भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री (सोमवार, १२ मे) ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अधिकृतरित्या बोलणार असल्याने ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read More
( Narendra Modi on WAQF )“वक्फ’च्या ताब्यात हजारो एकर जमीन असतानाही त्याचा मूठभरांनी केवळ गैरवापर केला. म्हणून मुस्लीम समाजातील तरुणांना सायकलचे पंक्चर काढण्याची वेळ आली,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हरियाणातील हिसार येथे केला.
( Prime Minister Narendra Modi on Jain literature ) “जैन साहित्य हा भारताच्या बौद्धिक वारशाचा आधार आहे आणि हे ज्ञान जतन करणे आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी केले आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात नवकार महामंत्र दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
( narendra modi on Rashtriya Swayamsevak Sangh ) “राष्ट्रीय चेतनेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी 100 वर्षांपूर्वी पेरलेले विचाराचे बीज आज एका मोठ्या वटवृक्षाच्या रूपात जगासमोर आहे. तत्त्व आणि आदर्श या वटवृक्षाला उंची देतात. लाखो स्वयंसेवक त्याच्या फांद्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सामान्य वटवृक्ष नसून भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे. आज तो भारतीय संस्कृतीला, आपल्या राष्ट्राच्या चेतनेला सतत ऊर्जा देत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित करून आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. यावेळी महिलादिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे, जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असणार आहे. या खासप्रसंगी, मी माझे ’एक्स’ आणि ’इंस्टाग्राम’सारखे सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पं
२०३० पर्यंत देशातील कापडनिर्यात तिपटीने वाढून, ती नऊ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. आज भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा कापड निर्यातदार देश आहे. येणार्या काळात तो स्पर्धक देशांना मागे टाकेल, तसेच त्याद्वारे अधिकाधिक रोजगाराला चालना देईल, असे म्हणूनच म्हणता येईल.
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट निर्णय म्हणजे, बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान मोदींच्याच हातात असल्याचं दिसतंय... #NarendraModi #DonaldTrump #MuhammadYunus #Bangladesh #USA #India #Hindu #News #MahaMTB
“दिल्लीत यंदा भाजपलाच बहुमत मिळेल,” असा अंदाज अॅक्सिस माय इंडिया च्या आणि ‘टुडेज चाणक्य’ या दोन मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी समोर आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांचे ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपलाच बहुमत दाखविण्यात आले आहे, तर आपला सत्ता गमावावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Wayanad Landslides विशेष प्रतिनिधी केंद्र सरकार वायनाडच्या पाठिशी असून पिडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे "करिअरच्या नव्या दिशा" हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. लोढा यांच्या हस्ते "करिअरच्या नव्या दिशा" या पुस्तकाचे मुंबई महापालिका येथे प्रकाशन झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. मंत्री लोढा म्हणाले की, "राज्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने राज्याचा कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विभाग गतिमानतेने कार्य करीत आहे. विविध प्रकारचे उपक्रम राबवित आह
कधीकाळी भारताची अन्न सुरक्षा हा जागतिक चिंतेचा विषय होता, मात्र आज भारत जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी उपाय मांडणारा देश झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेस संबोधित करताना शनिवारी केले. देशात याआधी ६५ वर्षांपूर्वी झालेल्या कृषी अर्थतज्ज्ञांच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली.
वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर विविध धार्मिक कॉरिडॉरची उभारणी करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नमो एक्स्प्रेस सोडण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि.11 जुलै रोजी अर्थतज्ज्ञांच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केले. यावेळी मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पातील अपेक्षांविषयी चर्चा झाली. बैठकीत 10 भागधारक गटांमधील 120 हून अधिक निमंत्रित, तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ, कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, एमएसएमई, व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थशास्त्रज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शहरी क्षेत्र या बैठकीत स
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींनी मुंबईत रोडशो आणि दादरच्या शीवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे निकालानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. १३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्य सरकारचा महत्त्वकांशी असलेला गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरीवली-ठाणे लिंकरोड भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.
