RG Kar rape case काही महिन्यांआधी प.बंगाल येथील कोलकाता येथे आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एका पीडितेवरील बलात्काराने सारा देश हादरून गेला होता. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. प.बंगाल येथे ममता बॅनर्जींचे तृणमूल काँग्रेस हे सरकार आहे. आता याच सरकारच्या दबावाने पीडितेच्या सरकारी वकील वृंदा ग्रोवर यांनी कोलकाता येथे संबंधित प्रकरणी माघार घेतली आहे.
Read More
RG Kar Medical case आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (RG Kar Medical case) बलात्कार हत्याप्रकरणी भाजप नेते सुवेंदू अधिकारींनी स्फोटक दावा केला आहे. तृणमूल काँग्रेसचा एक नेता पीडितेचा तोतया काका बनून पीडितेच्या मृतदेहाच्या विच्छेदनावेळी आल्याची माहिती सुवेंदू यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विच्छेदनावेळी घाई केली असा दावा सुवेंदू यांनी केला आहे. सीबीआय चौकशीच्या प्रकरणातून समोर आलेल्या डॉक्टरांचा हवाला देत सुवेंदूंनी सांगितले.
तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते स्वपन देबनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिला रात्री दारू प्यायला जातात असे वादर्गस्त वक्तव्य केल्याने अडचणीत साप़डले आहेत. आपल्या मुली रात्री कुठे जातात हे विचारावे, असा दावा त्यांनी केला आहे. आर जी कर वैद्यकीय प्रकरणाविरोधात प.बंगाल येथे पूर्व बंगाल येथील कालना येथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी गरळ ओकली आहे.
RG Kar case रात्रपाळी करू नकोस हे तुम्ही महिलेला सांगू शकत नाही असे म्हणणाऱ्या प.बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. सरकारी महिला डॉक्टरांना रात्री पाळी न ठेवण्याचे निर्देश देणाऱ्या अधिसूचनेवर, त्यांना सवलतीची नव्हे तर सुरक्षेची आवश्यकता आहे. याचपार्श्वभूमीवर कोलकाता आरजी कर वैद्यकीय प्रकरणात ९ ऑगस्ट रोजी डॉक्टरवरील बलात्काराप्रकरणी बंगाल सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे, संपामुळे त्रस्त जनतेची थोडी जरी काळजी ममता यांना असती, तर त्यांनी डॉक्टरांची मागणी मान्य केली असती. मात्र, ममता यांनी डॉक्टरांच्या मागणीला नकार दिला आणि बैठक फिसकटली. आता यावरून ममता म्हणत आहेत की, जनतेच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे.
आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात (RG Kar Medical College Case) झालेल्या घटनेप्रकरणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या हाती लागलेले पुरावे दडपण्याचा आरोप केला आहे,. जाधवपूर येथील पीडित मुलीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनादरम्यान कुटुंबियांनी राज्य पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
आर.जी. कार रुगणालयातील माजी प्रचार्य संदीप घोष यांना अटक झाल्यापासून, त्यांच्या मागील आरोपसत्र थांबायचं नाव घेत नाहीये.
आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (R G Kar Medical College) बलात्कार प्रकरणी पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांनी गोप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात बुधवारी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. पैसे घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू असा दावा पीडितेच्या आई- वडिलांनी केला.
कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलनकर्त्यांवर ममतादीदींनी पोलिसांना हाताशी घेऊन प्रचंड दडपशाहीच केली. पण, एवढ्यावरच न थांबता, त्यांनी ‘बंगाल पेटले, तर देश पेटेल, पंतप्रधानांची खुर्ची जाईल,’ अशा धमक्याही दिल्या. पण, त्यावरुन कडाडून टीका होताच ममतादीदींचा सूर पालटला. त्यामुळे आता दीदींची अशी ही नि‘र्ममता’ ना बंगाली जनता खपवून घेईल आणि ना केंद्र सरकार!
Abhaya Rape Case कोलकता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार करून तिची नृशंस हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा बेमुदत संप सुरू असताना आता केमिस्टही रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी सायंकाळी ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने खोपट कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
ABHAYA CASE आर जी वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात पीडित युवतीला सुवर्ण पदक पटकवायचे होते अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. पीडितीने तिच्या डायरीत सुवर्णपदक पटकवणार असल्याची इच्छा लिहून ठेवली होती. ती खूप मेहनती असून तब्बल १० ते १२ तास अभ्यास करायची, अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तिच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आपल्या पीडित लेकीच्या भावना सांगितल्या.
RG Kar hospital पश्चिम बंगाल येथील आरजी कर वैद्यकिय (RG Kar hospital) शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयाला ५० जणांच्या जमावाने वेढा घातला. प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीवर झालेल्या बलात्काराविरोधात आर जी कार या वैद्यकिय महाविद्यालयाच्या संस्थेत न्याय मागणाऱ्या डॉक्टरांवर गुंडांनी हल्ले केले आहेत. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेने देश हादरला आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणात तृणमूल पक्षाच्या ममता बॅनर्जी यांचे गुंड असल्याचे आढळले आहे.
RG Kar Hospital विशेष प्रतिनिधी कोलकात्यातील आरजी कार (RG Kar hospital) वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालया झालेल्या बलात्काराविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बुधवारी मध्यरात्री गुंडांकडून भीषण हल्ला चढविण्यात आला. हा प्रकार स्थानिक राजकीय पक्षांच्या गुडांनी घडविल्याचा आरोप ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट असोसिएशन या संघटनेने केले आहे.