देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची सुत्रे नोएल टाटा यांच्याकडे सोपविण्यात आली. नोएल टाटा यांनी टाटा समूहाच्या नेतृत्वात नवा महत्त्वपूर्ण बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. दि. ०१ नोव्हेंबर रोजी नोएल टाटा यांचा टाटा सन्सच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
Read More
देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी टाटा ग्रुपकडून शेअर बाजारात आपली कंपनी सूचीबध्द करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. टाटा ग्रुपने कंपनी सूचीबध्द न करता २० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाची ४१० अब्ज डॉलर होल्डिंग कंपनीकडून एनबीएफसी नोंदणी प्रमाणपत्र आरबीआयकडे सादर केले आहे.
टाटा इलेक्ट्रॉनिकसने देशात चिप उत्पादनात मोठी गुंतवणूक केली आहे. आसाम राज्यात टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट या अंतर्गत आसाममधील जागीरोड येथे प्लांट उभारणार असून याचे भूमीपूजन सोहळ्याकरिता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
टाटा कॅपिटल ही टाटा समुहातील वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे.' ET Now 'ने दिलेल्या बातमीप्रमाणे टाटा कॅपिटल लवकरच कंपनीचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे.
टाटा सन्सने TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) मधील आपले ९००० कोटींचे भागभांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्सने हे समभाग (शेअर) विक्रीचा धोरणात्मक निर्णय थकित देये (Debts) देण्यासाठी घेतला असल्याचे समजले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने आपल्या १५० अब्ज डॉलर मूल्यांकनात फेरबदल (Restructuring) करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमांच्या सुत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे आरबीआयच्या अप्पर लेयर मधील एनबीएफसी नियमांनुसार नोंदणी टाळण्यासाठी कंपनी आपल्या बॅलन्सशीटमध्ये नव्याने बदल करणार आहे.
२५ ऑगस्टला नवी दिल्लीत झालेल्या B २० तीन दिवसीय समिटमध्ये बोलताना टाटा सन्स चे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या पीएम गतीशक्ति योजना, प्रोडक्ट लिंक इन्सेंटीव्ह, लो कॉर्पोरेट टॅक्स, शिवाय स्टार्ट अप आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमधून देश जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. देशाने जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान जागतिक पातळीवर मजबूत केले आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी महाराष्ट्रदेखील आपले योगदान देण्यासाठी सज्ज होत असून महाराष्ट्राची इकोनॉमी एक ट्रिलियन करण्याच्या दृष्टीने सरकार सज्ज आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीची पहिली बैठक सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी झाली त्यानंतर ’सह्याद्री’ या
टाटा या १५० वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या कंपनीचे आतापर्यंत ८ अध्यक्ष झालेले आहेत. परंतु या कंपनीच्या इतिहासात फक्त ८ वे अध्यक्ष हे पारशी समाजातले नव्हते आणि त्यांच्या परिवारातील कोणीही उद्योजक नव्हते, ते एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आले होते.ते आहेत 'एन चंद्रशेखरन'. २०१७ पासून या विशाल कंपनीची धुरा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या 'एन चंद्रशेखरन' यांची नुकतीच पुढील ५ वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांची पुन्हा एकदा टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी निवड करण्यात आली
१०० व्हेंटिलेटर्स आणि १० कोटी रुपयांचा निधी आणि २० रुग्णवाहिका महाराष्ट्राच्या मदतीसाठी!
वित्तीय सल्लागार सुहेल सेठ याच्यासह टाटा सन्सने केलेला करार रद्द केला आहे. मी टू मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्याच्याशी ३० नोव्हेंबरनंतर कोणतेही व्यवहार करणार नसल्याचे टाटा सन्सने म्हटले आहे.