देशातील विविध घटकांच्या मनात पुढील पाच वर्षे विविध कारणांनी क्षोभ कसा निर्माण होईल, याची काळजी या ‘इकोसिस्टीम’कडून नक्कीच घेतली जाईल. ‘नीट’ आणि ‘युजीसी नेट’मधील गैरप्रकार ही तर सुरुवात आहे. कारण, या ‘इकोसिस्टीम’ला भारतीय जनतेच्या मनात काहीही करून नरेंद्र मोदी ही व्यक्ती आता देश चालवू शकत नाही, असे ठसवायचे आहे. त्यासाठी देशातील विविध व्यवस्थांना लक्ष्य करण्याचा प्रकार पुढील पाच वर्षे चालू ठेवला जाईल. परिणामी, मोदी सरकारला 2014 आणि 2019 पेक्षाही अधिक सावध पाऊले टाकत वाटचाल करावी लागणार आहे, हे निश्चित!
अर्थकारणाच्या स्थैर्यासाठी कुठलाही नकारात्मक बदल होणार नसल्याचे अर्थतज्ज्ञांनी कयास मांडला आहे. भारतीय जनता प्रणित एनडीए प्रणित सरकार बहुमताने आले नसले तरी गठबंधन सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कुठलाही धोरणा त्मक बदल होणार नाही.'मोदी झुकेगा नहीं मोदी रुकेगा नही ' असेच सुतोवाच तज्ञांनी केले आहे. पीएलआय योजना,औद्योगिक उत्पादन, मूलभूत सुविधा, भांडवली खर्च अशा अनेक योजना त्याच वेगाने आणत दुसरीकडे जनतेसाठी कल्याणकारी योजना यांचा समावेश कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले असून येत्या ४ जूनला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज समोर येणार आहे. सायंकाळी ६:३० नंतर एक्झिट पोल स्पष्ट होतील. त्यानुसार, लवकरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात नेमकी बाजी कोण मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसच्या घोषणा आणि विषयसूची सामान्य माणसाची पकड घेऊ शकत नाहीत. विषय चांगले आहेत, पण त्या विषयामागच्या भूतकाळातले विषय वाईट. याउलट मोदींचे आहे. मोदी भूतकाळाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ते वर्तमानकाळाचे आणि भविष्यकाळाचे प्रतिनिधित्व करतात. लोकांपुढे ते स्वप्न ठेवतात. स्वप्न साकार करण्याची योजना ठेवतात, दहा वर्षांचा त्यांचा जमाखर्च लोकांपुढे आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण जग आज नवा भारत पाहत आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या विजयाची गुढी आपण उभारणार आहोत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदींच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे", असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
बाळासाहेबांव्यतिरिक्त कोणाच्याही हाताखाली मी काम करणार नाही. तरीही एकाला (उद्धव ठाकरे) संधी दिली होती. पण त्याला समजलेच नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार. कारण हे अपत्य मी जन्माला घातले आहे. आज १८ वर्षे झाली, फोडाफोडीची गोष्ट कधीही मनाला शिवली नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
भारताच्या संरक्षण निर्यातीने २१,०८३ कोटी रुपयांची सर्वोच्च निर्यात नोंदवली. कोणे एकेकाळी शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सर्वोच्च आयातदार देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संरक्षण उत्पादनांची निर्यात करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. केंद्र सरकारच्या धोरणात्मक उपाययोजनांना आता गोमटी फळे मिळू लागली असून, त्याचा फायदा निर्यातवाढीत प्रतिबिंबित झालेला दिसतो.
तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी एएनआय पॉडकास्टमध्ये हिंदुत्वावर भाष्य केले आहे. कर्नाटक पोलीस दलात आयपीएस अधिकारी म्हणून के अण्णामलाई यांनी एक काळ गाजवला आहे.
केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनंतर सुधारित नागरिकत्वासाठी पात्र नागरिकांना अर्ज करण्यासाठी स्वतंत्र अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अर्ज करण्याकरिता CAA मोबाइल ॲप लाँच केले आहे.
देशातील गरिबांच्या लोकसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे, ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने म्हटले असून, भारतात आता तीन टक्क्यांपेक्षाही कमी जनता ही दारिद्य्ररेषेखाली आहे, असे तिचा अहवाल सांगतो. ‘जागतिक बँके’चेही तेच म्हणणे आहे. नीती आयोगाने काही दिवसांपूर्वीच याची घोषणा केली होती. तथापि, काँग्रेसने नीती आयोगाची खिल्ली उडवली होती. राहुल गांधी यांच्या मते, भारतात आजही बेरोजगारी आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेली आहे. अमेरिका, चीन पाठोपाठ भारताचा क्रमांक आहे. दहा वर्षांपूर्वी भारताच्या १८ टक्के भागात वीजपुरवठाही नव्हता, इंटरनेट तर दूरची गोष्ट होती. अशा विपरित परिस्थितीत भारत सरकारने त्यासाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी करत, ‘डिजिटल भारता’चा पाया घातला. त्याचीच गोमटी फळे आता मिळू लागली आहेत.
