मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
Read More
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
मराठी भाषेवर प्रेम करीत तिला सौंदर्य बहाल करणार्या आणि संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणार्या तपस्विनी शिल्पा सबनीस यांच्याविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला नगराची उपमा दिलेली आहे. ‘अभिजात भाषा’ म्हणून गौरवण्यात आलेल्या आपल्या मराठी भाषेला समजून घेताना, या नगराच्या अंतरंगाशी एकरूप होणेदेखील तितकेच गरजेचे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. काळाच्या पटलावर मराठी भाषासुद्धा अशाच वेगवेगळ्या प्रवाहांमुळे समृद्ध होत गेली. अशा या आपल्या लाडक्या मराठी भाषेला दीड हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. इ. स. ५०
Narendra Modi राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहेत. संघामुळेच मराठी आणि महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विज्ञान भवनातील शानदार कार्यक्रमात केले.
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
मराठी! येत्या २५ वर्षांत मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी ‘मराठी भाषा धोरणा’त व्यवहारक्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत करण्यात येत आहेत. केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर सर्व लोकव्यवहारांचे मराठीकरण होण्याकरिता महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालयांमध्येही आता ‘मराठी’ अनिवार्य केली जाणार आहे. तशी शिफारस भाषा धोरणात करण्यात आली आहे.
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
Marathi language ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना आज दि : ८ जानेवारी २०२५ रोजी जारी केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
मुंबई : “मराठी ( Marathi ) भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी दिली.
(Marathi Language)एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्याच मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची वारंवार गळचेपी होताना दिसते. ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, वाढली त्याच ठिकाणी मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली.
( Nalasopara TC ) मुंबई, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अतूट समीकरण. मात्र, नालासोपाऱ्यातील एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियासह सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपाऱ्यातील एका मुजोर टीसीने रेल्वेमध्ये मराठी भाषेत बोलणार नाही, अशी लेखी हमी एका मराठी दाम्पत्याकडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
( Marathi language )राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन्ही संस्थांच्या मंडळांची पुनर्रचना १५ ऑक्टोबर रोजी झाली. या दोन संस्था काय काम करतात, त्या का अस्तित्वात आल्या, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्थांची गरज सद्यस्थितीत काय? नव्याने झालेल्या संस्थांच्या मंडळांचा उद्देश्य आणि काम नेमकं काय असणर आहे याचा आढावा घेऊयात या व्हिडिओतून.
3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. २०१२ पासून यासाठी प्रयत्न सुरू होते पण एका कारणामुळे मराठी भाषेला तो दर्जा मिळत नव्हता. काय आहे ते कारण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये..
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. आहे. त्यानिमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी भाषेचे प्राध्यापक आणि ‘मराठी अभ्यास परिषदपत्रिका भाषा आणि जीवन’चे संपादक प्रा. आनंद काटीकर यांच्याशी मराठी भाषा, अभिजात दर्जा आणि शिक्षण क्षेत्र या विषयांवर साधलेला हा संवाद..
केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहिर केला आहे. केंद्राच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत केले जात आहे. महत्वाचे म्हणजे मराठीसह पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या भाषांदेखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मराठी कलाकार आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर मराठी कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कित्येक वर्षांपासूनच्या संघर्षाचा हा गोड शेवट जणू सोनियाचा दिवस! नवरात्रीच्या पहिल्या माळेचा मान आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून मिळाला. किती दुग्धशर्करा योग हा! विद्यमान मायबाप सरकारसह यासंदर्भात काम करणार्या अनेकविध समित्यांचे अहवाल व अनेक मान्यवरांसह समस्त मराठी जणांनी केलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाले. या आनंदाच्या क्षणी आपल्यासमोर अभिजात भाषा म्हणजे काय? हे सांगत मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न...
