पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत त्यांच्या दोन्ही बाळांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत २४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
Read More
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या दोन्ही मुलींचे पालकत्व स्विकारण्याची मागणी करण्यात येत आहे.
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
भविष्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारख्या घटना घडू नये यादृष्टीने विशेष नियमावली तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ५ एप्रिल रोजी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी आमदार अमित गोरखे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
(Tanisha Bhise death case) भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे आपला जीव गमवावा लागला. तनिषा यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला थेट मंत्रालयातून फोन आला होता. मात्र, तरीही रुग्णालायाने तनिषा यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तनिषा यांची नणंद प्रियंका पाटील यांनी केला आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच दोन लेकरे जन्मत:च आईच्या मायेला पोरकी झाली, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर संताप व्यक्त केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेने जीव गमावला असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
(Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.