छत्रपतींच्या घराण्याकडुन देण्यात येणारा पहीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व या वर्षी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण होण्याच्या निमित्ताने सातारा येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
केंद्र सरकारकडून देशातील युवा आणि सर्वसामान्य, गरीबांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यात येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतरिम बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करणार आहेत. अंतरिम बजेट सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील चार प्रमुख घटकांकरिता म्हणजेच तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्या विकासासाठी सरकारकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत.
काँग्रेस पक्षाने आपणहून रामाची सर्व जागा भाजपला देऊन टाकली आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे. कोणताही राजकीय पक्ष स्वभावत: राजकीय लाभहानीचा विचार करूनच कार्यक्रम करतो. राजकीय पक्षाचा कार्यक्रम रामभजन करून पुण्यप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीचा असू शकत नाही. त्यांच्या दृष्टीने पुण्य फळ म्हणजे दिल्लीची सत्ता आणि मुक्ती म्हणजे काँग्रेसपासून देशाची मुक्ती! काँग्रेस पक्षाने हे दोन्ही मार्ग भाजपसाठी सोपे करून ठेवायचे, असे ठरविलेले दिसते. याला ‘आत्मघाताचे राजकारण’ असे म्हणतात.
"श्रीरामाचे मंदिर हे केवळ आपल्या आराध्य देवतेच्या पूजेचे ठिकाण आहे असे नाही; तर तो भारताची पवित्रता आणि प्रतिष्ठेची स्थापना पक्की होण्याचा प्रसंग आहे. अशा भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला अयोध्येत संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मान्यवर व्यक्तींना निमंत्रण देण्यात येत आहेत. दरम्यान, ज्यांनी 'रामलला आम्ही येऊ, तिथे मंदिर बांधू' असा नारा त्यावेळी दिला होता त्यांनाही अभिषेकचे आमंत्रण मिळाले आहे. ती व्यक्ती म्हणजे कारसेवक बाबा सत्यनारायण यांची भेट घेऊन त्यांना प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल 'इझ माय ट्रिप'ने लक्षद्वीपसाठी बुकिंग सुरू केले असून 'नेशन फर्स्ट', 'भारत फर्स्ट' दोन 'कूपन कोड' वापरून ग्राहकांना भरघोस सवलत मिळणार आहे. 'नेशन फर्स्ट', 'भारत फर्स्ट' या माध्यमातून सवलत कोड जाहीर केले आहेत. दरम्यान, मालदीवकरिता जाणाऱ्या सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत.
एकही रुपया खर्च न करता, भारताने मालदीवला सपशेल शरणागती पत्करण्यास भाग पाडले. पंतप्रधान मोदी यांचा केलेला अवमान भारतीयांनी सहन केला नाही. मालदीवचा आर्थिक कणाच त्यांनी मोडला. मालदीवचा पर्यटन उद्योग आज धोक्यात आला आहे. युद्धाने कोणतीही समस्या सुटत नाही, हे स्वतः मोदी वारंवार सांगतात. आता त्यांनी कृतीतून ते मालदीवला दाखवून दिले आहे.
भारतविरोधी भूमिका घेतल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवच्या भारतातील उच्चायुक्तांना पाचारण केले आणि अवघ्या चारच मिनिटात त्यांना समज देऊन रवानाही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब यांना सकाळीच पाचारण केले होते.
बाळासाहेबांचे सुपुत्र त्यांच्या पिताश्रींचे एकच वाक्य अनेक वेळा उच्चारीत असतात. पण, बाबरी घुमटावर चढलेल्या कारसेवकांचीही छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यातील शिवसैनिक कोण होता? हे उद्धव ठाकरे कधीही सांगत नाहीत; कारण, त्यात एकही शिवसैनिक नव्हता. न केलेल्या कामचे श्रेय लाटण्याचा हा हास्यास्पद प्रकार आहे. कारागृहात गेले संघ विचारधारेचे कार्यकर्ते, गोळ्या खाल्ल्या संघ विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी, कष्ट सोसले संघ विचारधारेतील कार्यकर्त्यांनी; परंतु ते कधीही आपल्याकडे श्रेय घेत नाहीत. ही त्यांची महानता आहे!
