Social

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात सीबीआय चौकशीला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला तात्पुरता दिलासा

(West Bengal Teacher Recruitment Scam) पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळा प्रकरणातील सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात, कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाच्या शिक्षकांची २५ हजार अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या निर्णयाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी रद्द केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला दिलासा मिळाला आहे.

Read More

सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्कता आवश्यक

गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्‍यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी

Read More

टोरेस कंपनीचा गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा! काय आहे संपूर्ण प्रकरण?

(Torres Company Fraud) करोडो रुपये घेऊन मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे सगळे पैसे घेऊन पसार झाल्याचे समजते आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला १० टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. कंपनीने अश्या स्वरुपाची अनेक आमिष

Read More

७८ लाख ७० हजार रुपयांचा १ बिटकॉईन! महाराष्ट्रात निवडणूकीसाठी झाला वापर! सुप्रिया सुळे-नाना पटोलेंवर आरोप

(Supriya Sule) "गौरव तुम्ही माझ्या फोनचे उत्तर का देत नाही, आता निवडणूका घोषित झाल्या आहेत. आम्हाला बिटकॉईन तातडीने हवे आहेत. आता बिटकॉईनची जी किंमत आहे त्यानुसार त्याला चांगली किंमत मिळणार आहे. तुमच्याकडे बिटकॉईनची रोख रक्कम तुमच्याकडे आहे. मला पैसे हवे आहेत, गुप्ता कुठे गायब आहे. मला माहिती नाही पैशांची गरज आहे," राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या आवाजाशी साधर्म्य असलेल्या एका ऑडिओ क्लीपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Read More

सुप्रिया सुळेंवरील आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, "तो आवाज माझ्या बहिणीचा...."

(Ajit Pawar) बारामतीमध्ये काटेवाडी येथे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यान

Read More

अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही

Arvind Kejriwal bail अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही

Read More

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना जामीन! तुरुंगाबाहेर येणार?

दिल्ली मद्य घोटाळ्यातील आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला. केजरीवालांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. केजरीवालांनी ईडीच्या अटकेला कोर्टात आव्हान दिले आहे. ईडीने मनी लाँड्रींग प्रकरणात २१ मार्च रोजी केजरीवालांना अटक केली होती. दरम्यान केजरीवाल यांची सुटका होणार नसल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. केजरीवाल सीबीआयच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतरच जामीन मिळण

Read More

केजरीवाल तूर्तास तिहारमध्येच राहणार!

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी मद्य घोटाळ्यातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या सुटीकालीन खंडपीठाने सांगितले की, ईडीच्या स्थगिती अर्जावर आदेश देण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील. न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे की, यादरम्यान याचिकाकर्ता आणि प्रतिवादी सोमवारपर्यंत लेखी उत्तरे दाखल करण्याचे स्वातंत्र्य असेल. न्यायालयाने ईडीच्या स्थगिती अर्जावर आणि केजरीवाल यांना सत्र न्यायालयाच्या आदेशाला

Read More

अरविंद केजरीवाल उद्या येणार तुरुंगाबाहेर; न्यायालयाकडून जामीन मंजूर!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस व्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर दिला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा तुरूंगात जावे लागले होते. जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने 48 तासांचा वेळ मागितला आहे. शुक्रवारी कर्तव्य न्यायाधीशांसमोर हे युक्तिवाद करता येतील, असे न्यायालयाने सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मे महिन्यात लो

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121