(Suresh Dhas Massajog ) बीडमधील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. मात्र आता आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी जाऊन भेट दिल्यानंतर मस्साजोग मधील ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
Read More
(Suresh Dhas) आमदार सुरेश धस यांनी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी बीड येथील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. याचदरम्यान सुरेश धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
(Chetana Kalse Case) बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन दशकापासून बीडमधील काही हत्या प्रकरणांचे दाखले देत त्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हत्या प्रकरणांचे दाखले देत असताना त्यांनी चेतना कळसे नावाच्या मुलीच्या ह्त्येचा उल्लेख केला.
(Dhananjay Munde) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी व सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात आमदार धसांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
(Prajakta Mali) प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह आणि चारित्र्यहनन करणारे वक्तव्य केल्याने त्यांना जाहीर माफी मागण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्र्वस्त केले.
(MLA Suresh Dhas) अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचेही मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो", असे सुरेश धस म्हणाले.