‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नेमके काय झाले, कसे झाले, किती प्रमाणात झाले याचे सप्रमाण सादरीकरण भारतीय सैन्यदलाने केल्याने पाकिस्तानची बनवाबनवी संपुष्टात आली. कालपर्यंत थापा मारत विजयाची शेखी मिरवणार्या पाकी पंतप्रधानांचा बुरखा अखेर फाटला. भारताच्या बेधडक कारवाईने पाकिस्तानलाही धडकी भरली असेल, हे नक्की!
Read More
विशेष प्रतिनिधी मंगळवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुक्रू वनक्षेत्रात लष्कर-ए-तोयबा (एलईटी) शी संबंधित तीन दहशतवादी मारले गेले आहेत.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे ऊर्जा अर्थात शक्तीचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनीही कायमच रणांगण नुसते गाजवलेच नाही, तर आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूलाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. काळ कितीही बदलला तरी भारतातील स्त्रियांमधील पराक्रम आजही आहे तसाच आहे. आज भारतीय सैन्यदलात मोठ्या संघर्षाने स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रत्येक स्त्री हाच पराक्रमाचा वारसा जपताना दिसते. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे त्या स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. स्त्रियांच्या संघर्षाचा
८ मे २०२५ रोजी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या जम्मू, पठाणकोट, उधमपूर इ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या AWACS विमानासह त्यांच्या तीन लढाऊ विमानांना पाडले. या कारवाईत भारताने पाकिस्तानची लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निकामी केली, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
(Pakistan Firing Across LOC) पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गेले १२ दिवस सुरु ठेवलेले शस्त्रसंधी उल्लंघन बुधवारी अधिक तीव्र केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरुन पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
(Rajnath Singh on Operation Sindoor) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या लष्करी कारवाईनंतर गुरुवार दि. ८ मे रोजी सरकारने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहिमेची माहिती देताना ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती दिली.
कष्टे करोनि घसरावे म्लेंच्छावरी...
( Operation Sindoor ) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
दहशतवादाविरोधात आम्ही ‘झिरो टोलरन्स’, हेच धोरण अवलंबवले आहे. जगानेही तसेच दाखवावे, अशी पोस्ट एक्सवर केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केली आहे. “दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगाने पुढे यावे, या आशयाची एक्स पोस्ट परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी केली आहे. जयशंकर यांचे हे वक्तव्य 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आले आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगारांना पुन्हा एकदा भारतीय सायबर सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यात अपयश आले आहे. भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी पाकचा नापाक इरादा धुळीस मिळवला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (एलओसी) पाकच्या गोळीबारास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या बुकावूमध्ये ‘एम २३’ गटाच्या बंडखोरांनी घुसखोरी केली असून, त्यांनी बुकावूच्या उत्तरेकडील विमानतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. सोबतच त्यांनी गोमा शहरही आपल्या ताब्यात घेतले. गोमा येथे भारतीय लष्कराच्या मेडिकल कॉर्प्सचे एकूण ८० सैनिक आणि अधिकारी सध्या उपस्थित आहेत. हे सैनिक संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेचा एक भाग म्हणून काम करतात. या बंडखोरांनी शांतीसेनेच्या लेव्हल थ्री फील्ड हॉस्पिटल असलेल्या कॅम्पला वेढा घातला. त्यामुळे हे ‘एम २३’ प्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घोडदौड करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र नाग मार्क-२ ची चाचणी यशस्वी करून दाखवली. सुरक्षा मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या पोखरण येथे, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे लष्करी सार्म्यथ्य कैक पटीने वाढले आहे. आत्मनिर्भर भारतची योजना अंमलात आणत, भारतीय सैन्याला बलशाली करण्याचे काम आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी केले आहे. अशातच आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच १५ जानेवारी रोजी सैन्य दिन परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दर्शकांना भारतीय सैन्य दलातील रोबो डॉग्सची म्हणजेच ARCV-MULE यांची परे़ड बघायला मिळणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे ( Indian Army ) ३३४ जवानांचे पथक शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या यशस्वी नेपाळ भेटीनंतर आणि नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्डेल यांच्या भारत दौऱ्यानंतर सूर्यकिरण सराव आयोजित करण्यात आला आहे.
( Akhnoor Operation ) जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये मंगळवारी दि.२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
ओमार अबदुल्लाह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, चौथ्यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला परिसारात, २४ ऑक्टोबरच्या रात्री काही दहशतवाद्यांनी सैनिकांच्या गाडीवर हल्ला केला. या चकमकीत २ सैनिकांचा आणि २ पोटर्सचा मृत्यू झाला आहे.
