु सवरा उर्फ सवरा साहेब म्हणजे तत्कालीन ठाणे ग्रामीण भाजपमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधे राहणीमान, प्रामाणिकपणा, कायम भाजपचा विचार आणि वनवासी बांधवांसाठी तळमळ ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. सवरा साहेबांना भेटण्यासाठी कधीही भाजपचा कार्यकर्ता वा सामान्य नागरिकांना ‘अपॉईंटमेंट’ घ्यावी लागली नाही. कायम जनतेच्या गराड्यात राहणे हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग असावा. आदिवासी विकासमंत्रिपद भूषविण्याचा मान सवरा साहेबांना दोन वेळा मिळाला. या काळात त्यांच्या कार्याचा ठसा आदिवासी विकास विभागावर उमटला
विष्णु सवरा म्हणजे अतिशय तल्लख स्मरणशक्ती, तीव्र संघर्षयोद्धा आणि २४ तास वनवासी समाजाच्या प्रगतीचा ध्यास लागून राहिलेलं व्यक्तिमत्त्व. दि. ९ डिसेंबर रोजी त्यांच्या निधनाचं वृत्त मला जेव्हा समजलं, तेव्हा मी प्रवासात होतो. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला अतिशय वेदना झाल्या. गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाला जे धक्के सहन करावे लागले आहेत, त्यामुळे अतिशय दु:ख होतं. ज्या नेत्यांनी पक्षाचे एक लहानसे रोप लावून त्याची तन-मन-धनाने जोपासना केली, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत असताना, ते नेते आपल्याला सोडू