मराठी भाषेचा अभिमान आणि गर्व महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला आहेच. परंतु, आपली मराठी भाषा अधिक श्रीमंत आणि समृद्ध होण्यासाठी विविध माध्यमांच्या वापरातूनच मराठी भाषेची गोडी आणि शिकण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण होईल. यात २१ व्या शतकात समाज माध्यमं फार महत्वाची भूमिका बजावतात. मराठी भाषेचा इतिहास कलात्मक पद्धतीने मांडत तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम अभिनेत्री, दिग्दर्शिक मधुरा वेलणकर ‘मधुरव : बोरु ते ब्लॉग’ या नाट्यविष्कारातून करत आहे. याचबद्दल ‘महाएमटीबी’शी बोलताना मधुरा
अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती मधुरा वेलणकर हिने ‘मधुरव ः बोरू ते ब्लॉग’ हा अनोखा नाट्याविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केला. मराठी भाषा काळानुरूप कशी बदलली, मराठी साहित्यातील स्थित्यंतरे याचे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या त्रिवेणी संगमातून लक्षवेधी सादरीकरण या नाट्यप्रयोगातून केले जाते. तेव्हा, दि. 27 फेब्रुवारीच्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर या अनोख्या नाट्यप्रयोगाविषयी मधुरा वेलणकर हिच्याशी केलेली हा खास बातचीत...
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन आणि मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयातील अनुवादक मराठी गट-क आणि हिंदी अनुवादक गट-क या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
पुढील दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता कोर्टाने व्यापाऱ्यांना दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
माणसं, त्यांची जीवनपद्धती, त्यावर आधारलेली विचारपद्धती एका समूहापुरती न राहता गावं देश जोडत गेली. वाचनसंस्कृतीचा वारसा आपल्याला लाभला आहेच, तो समृद्ध केला अनुवादित साहित्याने. भाषांतरानेही जागतिकीकरण होतं. मूल्यांची, विचारांची देवाणघेवाण होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून जेष्ठ अनुवादक लीना सोहोनी यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
विपुल साहित्य संपदा नावावर असलेले आणि साहित्यातून वाचकांना आरसा दाखविणारे साहित्यिक राम नेमाडे यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया...
"आपल्याला ज्यांनी भाषा दिली, भाषेचे ज्ञान दिलं त्यासोबतच ज्यांनी मोठाले ग्रंथ आपल्याला दिले त्या श्री चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ झाले पाहिजे. ही अतिशय योग्य मागणी असून त्यासंदर्भात लवकरच योग्य ती पावलं उचलली जातील.", असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंगळवारी (३० ऑगस्ट) नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव आणि अखिल भारतीय महानुभव संमेलनादरम्यान ते बोलत होते.
विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत झालेल्या विधेयकानुसार महान व्यक्तींची तसेच गड- किल्ल्यांची नावे राज्यातील दारू विक्री करणाऱ्या दुकानांस देण्यास मनाई करण्यात आलेली आहे
नुकतेच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनाच्या उभारणीची घोषणाही सरकारतर्फे करण्यात आली. तसेच महाराष्ट्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे यावेळी मराठी भाषा मंत्र्यांनी आश्वासित केले. तेव्हा, या पार्श्वभूमीवर व मराठीतील थोर कवी ग्रेस यांच्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मराठी भाषेच्या संपन्न व गौरवशाली परंपरेचा परिचय करुन देणारा हा लेख...
स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणे यांचा कारभार मराठीतूनच झाला पाहिजे या काद्याला पाठींबा देताना या विधेयकावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी जनतेला मराठीतून कामकाज करण्याची सक्ति आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा असा दुजाभाव करणा-या तरतुदी असल्याकडे लक्षवेधत यामध्ये आमदार ॲड आशिष शेलार यांनी सुधारणा सुचविल्या
मराठी माणसासाठी काहीच करायचे नाही, त्याला मरु द्यायचे, एसटी कर्मचाऱ्याला, शेतकऱ्याला आत्महत्या करु द्यायचे आणि इकडे मराठी भाषेच्या नावावरुन गळे काढायचे. पण, शिवसेनेची दुकानदारी यशस्वी होणार नाही, कारण, आता मराठी माणूस पूर्वीपेक्षा अधिक समंजस झालेला आहे.
पालिका शाळांमधील प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन १०० दिवस झाले तरीही सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी या शिक्षकांची नियुक्ती रखडली आहे अशी माहिती समोर आली आहे
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले आणि १९६० साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यावेळी महाराष्ट्रातील शाहिरांनी चळवळीमध्ये दिलेले योगदान हे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी होतेच. पण, त्याचबरोबर मराठी भाषिकांचे राज्य टिकावे, वाढावे यासाठीच होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सहा वर्षांनी स्थापन झालेल्या शिवसेनेने प्रथम कामगारांचे प्रश्न मांडले.
मराठी भाषा आणि मराठी शाळांबाबत भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लहिले पत्र
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी मुद्द्यावरून शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. मराठी भाषा आणि मराठी विद्यापीठाच्या मुद्दयावर आक्रमक होत त्यांनी 'शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले.
मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात जगभरातील मराठीप्रेमींना उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्याबद्दल माहिती देत आनंद व्यक्त केला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी विकसित केलेल्या ‘साहित्यवेदी’ या संकेतस्थळाचे देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून “मराठी भाषेला अभिजात दर्जा” व “आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी साहित्य प्रसार आणि प्रचार” या विषयांवर परिसंवादांचे आयोजन केले आहे.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच जयंत नारळीकर यांच्या रूपाने अध्यक्षपदासाठी वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळाली आहे.
‘मराठी भाषा’ आणि ‘मराठी अस्मिता’ या दोन वेगवेगळ्या बाबी सध्या एकत्र होताना दिसत आहेत. ‘मर्हाटीचे तो गोमटे व्हावे!’ असे छत्रपती शिवरायांनी म्हटले खरे, पण मराठीजनांनी इथली भाषा टिकण्यासाठी काय प्रयत्न केले हेसुद्धा बघावे लागेल. मराठी भाषेचे आंदोलन हे भाषा टिकवण्यासाठी आहे की लिपी टिकवण्यासाठी आहे,
अॅमेझॉन वेबसाईटवर मराठीसाठी हल्लाबोल केल्यानंतर आता मनसेची आयपीएलकडे वाटचाल
मुंबईच्या संघामध्ये झहीर खान देतोय मराठीत प्रशिक्षण
चालू शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली असून अमलबजावणी न केल्यास होणार कारवाई
लोकशक्ती एकत्र करण्यासाठी मराठी भाषेची प्रचंड आवश्यकता टिळकांना जाणवत होती. इंग्रजी राज्यात आम्ही कुठली भाषा बोलावी यावर ब्रिटिशांचे राज्य नव्हते, तरीही आंग्लभभाषेच्या प्रभावाने आम्ही भाषिक पारतंत्र्यच भोगत होतो. म्हणून वाटेल त्या रीतीने देशी भाषांचे महत्त्व टिळकांनी आमच्या कानी कपाळी ओरडून सांगितले. वयाच्या पंचविशीत त्यांनी याच हेतूने मराठी वर्तमानपत्र काढले, देशी भाषेत शिक्षण देणार्या शाळा काढल्या आणि वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही टिळक म्हणत, “मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते, देशी भाषेत मिळाले अ
इस्त्रायलमध्येही महाराष्ट्राचा डंका घुमत असल्याने आपल्या राज्यासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. इस्त्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग चालविले जात असून तेथील नागरिकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे.
मराठी अभिमान गीत, मराठी कविता ऐकायला मिळणार!
मराठी भाषा समृद्ध आहेच. तिचा जागर तिच्यातील गुणवैशिष्ट्यांनी होत असतोच. मात्र, गरज आहे ती मराठी जिवंत ठेवण्याची. त्यामुळे आपण केवळ दिन साजरा न करता मराठी जगविण्याचा निर्धार यानिमित्ताने करणे आवश्यक आहे.
महासंघाकडून ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रम रद्द
आज मातृभाषेत शिक्षण द्यावे की आंग्लभाषेत द्यावे, यावर वाद होत आहेत. मराठी भाषेबद्दल तावातावानेबोलणारे आंग्लभाषेला प्राधान्य देताना दिसतात. कारण, आंग्लभाषेची आपल्या समाजातील व विविध ज्ञानशास्त्रांतील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मराठी भाषेच्या अभिमानाची आपण कितीही वल्गना केली तरी आंग्लभाषेचा वरचढपणा मान्य केल्या वाचून आपल्याला गत्यंतर नसते.
मराठी भाषा जगवा, समृद्ध करा. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत, बंद होत आहेत. शतकी परंपरा असूनही मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळत नाही. इंग्लिश माध्यमांच्या शाळांत मराठी भाषेची सक्ती नाही. मराठी माध्यमांच्या शाळांतून शिकलेल्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही. म्हणून त्यांची टिंगल केली जाते. अशा विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. दुसरं म्हणजे, मराठी भाषेची दुर्दशा होते. त्या भाषेतील शब्द, वाक्यरचना, शब्दार्थ यांबद्दल सामान्य मराठी माणसाला काही देणंघेणं नसतं. या सार्याला आपण मराठी भाषिकच जबाबदार आहोत! मर