राम मंदिराच्या लोकार्पणाला निमंत्रण प्राप्त झाले असतानाही अयोध्येला दर्शनासाठी जावे अथवा नाही, अशी काँग्रेसश्रेष्ठींची द्विधा परिस्थिती. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदांनी राम मंदिर लोकार्पणावरुन केलेली शेरेबाजी आणि दुसरीकडे कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आम्ही राम मंदिराच्याच बाजूने असल्याचा केलेला दावा, यावरुन काँग्रेसची संभ्रमावस्थाच अधोरेखित व्हावी.
'आयुष्मान भव अभियानां'तर्गत देशभरात ५ कोटींहून अधिक आभा खाती तयार करण्यात आली आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिर मेळावा आणि सामुदायिक आरोग्य केंद्र मेळावा अशा एकूण १३ लाख ८४ हजार ३०९ आरोग्य मेळ्यांव्यांना भेट देणाऱ्यांच्या संख्येने एकूण ११ कोटींची पल्ला गाठला आहे.
येत्या नवीन वर्षात दि. २२ जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील काही नेत्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, "मी देव धर्म पूजे अर्चेपासून मी दूर असतो!" असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी सुमारे 11:15 वाजता पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.
श्रीराम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिर शिल्पकलेचा देदीप्यमान वारसा म्हणजे श्रीराम मंदिर!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ४० वर्षांत प्रथमच आसाममधील सशस्त्र बंडखोर संघटना उल्फाने केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकारसोबत शांतता करार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हा जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटले आणि प्रभू श्री राम मंदिरही तयार झाले. हे केवळ मंदिर निर्माण नाही, तर नव्या भारताची सुरुवात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्य निर्माणाचा प्रारंभ आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या क्षणाला ऐतिहासिक बनविण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशातील नामवंत लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पुण्यातील केशव शंखनाद पथकालादेखील खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ‘भारतीय न्याय संहिता (द्वितीय) विधेयक २०२३’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय) विधेयक २०२३’ आणि ‘भारतीय साक्ष (द्वितीय) विधेयक २०२३’ मंजूर करण्यात आले. हे कायदे ब्रिटिशकालीन अनुक्रमे ‘भारतीय दंडविधान (आयपीसी)’, ‘भारतीय फौजदारी कायदा (सीआरपीसी)’ आणि ‘भारतीय पुरावा कायदा’ यांची जागा घेणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करणारी ही तीन विधेयके मंजूर करवून घेतली. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गृह
भारतात आजपर्यंत न्याय नव्हे तर दंडास प्राधान्य देणाऱ्या फौजदारी कायद्यांचा अंमल होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत़ृत्वाखाली न्याय, समानता आणि निष्पक्षता असलेल्या कायद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे भारतीय विचारांची न्यायप्रणाली प्रस्थापित होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केले.
भाजप नगरसेवक अतुल शाह यांच्या पुढाकारातून राम मंदिराच्या उद्घाटनावर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याचे लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सदर गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न होते. अशा देशातील करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केले आहे.अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी विश्वहिंदू परिषदेच्या माध्यमातुन घरोघरी अक्षता पोहचवण्याचे काम करण्यात येत आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४० धावा फलकावर लावू शकला.
२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते, ते जगातील सर्वात उंच युद्धभूमी असा लौकिक असलेल्या सियाचीनमध्ये. तेव्हापासून दरवर्षी पंतप्रधान दिवाळी सशस्त्र दलातील जवानांसोबत उत्साहाने साजरी करतात. परिणामी, नागरिकांचाही अशा सैनिक सन्मानासारख्या उपक्रमांमध्ये सहभाग वाढलेला दिसतो. म्हणूनच राष्ट्रवाद जागवणारा हा दीपोत्सव केवळ एक उपचार नव्हे, तर बदलत्या भारताच्या सर्वांगीण कटिबद्धतेचे दर्शन घडविणारा राष्ट्रोत्सवच!