Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी आपला निवाडा दिला आहे, हे वास्तव उद्धव ठाकरे यांना स्वीकारावेच लागेल. आता बाळासाहेबांच्या आवाजाची मदत घेऊनही त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. कारण, त्यांनी आपल्या हातानेच हा वारसा धुडकावून लावला आहे.
Read More
Bhaskar Jadhav ‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ अशी उबाठा गटाच्या भास्कर जाधव यांची गत. पण, त्यांची कुकर्मे विसरून जातील, इतके महाराष्ट्रातील लोक विसरभोळे नाहीत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी त्यांनी ना ना तर्हेचे प्रयत्न करून पाहिले, पण ते अयशस्वीच ठरले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या घटिकेपर्यंत ते आशावादी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शेवटपर्यंत पायघड्या घातल्या, भर सभागृहात त्यांचे तोंडभरून कौतुक वगैरेही केले. देवाभाऊ राग विसरतील आणि पदरात घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती.
निवडणूक जवळ आली म्हणून ‘लाडकी बहीण’ दिसते. १ हजार, ५०० रुपये देऊन कोणाचे घर चालते, हे सांगावे.” इति उद्धव ठाकरे. अर्थात, पैशाची किंमत कोणाला? ज्यांना कमतरता आहे त्यांना! तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना १ हजार, ५०० काय, १५ कोटी रुपयेदेखील चिल्लरच वाटतील. १०० कोटींचे प्रकरण ज्यांच्या सत्ताकाळात घडले, त्यांना १ हजार, ५०० रुपयांची काय कदर? काही लोक म्हणतात, उद्धव ठाकरेंना हे विचारण्याचा अधिकार आहे. कारण, त्यांच्या ३४ वर्षांच्या ‘लाडक्या बाळा’ची संपत्ती २३ कोटी आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सोबत्या
( Sunil Raut ) विक्रोळी मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
( Shaina NC ) शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन.सी. यांनी मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. १ नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांच्याविषयी बोलताना अपमानास्पद शब्दप्रयोग केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीच्या अवघ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फुटीरतावादी आणि हिंदूंविरोधी शक्तींना अभय दिल्याचेच दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा मविआचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यास, तुष्टीकरणाचे राजकारण कळस गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेला गुंता सुटण्याचे काही नाव नाही. जवळपास महिनाभर चर्चेच्या फेर्या झडल्यानंतर अखेर बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी त्यांना केवळ २५५ जागांवरील फॉर्म्युला जाहीर करता आला. त्यानुसार, काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या वाट्याला प्रत्येक ८५ जागा येणार आहेत.
( Sindhudurg ) ग्रामपंचायतीची निवडणूक असो, वा विधानसभा किंवा लोकसभा. तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच! नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला,तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले. लोकसभेतील या विजयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे. कणकवली आणि सावंतवाडीच्या जो
( Shetkari Kamgar Paksh in Raigad Vidhansabha ) लोकसभा निवडणुकीत ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठिंबा दिला होता. “कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू,” अशी हमी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र, दोन्ही मतदारसंघांतून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. विशेषतः रायगडमधून अनंत गीते यांचा झालेला पराभव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जि
( Congress vs UBT ) राज्यात अखेर बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी भाजपने पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे बोलले जात आहे.
जागावाटपाचा वाद विकोपाला! काँग्रेस बाहेर पडणार? l Congress l MVA
Nana Patole यांची तक्रार फक्त उद्धव ठाकरेंनीच केली असं नाही? यात नानांच्या काँग्रेसमधल्याच राजकीय विरोधकांचाही सामावेश आहे...
( Pravin Darekar ) उबाठाला आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सगळे केंद्रीय नेते मातोश्री दरबारी येत होते. परंतु अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे दिल्लीच्या चरणी लोटांगण घालत होते. नाना पटोलेंच्या वादाच्या निमित्ताने चेन्नीथला यांना मातोश्रीवर यावे लागले यात उद्धव ठाकरे खुश राहणार आहेत. परंतु संजय राऊत यांनी लगेच पलटी मारली आहे. गिर गया तो भी टांग उपर, अशी त्यांची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
( Shivsena UBT )'उबाठा' गटाने शिवडी आणि चेंबूरच्या विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्याच्या हालचाली सुरू केल्याने, बंडाळीचे संकेत मिळत आहेत. अजय चौधरी आणि प्रकाश फातर्फेकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे कळते.
( MVA ) ज्या बैठकीत नाना पटोले असतील त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकही नेता उपस्थित रहाणार नाही, अशी स्पष्ट आणि उघड भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. जागावाटपात सुरू असलेल्या वादामुळे ही ठिणगी पडली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाना पटोलेंमुळे काँग्रेस आणि उबाठा गटात वारंवार ठिणग्या पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. मात्र, ही उघड भूमिका ऐन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पुढे जाणार नसल्याच
हरियाणा विधानसभेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत प्रचंड कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हरल्याची जितकी खुशी भाजपला झाली नसेल, तितकी 'उबाठा' आणि शरद पवार गटाला झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतंय. महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे? जागावाटपाची बोलणी कुठवर आली आहेत? कोणाला किती जागा सुटणार आहेत? याचा आढावा.
( Sanjay Raut ) मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिली आहे.
सध्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, तिकडे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्ननुसार ‘गद्दार’ शब्दाचा चोथा करून टाकला. आपले चांगले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले, शिवसेना संपवायला निघालेल्या आणि तिकडे बसून सत्तेची पदे भोगणार्यांना पक्षात परत घेणार नाही. मात्र, अनेकजण धाक आणि दिशाभूल झाल्याने तिकडे गेले असून, मोहजालामुळे तिकडे गेलेल्यांचे आता डोळे उघडत आहेत. अशांना पुन्हा पक्षात परत घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मांडले. तसेच, अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी
(Pravin Darekar) उद्धव ठाकरे हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात. ठाकरेंना फक्त तोंडाच्या वाफा घालवायच्या आहेत. त्यामुळे ते आणि संजय राऊत वाटेल ते बरळत असतात, अशी टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी केली आहे.
(Sanjay raut) उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेला शिवसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. “संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही तर, सोनिया मातेला मानणारे आहात. राऊत आता केवळ तुमची सुंता करायची बाकी राहिली आहे. खुर्चीसाठी तुम्ही तेही करणार आहात, यात काहीही शंका नाही,” असा टोलाही खा. म्हस्के यांनी राऊत यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
(Asim sarode)“बदलापूरसारख्या संवेदनशीलप्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून, ते सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हीझम करतात,” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी केली. “चिमुरड्यांवर अत्याचार करणार्या नराधम अक्षय शिंदेचा सरोदे यांना एवढा पुळका का आला?” असा सवाल त्यांनी केला.
Congress काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेचाच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा केली. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त राहणार असल्याचं विधान केलं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे एकटे पडलेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, ते या व्हिडीओतून जाणून घेऊया.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस (Congress)आणि शिवसेना उबाठा गट (Shivsena UBT) यांच्यात मुख्यंमत्रिपदासाठी सामना रंगताना दिसत आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी काँग्रेसला जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यावरून डिवचले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संजय राऊतांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीकडे लक्ष वेधले आह
(Sushma andhare) शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘बिग बॉस’मधील एका व्हायरल विधानाचा वापर करत हे खड्डेमय रस्ते महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नसून भारतातीलही नाही, तर थेट चार वर्षांपूर्वीचा चीनमधील आहे. भाजप महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोस्ट केलेल्या या व्हिडिओमार्फत सुषमा अंधारे यांनी पसरविल्या ‘फेक नॅरेटिव्ह’ची पोलखोल केली आहे. विशेष म्हणजे नेटकर्यांनीही याबाबत माहिती देऊनही सुषमा अंधार
बाळासाहेबांचे पुत्र हेच ज्यांचे एकमेव कर्तृत्व आहे, त्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी पुन्हा आपली वर्णी लागावी, यासाठी नुकतेच दिल्लीला जात, सोनिया-राहुल यांच्यासमोर लोटांगण घातले. महाराष्ट्रातील लाखो भगिनींसाठी ‘लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली, तिला अर्थातच ठाकरे आणि पवार कंपनीने विरोध केला आहे.