नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस जसजसा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू लागतो, त्याच प्रमाणात महाराष्ट्रातील विशेषतः राज्याच्या पश्चिम भागात वसलेल्या गडकोटांवर पावसाळी पर्यटनासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागते. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगररांग. या सह्याद्री पर्वतरांगेत असणार्या गडकोटांवर हौशींची गर्दी पावसामुळे वाढू लागली. पुणे जिल्हाही त्याला अपवाद नसून, शहरालगतचा सर्वांत प्रसिद्ध गड किंवा ज्या ठिकाणी पर्यटनासाठी सहजरित्या पोहोचता येत
Read More
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होमार असून या निमित्ताने काही दिवसांपूर्वी ‘सुभेदार’च्या संपुर्ण टीमने सिंहगडावर जात तानाजी मालूसरेंच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यावेळी अभिनेता चिन्मय मांडलेकरने सिंहगडावरची त्याची आठवण सांगत माझ्या जीवनातील मी पाहिलेला पहिला गड म्हणजे सिंहगड होता असे सांगत पहिल्यांदा सिंहगड मुलीला दाखवताना तिला खांद्यावर बसवून फिरवले होते, अशी आठवण चिन्मयने ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितली.
सिंहगड किल्ला घेरा परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचे दिसून आला. बिबट्या दिसल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. सिंहगडाच्या जंगलातील मोरदरवाडी भागामधील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भांबुर्डावन विभाग आणि घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीच्या पथकाने मोरदरवाडी भागास भेट देऊन पाहणी केली.
उन्हाळा सुरु झाला की डोळ्यासमोर येतात ते आंबे. आंबा हा सर्वांनाच आवडतो. पण याचे सुरुवातीचे भाव हे काही सर्वांनाच परवडणारे नसतात. पण, पुण्यातील गौरव सणस नावाच्या व्यक्तीने चक्क EMI वर आंबे विकण्याची आयडिया केली आहे.
राष्ट्रीय विचारांची जोपासना व्हावी, या विचाराने प्रेरित होऊन २०१० साली सिंहगड रोड भागात काही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व्याखानमालेचे आयोजन केले आणि आजवर ही वाटचाल यशस्वीपणे अव्याहत चालू आहे. यातून संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी ‘स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान’ची स्थापना केली. नुसते एवढ्यावर न थांबता विविध आयामांत संस्थेचा विस्तार केला. आरोग्य शिबिरे, दवाखाना, नैपुण्य वर्ग, किशोरी दर्पण वर्ग, अभ्यासिका असे अनेक उपक्रम सुरू केले.‘कोविड’सारख्या कठीण काळात न थांबता संस्थेचे उपक्रम चालू ठ
पुणे वनविभागाने शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत स्टॉल जमीनदोस्त केले. पहाटेच्या या मोहिमेत हे बांधकाम पाडण्यात आले. किल्ल्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य नष्ट होते, असे पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केले. स्टॉलधारकांना वनविभागाच्या निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत किल्ल्यावर स्थलांतरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दिवाळीसणानिमीत्त देशभरात उत्साहाचे वातावरण असते. अनेक जण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ऐतिहासिक ठिकाणांना, धार्मिक स्थळांना भेट देत असतात. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे दिवाळी हवी तशी उत्साहात साजरी झालेली दिसली नाही. त्याची कसर पुणेकर नागरिकांनी ह्या वर्षी भरून काढली आहे असं म्हणता येईल. सिंहगड हा पुणे शहराजवळील किल्ला. दरवर्षी सुट्टीच्या निमित्ताने राज्यभरातील लोक सिंहगडावर गर्दी करत असतात. ह्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने सिंहगडावर २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती समोर येत आहे. सिंहगडावर
जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा काही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती
तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी २६ जुलै ते ९ ऑगस्ट हे १५ दिवस वेळापत्रकांमध्ये बरेच फेरबदल
कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून पंधरा मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री कात्रज भागात सिंहगड संस्थेची संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत सहा मजुरांचा मृत्यू झाला. यात इतर पाचजण जखमी आहेत.