३ ऑक्टोबर हा दिवस 'मराठी अभिजात भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Read More
केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला उर्जितावस्था येणार नाही. त्यासाठी मराठी माणसाने या भाषेला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनविला पाहिजे. महाराष्ट्रात, अगदी मुंबईतही समोरची व्यक्ती रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे की इस्त्रीवाला, हे न पाहता त्याच्याशी जेव्हा फक्त मराठीतूनच संवाद साधला जाईल, तेव्हाच मराठी ही सामान्यजनांची भाषा होईल. सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून आता तरी मराठी माणूस सर्वार्थाने मराठीत बोलेल का?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी मने आनंदाने न्हाऊन निघाली. मराठीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यपंढरी असलेल्या या पुण्यनगरीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होत आहे. जाहीररित्या तो साजरा होत असताना तो मनामनांत साजरा होत आहे, ते शब्दातीत.