दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने के. कविता ( K. Kavita Delhi liquor scam ) यांना अटक केली होती. त्यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवणयात आले आहे. गुरुवारी सीबीआयने त्यांना अटक करुन दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. यापुर्वी त्यांची तुरुंगातच चौकशी करण्यात आली होती. के. कविता तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आहेत.
Read More
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर 'हिप रिप्लेसमेंट' शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हैदराबादच्या यशोदा रुग्णालयात केसीआर यांना दाखल करण्यात आलं आहे.पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली. केसीआर यांच्या मुलीने ट्वीट करत ही माहिती दिली होती.
तेलंगणाच्या कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या के. व्यंकटरमन रेड्डी (६६,६५२ मते) यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (५९,९११ मते) यांचा ६७४१ मतांनी पराभव केला आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले ए. रेवंथ रेड्डी (५४९१६) सुद्धा निवडणूक लढवत होते. त्यांचा ही यात पराभव झाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारला धक्का दिला असून रायथू बंधू योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य करण्याची परवानगी मागे घेतली आहे. रायथू बंधू योजनेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारला मोठा दणका दिला आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मदत वाटप करण्यासाठी तेलंगणा सरकारला दिलेली परवानगी निवडणूक आयोगाने मागे घेतली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं विधान के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
तेलंगण विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणा करण्यास सुरुवात केलेली दिसते. अल्पसंख्याकांच्या कल्याण आणि विकासासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत केसीआर यांनी निवडणुकीपूर्वी ‘व्होट बँके’ला गोंजारण्यास सुरुवात केली. सत्ता हातातून जाऊ नये, म्हणून केसीआर सवलतींचा पाऊस पाडत असून, मागासवर्गीयांनंतर अल्पसंख्याकांवरही आर्थिक सवलतींचा वर्षाव सुरु झाला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांना फटकारलं आहे. पंढरपूरमधल्या सरकोली गावात बीआरएस पक्षाची सभा झाली. भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी केसीआर यांनी सभेला संबोधित केलं. तेव्हा केसीआर यांनी सर्वच राजकीय पक्षांना सवाल केले. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य २७ जून रोजी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. केसीआर यांचा हा दौरा अवघ्या ५ तासांचा असेल. यासाठी भारत राष्ट्र समितीने नागपुरात जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शिवाय, तेलंगणा सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक ही लावण्यात आले आहेत.
‘ईव्हीएम’ला विरोध झालाच पाहिजे. पी. विजयन, नितीश कुमार, एम. के. स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, भगवंत मान या सगळ्यांचा पण विरोध आहे. नाही नाही, ते ‘ईव्हिएम’ बंद झालेच पाहिजे. काय म्हणता, जर ‘ईव्हिएम’मध्ये घोटाळा आहे, तर मग हे लोक त्यांच्या राज्यात मुख्यमंत्री कसे? या राज्यात ‘ईव्हिएम’ने भाजपला का जिंकून दिले नाही? केरळ, तामिळनाडू, तेलगंण, प. बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब इथले ‘ईव्हिएम’ मशीन वेगळे आणि जिथे भाजप जिंकते तिथले ‘ईव्हिएम’ मशीन वेगळे असते का? हे बघा असे प्रश्
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या नेत्या कल्वाकुंतला कविता यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “काँग्रेस हा आता राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, “काँग्रेस आपला अहंकार सोडून वास्तवाला कधी सामोरे जाणार,” असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
काँग्रेसने मतदान यंत्रांबाबत अशा शंका उपस्थित केल्या असल्या तरी त्यांच्याच पक्षाचे एक नेते आणि पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनी, आपणास इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये काही खोट असल्याचे वाटत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगण्याशी ते विसरले नाहीत.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा केंद्र सरकारवरील राग जाता जात नाही. केंद्र सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी राव सोडायला तयार नाही. त्यातच तेलंगण विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने धाकधूक वाढणे साहजिकच. नुकत्याच पार पडलेल्या ‘भारत राष्ट्र समिती’च्या पहिल्या बैठकीत त्यांनी ’मेक इन इंडिया’ उपक्रमाची राव यांनी खिल्ली उडवली. आपल्या राज्याचे काय दिवाळे निघाले आहेत, यापेक्षा रावबाबूंना केंद्राची चिंता अधिक. राव यांनी ‘मेक इन इंडिया’ला ‘जोक इन इंडिया’ असे संबोधत आपल्या अकलेचे तारे तोडले.
तेलंगणमधील रामागुंडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी खत प्रकल्पाचे उद्घाटन करतील. परंतु, आता त्यातही तेलंगण सरकारला आक्षेप. तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना आमंत्रित न केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री राव यांना कार्यक्रमाला बोलावले नसल्याने तेलंगण राष्ट्र समितीने कुंभाड रचण्यास सुरुवातही केली. परंतु, यामागील सत्य काहीतरी वेगळेच आहे. निमंत्रणावरून वादंग निर्माण झाल्यानंतर प्लांटच्या ‘सीईओ’ने स्पष्टीकरण दे
‘महाराष्ट्र आणि तेलंगण भाऊ भाऊ’, अशी नवी घोषणाही आकाराला आणण्याचे काम जे करीत आहेत ते कालउत्तर भारतीय आणि परवा कन्नड लोकांच्या विरोधात होते. एका भेटीत किती विसंगती असाव्यात त्याचा हा नमुना आहे. भाऊ भाऊ असले, तर बजबजपुरीने राज्य चालविण्यात राव आणि ठाकरे भाऊ भाऊ असू शकतात.
रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात तब्बल साडेचार तासांची चर्चा झाली. केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारविरोधात आघाडी तयार करण्यासाठी ही बैठक नेमण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, "केसीआर-ठाकरे भाऊ भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ", असं म्हणत शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
तेलंगण भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक करण्याची घटना नुकतीच घडली. तेलंगण पोलिसांनी केसीआर सरकारच्या दबावाखाली ही कारवाई केली असल्याचा आरोप भाजप अध्यक्षांनी केला आहे.
मुस्लीम तुष्टीकरणापायी वीरांचा, हुतात्म्यांचा इतिहास पुसून टाकण्याचे काम के. चंद्रशेखर राव करत आहेत. कारण, ‘हैदराबाद मुक्ती संग्रामा’त भारतमातेच्या अनेक सुपुत्रांचे रक्त सांडले, अनेकांनी आपले आयुष्य अर्पण केले. पण, त्या बलिदानींना कृतज्ञतेने आठवून त्यांचा सन्मान करण्यापेक्षा के. चंद्रशेखर राव खुर्चीसाठी मुस्लीम मतांची काळजी करताना दिसतात.
तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.
वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाळीव कुत्रे असल्याचे चंद्राबाबू यांनी म्हटले