माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यात रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची घटना आहे.
Read More
जगदीश मुळीक फांऊंडेशन तर्फे आयोजित धीरेंद्र शास्त्री यांच्या मंत्रमुग्ध अमृतवाणीतुन पुण्यनगरीत हनुमान कथा सत्संग व दिव्य दरबार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी (31 जुलै) सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान आता या चाकरमान्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करा, अशी मागणी अजित पवारांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्राव्दारे केली आहे. तसंच गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याचीही मागणी केली आहे.
कल्याण : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट अत्यंत बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल झाले आहेत. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक उरलेले नाही.त्यामुळे या आरक्षित तिकिटांचा आढावा घेऊन कोकण वासियांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकणवासियांच्या कोकण प्रवासाचा श्री गणेशा करण्याची मागणी मनसे आमदार रा
मुंबई : भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील उर्जा संक्रमण कार्य गटाची (ETWG) तिसरी बैठक १५ ते १७ मे २०२३ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जी-२० सदस्य देश, विशेष आमंत्रित देश तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (आयईए) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थामधील १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्तीय भागातील कर्नाटकातील नागरिकांनी मतदानासाठी जाता यावे यासाठी या भागात भरपगारी सुट्टी जाहिर केली आहे. हा आदेश कोल्हापुर,सांगली , सोलापूर , सिंधुदूर्ग , उस्मानाबाद, लातूर , नांदेड या जिल्ह्यातील कामागारांना लागू होणार आहे. तसेच हा आदेश शासनाच्या कामगार विभागाच्या अख्यारित येणाऱ्या सर्व सरकारी घटकांना बंधनकारक आहे. त्यामुळे कर्नाटकात जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे. तिथं सत्ताधारी भाजपला काँग्रेससह जेडीएसचं प्रमुख आव्हान असणार आहे. हे पाहता कर्नाटकात घट्ट पाय रोवण्यासाठी भाजपाने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यांच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ आणि ७ मे रोजी कर्नाटक दौरा करणार असल्याची शक्यता आहे.
जालना : विरोधी पक्षनेते अजित पवार हे बहुमताच्या बाजूने आल्यास मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक वकतव्य रावसाहेब दानवे यांनी केले. दानवे म्हणाले, अजित पवार हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात.
कर्नाटकच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र भाजपचे नेते स्टार प्रचारक म्हणून कर्नाटकला प्रचारासाठी जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे.
“जोपर्यंत सर्वसामान्यांना न्याय देणार नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,” असा खणखणीत इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.
रेल्वे मध्ये सीईएन ०१/२०१८ असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, त्यात मुंबई आरआरबीच्या पात्र वेटलिस्टवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या आरआरबीच्या उमेदवारांना आरआरबी मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली, यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील वेटलिस्टवर असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती.
"गेल्या वर्षभरात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. मात्र जोपर्यंत आरोपामध्ये काही तथ्य सापडत नाही तोपर्यंत वर्षभरात कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. परंतु आता ईडीला काहीतरी तथ्य सापडलं असेल, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची कारवाई केली.", असे प्रतिपादन गुरुवारी (दि. २६ मे) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यासंदर्भात ते बोलत होते.
नाशिककरांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली नाशिक-कल्याण लोकल सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनशिकायत कार्यालयाने ही लोकल सुरू करण्याबाबतची शक्यता चाचणी करण्याचे (फिजिबिलिटी टेस्ट) निर्देश दिले आहेत. मध्य रेल्वे मंडल रेल प्रबंधकांना तसे पत्र देण्यात आले आहे. याबाबत काय कार्यवाही केली ते रेल्वे राज्य मंत्रालयाच्या कार्यालयाला कळवावे, असे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांची टीका
३० वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांना, उद्धव ठाकरेंना धुणीभांडी म्हणजे ‘हीन’ काम वाटते. तुम्ही काय करता? हे विचारल्यावर एक धुणीभांडी करणारी गरीब महिला अभिमानाने सांगते की, मी चार घरची धुणीभांडी करते. साहेबांनी या महिलेइतकेच प्रामाणिकपणे एकदा सांगावे की, ते काय करतात? काय म्हणता? साहेबांनी पुर्ण कोरोना काळात ‘फेसबुक लाईव्ह’ केले आणि एक-दोनदा स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले आणि मुख्यमंत्रिपदाच्या पूर्ततेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गेले. वा... वा! साहेबांनी खरेच भव्यदिव्य जनकल्याणा
"मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे का हे राज्य सरकारचे आहे" असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केले. "या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश पळून तसेच तसेच राज्यसरकारशी चर्चा केल्यानंतरच तोडगा काढला जाईल" असेही दानवे यांनी स्पष्ट केले
ऐतिहासिक ठाणे स्थानकावरील भार हलका करण्यासाठी मनोरुग्णालयानजीक नविन विस्तारीत ठाणे रेल्वे स्थानक रेल्वेच्या सहकार्याने उभारण्याचे ठाणे महापालिकेच्यावतीने ठरवण्यात आले.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार आणि नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी घेतली भेट
ईशान्य भारताच्या नागालँडमध्ये शोखुवि गाव तसं धावपळीच्या गजबजलेल्या शहरांपासून कोसो दूर... मात्र, केंद्र सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत अंतिम घटकांना प्रमुख प्रवाहात आणण्याचा विचार आहे. नागालँडच्या शोखुवि गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रेल्वे पोहोचली.
गांधी जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे स्वच्छता अभियान, पदयात्रा, खादीचा प्रसार असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपशी पुन्हा जवळीक साधणारे एक वक्तव्य केले. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवेही देखील मंचावर होते. त्यांनी देखील आपल्या भाषणावेळी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी काही मंत्री राजीनामा देतील, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली
मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग कुणाच्या हातात यावरून राज्यकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा शरद पवारांना सणसणीत टोला
खा. रावसाहेब पाटील दानवे यांचा निरुपम यांना टोला
भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणूक स्वत:च्या ताकदीवर लढते. जळगाव मनपाच्या निवडणुकीतही भाजपा ५१ पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी २६ जुलै रोजी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांच्या तीन जाहीर सभा जळगाव शहरात होणार आहेत.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १, २ व १६ मधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ २२ रोजी सकाळी ८ वाजता आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते वाढविण्यात येणार आहे. पंचमुखी हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम होईल.