मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्ष विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच एक मोठी खंत व्यक्त केली आहे. नाना पाटेकर यांनी केरळमध्ये २८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होतीय यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, “मला आत्तापर्यंत ५० वर्षात एकाही मल्याळम दिग्दर्शकाने चित्रपटासाठी विचारणा केली नाही”.
Read More
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या चित्रपटांमधुनच ते किती परखड आणि स्पष्टवक्ते आहेत याची प्रचिती येतेच. दरम्यान, यावेळी विवेक अग्निहोत्री इंडिगो एअरलाईन्सवर भयंकर चिडले असून त्यांनी ट्विट करत इंडिगोच्या विमानाने प्रवास करताना झालेल्या त्रासाबद्दल एअरलाईन्सला खडे बोल सुनावले आहेत.
चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर मराठी, हिंदी, दाक्षिणत्य आणि इतर भाषिक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतात. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केल्यानंतर काही आठवड्यांनी चित्रपट घरबसलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटीवर प्रदर्शित केले जातात.
देशातील नगन्य समजल्या जाणाऱ्या अडणींना रुपेरी पडद्यावर मांडत प्रेक्षकांना मनोरंजनातून समाजाचा खरा आरसा दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांतून आजवर केले आहे. 'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी', 'द वॅक्सिन वॉर' असे चित्रपट प्रेक्षकांना देणारे विवेक अग्निहोत्री पौराणिक चित्रपटांकडे वळले आहेत. विवेक अग्निहोत्री 'महाभारता’वर आधारित चित्रपट करणार असून तीन भागांमध्ये प्रेक्षकांना हा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांतुन समाजातील दाहक वास्तव जगासमोर मांडणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच त्यांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या ‘महाभारता’वर आधारित आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
मनोरंजन म्हणजे नाटक, चित्रपट आणि वेब मालिका. कामाच्या व्यापातून आठवड्याच्या शेवटी चांगला चित्रपट किंवा वेब मालिका पाहात वेळ घालवण्याची मजाच काही और आहे. पण, कामाच्या रगाड्यात बऱ्याचदा कोणता चित्रपट अथवा वेब मालिका प्रदर्शित झाली आहे हे लक्षात राहात नाही. यासाठीच आम्ही नवा सदर घेऊन आलो आहोत. तर नक्की हा सदर वाचा आणि आपला विकेंड आनंदात घालवा....
'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी' या चित्रपटांच्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. करोना काळात जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कॉवॅक्सिन लसीबद्दलची सत्य कथा मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. त्यांनी त्यावरुन केलेलं एक धक्कादायक वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द ‘व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. भार्गवा यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस कशी आणि कोणत्या स्थितीत विकसित केली, याबद्दलचे सत्य चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पल्लवी जोशी आणि नाना पाटेकर यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद...
काही दिवसांपासून राखी सावंतचा मुद्दा चर्चेत आहे. आता या वादात अभिनेत्री तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच राखीच्या नवऱ्यासोबत अर्थात आदिल खानबरोबर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने #MeToo बद्दल बोलत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.
अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला द वॅक्सिन वॉर चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून पल्लवी जोशी चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, यावेळी नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेत एक महत्वाचे विधान केले आहे. नाना पाटेकर असं म्हणाले की, “स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत”. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
करोनाच्या सावटातून जगाला वाचवण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही भारतीय लस तयार करणारे डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या महिला शास्त्रज्ञांची गोष्ट ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून लवकरच आपल्यासमोर येणार आहे. ‘द काश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ असे सत्य घटनांवर आधारित यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केलेले विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एक नवा विषय मांडण्याचा विडा उचलला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने पत्रकारांशी संवाद साधत चित्रप
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात करोना महामारीपासून देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस तयार केली. असमान्य परिस्थितीतही डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन लस कशी तयार केली याची रंजक आणि थरारक कथा द वॅक्सिन वॉर या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील एक महत्वपुर्ण भूमिका साकारली आहे. काही कलाकारांना पुढे-पुढे करण्याची सवय असते असं
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिने कला क्षेत्रात फार मोठा पल्ला गाठला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यापासून मराठी मनोरंजसृष्टीत पुन्हा पल्लवी दिसलीच नाही. पुन्हा मराठी मनोरंजनसृष्टीत येणार का? असा प्रश्न विचारला असता कला दिग्दर्शक नितीन देसाईंसोबत मराठीत काम करणार होते, परंतु आता ते शक्य नाही असे म्हणत नितीन यांच्या आठवणीत पल्लवी जोशी भावूक झाली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रप
करोनाच्या सावटातून लोकांना वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी पुढाकार घेत स्वत:ची कोवॅक्सिन लस तयार केली. डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या महिला शास्त्रज्ञांच्या चमुने ही करोनावरील लस कशी तयार केली याची सत्य कथा सांगणारा चित्रपट 'द वॅक्सिन वॉर' विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने बातचीत करताना डॉ. भार्गवा यांनी 'गोईंग वायरल' हे पुस्तक कोवॅक्सिन लसीवर लिहिले होते. या पुस्तकाचे मालकी हक्क 'द वॅक्सिन वॉर' चित्रपटासाठी त्यांनी केवळ १ रुप
बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावेळी नाना पाटेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि त्यांना या चित्रपटासाठी कसे कास्ट करण्यात आले याचा रंजक किस्सा विवेक अग्निहोत्री यांनी सांगितला.
‘द वॅक्सिन वॉर’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात डॉ. बलराम भार्गवा यांची भूमिका नाना पाटकेर यांनी साकारली आहे. मात्र, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यापुर्वी नाना कधीच डॉ. भार्गवा यांना भेटले नसल्याचा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे विशेष कौतुक नानांनी केले. “संपुर्ण टीमने विषयाचे सखोल संशोधन केले आहे आणि मला डॉ. भार्गवांबद्दल जी माहिती दिली त्यावरुन मी त्यांची व्यक्तिरेखा साकारली असल्याची कबूली देखील नानांनी दिली. त्यामुळे च
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी ७०-८० च्या दशकात आपल्या समृद्ध अभिनयाने गाजवणाऱ्या अनेक नटांपैकी एक नाव आजही घेतले जाते ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे. द वॅक्सिन वॉर या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने बातचीत करत असताना नाना विक्रम गोखले यांच्या आठवणीत भावूक झाले. “जगातल्या पहिल्या १० नटांची नावं सांगा असं कुणी विचारलं तर त्यात एक नाव विक्रम गोखले यांचं असेल”, अशा शब्दांत त्यांनी विक्रम गोखलेंच्या अभिनयाचे कौत
आधी 'द काश्मीर फाईल्स' आणि आता 'द काश्मिर फाईल्स अनरिपोर्टेड' या चर्चेत आलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. अग्निहोत्रींनी काही दिवसांपूर्वी 'द व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटाबाबत सांगितले होते. या चित्रपटाचा ट्रेलर आज अग्निहोत्री यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत प्रदर्शित केला असून त्यांनी हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहितीही दिली आहे.
चित्रपटाचे बदलते ट्रेंड्स, या माध्यमाचा गेल्या काही दशकांत झालेला अफाट विस्तार आणि जागतिक चित्रपटसृष्टीकडे पाहता, भारतीय सिनेमाचे भवितव्य तसेच या बदलत्या प्रवाहांत विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटांची भूमिका, अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचित...