ग्रामीण भागात वाचन संस्कृती विकसित व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात १० वाचनालये या कल्पनेतून दीडशे ग्राम वाचनालये निर्माण करण्यात आली असून यामुळे ग्रामीण भागात वाचन संस्कृतीला बळ मिळणार आह़े असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मिशन कोहिनूरमध्ये वाचन स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्याचा वाचनातील मिशन कोहिनूर निवडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दीडशे ग्रामवाचनालयांचं उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
Read More