train accident जळगावातील परांडा रेल्वेस्थानकावर रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली होती. या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक रेल्वेने पुष्पक रेल्वेला धडक दिली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. ही घटना दि : २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More
Jalgoan Train Accident जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
(Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
बांग्लादेशमध्ये सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी दोन ट्रेनची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. एका मालगाडीने पॅसेंजर ट्रेनला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात जवळपास २० जणांचा मृत्यू झाला असून असंख्य लोक जखमी झाले आहेत.
बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दिल्ली-कामाख्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील राम दिलीप जटाळे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मोबाईल मध्ये मग्न होऊन कानात हेडफोन टाकून तो चालत होता. पाऊलवाटेने चालताना रेल्वेरुळ आल्याचेही त्याला कळले नाही व सुसाट आलेल्या रेल्वेचा धक्का लागला आणि या विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले.
देशाला सुन्न करणाऱ्या बालासोर रेल्वे अपघातात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या चौकशीची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने सीबीआयकडे दिली होती. आता सीबीआयने अपघाताला जबाबदार असलेल्या तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. Balasore train accident CBI
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहंगा येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने रविवारी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पाच जणांमध्ये एका रेल्वे अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे माल आणि मानव यांच्या वाहतुकीची जीवनरेखा आहे. देशाच्या प्रगतीला विरोध करणार्या शक्तींना नेटवर्क विस्कळीत व्हावे आणि देशात अराजक निर्माण व्हावे, असे वाटते. या पार्श्वभूमीवर बालासोर येथील रेल्वे अपघात हा घातपात असू शकतो, असा संशय देशातील माजी वरिष्ठ अधिकारी आणि सैन्याधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून व्यक्त केला आहे.
मुंबई : "सिग्नल यंत्रणेत छेडछाडीमुळे अपघात झाल्याची दाट शक्यता" वंदे भारतचे इंजिनियर सुधांशू मणी यांनी वर्तविली आहे. सुधांशू मणी पुढे म्हणाले, रूट हा लूपलाईनला सेट असल्यामुळे लोकोपायलट भरधाव गाडी थांबवू शकला नाही त्यामुळे हा अपघात घडला असावा असे इंजिनियर सुधांशू मणी यांनी सांगितले. इंटर लॉकिंग फेल झालं असेल पण त्यामुळे रेल्वे अपघात होणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
"महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) यांच्यात पुण्यात ३ जून रोजी करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून बजाज फिनसर्व्ह पुण्यात जवळपास ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ४० हजार रोजगार तयार होणार आहेत. नजीकच्या काळातील महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे." अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आपल्या देशात नागरी कर्तव्य काय असते, हे स्वातंत्र्यानंतर कधी शिकविलेच गेले नाही! अमृतसरमध्ये हेच घडले. नागरी कर्तव्याची जनतेला जाणीव असती, तर हा अपघातच घडला नसता!
एकीकडे देशभर राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिन साजरा होत असताना दुसरीकडे पोलिसांना सहन करावा लागतोय जनतेचा रोष.