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती “एप्रिल 2020 च्या यथास्थिती” कडे परत आल्यानंतरच भारतीय सैन्य लडाखमधून माघार घेणार आहे. जनरल द्विवेदी म्हणाले की सैन्याने चीनच्या बाजूने विश्वास पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांनी आक्रमक कारवायांसह एलएसी अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता.
भारत – कझाकस्तानच्या आठव्या संयुक्त सरावास उत्तराखंडमधील औली येथील सूर्या फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला आहे.
जम्मू काश्मीर मधल्या कुलगम येथे शनिवारी सकाळी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे.
जम्मूतील भारतीय सैन्याच्या सुंजवान या लष्करी छावणीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात भारतीय सैन्याचा एक जवान गंभीर जखमी झाला. सुदैवाने यात अन्य कुठलीही जीवीत हानी झालेली नाही. सुंजवान हे Jammu मधील भारतीय लष्कराचे सर्वात मोठे तळ असून, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भागात शोधमोहीम सुरू केली आहे.
‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकात आर्थिक वाढीच्या पलीकडे जाऊन ‘लिप फ्रॉगिंग’ (लहान अडथळ्यांवरून उड्या मारत धावणे)चे समाज आणि पर्यावरण यांवर होणार्या परिणामांविषयी संशोधन करण्यात आले आहे. ‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आणि अंतर्दृष्टी निर्माण करणारे आहे. या पुस्तकात दिलेली ‘लिप फ्रॉगिंग’ची संकल्पना वापरल्यास आर्थिक वाढ वेगाने होऊ शकते. त्याविषयी सविस्तर...
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली.
1999च्या जुलै महिन्यात कारगिल युद्धाच्या निमित्ताने काश्मीर प्रश्न पुन्हा उकरून काढण्याचा पाकिस्तानचा कुटिल डाव फसला. आजच्याच तारखेला ठीक 25 वर्षांपूर्वी म्हणजे दि. 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. भारतीय जवानांनी आपल्या बलिदानाने ही ऐतिहासिक शौर्यगाथा लिहिली. असा हा आजचा दिवस म्हणूनच दरवर्षी ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कारगिलच्या शौर्यगाथेचे स्मरण करुन देणारा हा लेख...
‘कीर्तीचक्र’ सन्मानित हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या वीरपत्नी स्मृती सिंह यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी १.२७ लाख कोटी रुपयांची संरक्षणसामग्री उत्पादित केली. ‘जगाचे उत्पादन केंद्र’ असा लौकिक प्राप्त करण्यासाठी हे उत्पादन बळ देणारे ठरेल. ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनांना मिळालेले यश, यातून अधोरेखित व्हावे.
भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी गुरुवार, दि.४ जुलै २०२४ अग्निपथ योजनेबद्दल खोट्या अफवा पसरवल्याबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत बोलताना कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली नसल्याचा खोटा दावा केला होता.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात १.२७ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे तयार करण्यात आली आहेत. हा संरक्षण उत्पादनातला नवा विक्रम आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, "एका आर्थिक वर्षातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक संरक्षण उत्पादन आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा मैलाचा दगड आहे. भारताला जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे."
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराने शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत दिली नसल्याचा दावा केला होता. त्यांचा हा भारतीय लष्कराने फेटाळून लावला आहे. पंजाबचे शहीद अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबीयांना ९८ लाख रुपये देण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना ६७ लाखांची रक्कम देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
भारतीय लष्कराच्या तीन दलांच्या युद्ध क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. कारण, भारताने एक स्फोटक पदार्थ तयार केला आहे जो ट्रायनिट्रोटोल्युएन (TNT) पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला SEBEX-2 असे नाव देण्यात आले आहे. हा स्फोटक जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटकांपैकी एक आहे.
पूर्व लडाखमधील श्योक नदीत रात्री अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदी ओलांडतांना झालेल्या रणगाड्याच्या अपघातामध्ये भारतीय लष्कराच्या पाच जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. पूर्व लडाखमध्ये 28 जूनच्या रात्री लष्करी प्रशिक्षण सुरू असताना पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे सासेर ब्रांग्साजवळ श्योक नदीत लष्कराचा रणगाडा आदळला.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा नंतर आता हंदवाडा येथे दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. उत्तर काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला पकडले आहे. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने सोमवार, दि. १७ जून २०२४ हंदवाडा येथील कचारी गावातून हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला पकडल्याची माहिती दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी डोडा येथील सुरक्षा दलाच्या तात्पुरत्या तळावर गोळीबार केला आहे. दि. ९ जून २०२४ नंतर झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. हा हल्ला करून दहशतवादी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ सकाळी हा हल्ला झाला. एक दिवस अगोदर, दि. ११ जून (मंगळवारी) दहशतवाद्यांनी कठुआ भागातील एका गावात घुसून काही गावकऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला होता.
