भारताने संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या अधिवेशनात पाकिस्तानने आणलेल्या प्रस्तावावर मतदान करण्यास नकार दिला. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात 'इस्लामफोबियाशी लढण्यासाठी उपाययोजना' हा प्रस्ताव पाकिस्तानने आणला होता. या प्रस्तावावर बोलताना भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी आपली भूमिका मांडली. UN
Read More
ब्रिटनच्या कट्टरताविरोधी आयोगाने नुकताच ‘ईशनिंदा विरोधातली सक्रियता आणि प्रतिक्रिया’ या विषयावर एक स्वतंत्र अहवाल जाहीर केला. या अहवालामध्ये असे पुराव्यासकट संदर्भित केेले की, ब्रिटनमध्ये पाकिस्तानमधला ‘तहरीक ए-लब्बैक’ हा दहशतवादी गट सक्रिय आहे. हा गट आणि इतर कट्टरपंथी दहशतवादी संघटना, मुस्लीम देशातील ईशनिंदा कायदा ब्रिटनमध्येही कार्यान्वित व्हावा, यासाठी काम करतात. ब्रिटनच्या कायद्याने हे सध्या तरी साध्य होणार नाही, याची त्यांनाही तशी पूर्वकल्पना. त्यामुळे ‘वेट आणि वॉच’ची भूमिका घेत सध्या तरी या संघटना ब्र
मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय बोलका आहे. शरियतनुसार तुम्ही लग्न मोडू शकता. मात्र, तो न्यायोचित मोहोरबंद हवा असेल तर कौटुंबिक न्यायालयात जाऊनच घटस्फोट घ्यावा लागेल.
भारतीय किंवा बहुसंख्याक हिंदू ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या तत्त्वाने सर्वांना आपले म्हणत असताना इतरांकडून मात्र तसे होताना दिसत नाही. केवळ आमचा धर्म, आमचा ईश्वर, आमचा धर्मग्रंथ, आमचा प्रेषितच सर्वश्रेष्ठ आणि तुम्ही काफिर किंवा ‘नॉन बिलिव्हर’ असे ठरवणार्यांनीच इतिहासकाळापासून हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. आताही पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये हिंदू, बौद्ध, शीख सुरक्षित नाहीत.
इस्लामबद्दल भीती वाटण्याचे आताच्या काळातील एक कारण म्हणजे प्रत्येक दहशतवादी वा दहशतवादी संघटनास्वतःला सच्चा मुस्लीम म्हणून पेश करत असते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती, सत्ता गेली व आता सत्ता परत आली. स्त्रियांना दगडाने ठेचून मारणे इस्लामीक असल्याचे तालिबान्यांचे म्हणणे आहे. तर, इस्लामला न मानणार्यांचे मुंडके छाटणे इस्लामीक असल्याचे मध्य-पूर्वेत व आता जगभरात दहशत माजवणार्या ‘इसिस’चे म्हणणे आहे.
पीएफआयच्या तथाकथित ‘एकता रॅली’सारखी एखादी रॅली हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केली तर? त्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांनीच मुस्लीम वेषभूषा केली, त्यांच्या हाताला साखळदंडाने जखडले आणि रस्त्यावर मिरवत ‘जय श्रीराम’चे नारे दिले तर? त्याचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ‘इस्लामोफोबिया’चे प्रतीक मानत ‘एकता रॅली’ म्हणून कौतुक करणार का?
इमन स्तानिझाई यांनी नुकतीच एका लेखाद्वारे चिंता व्यक्त केली आहे की, जगभर ‘इस्लामोफोबिया’ वाढत आहे. ‘फोबिया’ म्हणजे भय किंवा तिरस्कार किंवा भयामुळे वाटणारा तिरस्कार. आपला विचार मांडताना प्रा. झमन यांनी पार दुसर्या महायुद्ध काळापासूनचा आढावा मांडला आहे.