भारतीय लष्कराने दि. १० जून रोजी एकात्मिक जनरेटर मॉनिटरिंग,संरक्षण आणि नियंत्रण प्रणाली 'विद्युत रक्षक' सुरु केला आहे. एडीबीद्ववारे विकसित केलेली तंत्रज्ञान-आधारित नवोन्मेषी प्रणाली विद्युत रक्षक, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये रविवार, दि. ९ जून २०२४ संध्याकाळी शिव खोरी येथून येणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने रियासीमध्ये सोमवारी सकाळी शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात दहा यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) देखील रियासी येथे दाखल झाले असून घटनास्थळी आणि आजूबाजूच्या घनदाट जंगलात शोध मोहिमेसाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे.
भारताने शुक्रवारी शक्तिशाली ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली तुकडी फिलिपाइन्सला दिली. ( brahmos to philippines ) देशाच्या संरक्षण निर्यातीतील एक मोठे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.
'नवा भारत घरात घुसून मारतो हे शत्रूंनाही कळलं' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथे संबोधित करताना केले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, सैन्याचा अपमान करणे हे काँग्रेसचे प्रारंभापासूनचे धोरण राहिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकद्वारे शत्रूच्या घरात घुसून मारण्याचे सामर्थ्य भारताने दाखवून दिले आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
सशक्त भारत शांत आणि सुरक्षित विश्वाचा मार्ग प्रशस्त करतोय. भारत बळ आणि बदल या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालला आहे. ‘को अति भारः समर्थानां’ म्हणजे जो समर्थ आहे, त्याला अतिभाराचा काहीही फरक पडत नाही. हिंद महासागर आणि अरबी समुद्रात नौसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या युद्ध सरावामुळे चीन आणि पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा उच्चस्तरीय लष्करी चर्चा झाली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) झालेल्या लष्करी चर्चेत भारत आणि चीनने अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवली आहे.
भारतीय सैन्यासाठी २०२४ मधील बदल जागतिक परिवर्तनाशी संबंधित आहेत, जे युद्धाचे स्वरूप ठरवतात. भू-राजकीय बदलांमुळे देशाचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना प्राणघातक स्वायत्त प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक शस्त्रे, निर्देशित ऊर्जा शस्त्रे, जैवतंत्रज्ञान आणि क्वांटम तंत्रज्ञान युद्धात निर्णायक ठरताना दिसत आहेत.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी(एनडीए), पुणे अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील विविध रिक्त पदांवर काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एनडीए अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे अधिसूचनेत प्रस्तावित असणाऱ्या विविध पदांच्या एकूण १९८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 'एनडीए'मधील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
यंदाच्या बिटींग द रिट्रीट सोहळ्यामध्ये भारतीय लष्कराच्या बँडकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘जयोस्तुते’ या गीताचे वादन प्रथमच करण्यात आले. भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता दरवर्षी देशाची राजधानी दिल्लीतील विजय चौकात होते. त्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिन्ही सेनादलातर्फे मानवंदना दिली जाते.
जम्मू – काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ आहे, मात्र, कोणत्याही स्थितीस चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरूवारी पत्रकारपरिषदेत केले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लष्करातर्फे आयोजित वार्षिक पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भारतीय लष्कराची भूमिका स्पष्ट केली.
दि. १६ डिसेंबर रोजी १९७१च्या युद्धाला नुकतीच ५२ वर्षे पूर्ण झाली आहे. याशिवाय दि. १९ डिसेंबर १९६१च्या गोवा मुक्ती संग्रामाला यंदा ६२ वर्षं पूर्ण झाली आहेत. या दोन्ही युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेले, सैनिकी अधिकारी होते-लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्या शौर्यगौरवाचा आढावा घेणारा हा लेख...
दि. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांनी पांढरे निशाण फडकवले. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युअल अँटोनिओ वसालो इ सिल्वा याने त्या दिवशी रात्री ८.३० वाजता भारतीय सेनापतींसमोर शरणागतीच्या करारावर सही केली. गोवा मुक्त करून, भारतीय संघराज्यात दाखल करण्याच्या, या लष्करी कारवाईचे सांकेतिक नाव होते-‘ऑपरेशन विजय.’ गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख...