प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्म
Read More
वक्फ बिलाला हात लावल्यास देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल’ ही धमकी दिली आहे खा. असदुद्दीन ओवेसी यांनी. ओवेसी वारंवार अशा धमक्यांचा वापर करून लोकशाहीला कायमच दबावाखाली आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण, ओवेसींनी आता हे लक्षात घ्यावे की, या देशात निजामशाहीची पाळेमुळेदेखील शिल्लक नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने हिंदूविरोधात दंगल भडकवणाऱ्या ताहिर हुसैनला ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पॅरोलवर जामीनाची परवानगी दिली आहे. त्यानुसार आता २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत प्रचारासाठी सोडण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटींचे पालन करावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएस) ( AIMIM ) या पक्षाने हिंदूविरोधी दंगलीचा आरोपी ताहिर हुसेन यास उमेदवारी जाहिर केली आहे.
( Devendra Fadnavis ) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
( Devendra Fadnavis )"सुन लो ओवैसी, छत्रपती संभाजीनगर... किसी का बाप भी पैदा हुआ तो अब ये नाम नही बदल सकता...", अशी गर्जना करत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींना खुले आवाहन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगर या नावावर भर देत त्यांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे.
एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला असून ते महाविकास आघाडीत सामील होण्यास इच्छूक आहेत. त्यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता मविआत एमआयएमची एन्ट्री होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तेलंगणामध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीचा मतमोजणी येत्या रविवारी म्हणजे ३ डिसेंबर रोजी होणार आहे.तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६३.९४ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील 13 नक्षलबहुल केंद्रांवर दुपारी 4 वाजता मतदान संपले, मात्र राज्यातील इतर भागातील मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने मतदार रांगेत राहिले. अशा स्थितीत एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे.
हैदराबादमध्ये 'एआयएमआयएम'चा दरारा कमी होताना दिसत आहे. मुस्लिमांचा एक मोठा वर्ग ओवेसी बंधूंना (अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी) विरोध करत आहे. त्यांच्यावर भाजप आमदार टायगर राजा सिंह यांना घाबरण्याचा आणि मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे टी राजा सिंह यांचे नाव ऐकून ओवेसींना पळता भुई थोडी होते, असे विधान एका व्यक्तीने केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 'नूरी' प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडले आहे. जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आपल्या आईला एक कुत्र्याचे पिल्लू भेट दिले होते. त्यांनी या पिल्ल्याचे नाव 'नूरी' असे ठेवले होते. परंतू, यावर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाच्या नेत्याने आक्षेप घेतला आहे.
२०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचे लक्षात येताच. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिथून ते निवडूनही आले होते. पण आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढण्याचे आव्हान दिले आहे.
केंद्र सरकारकडून विशेष संसद अधिवेशन घेण्यात आले असून अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. लोकसभेत या चर्चेवर चर्चा करताना काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून सहभाग घेण्यात आला आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकारने महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदन हे विधेयक आणले आहे. या विधेयकावर आज संसदेत चर्चा सुरु आहे. याच चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे.
कर्नाटकच्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेने (HDMP) ईदगाहवर गणेशोत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे, ज्यासाठी दोन मुख्यमंत्र्यांनी एकेकाळी आपली जागा गमावली होती. १९९४ साली या ईदगाह मैदानावर तिरंगा फडकवण्यासाठी पोहोचलेल्या देशभक्तांवर तत्कालीन काँग्रेस सरकारने गोळीबार केला होता. त्या गोळीबारात ५ देशभक्त शहीद झाले होते. मात्र भाजपची सत्ता असलेल्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेने (एचडीएमपी) यंदाही ईदगाह मैदानावर गणेशोत्सवास परवानगी दिली आहे.
बुलढाणा : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींची शनिवारी बुलढाण्यातील मलकापूर येथे जाहीर सभा होती. मलकापूर येथील सभेत असदुद्दीन ओवेसींनी "औरंगजेब अमर रहे"च्या घोषणा दिल्या. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय जनता पक्षाकडून पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा पोलीसांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील कडासने यांच्याशी बोलून औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
द केरळ स्टोरी चित्रपटाची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. न्यायालयाने चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगूनही अनेक मुस्लिम संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत. अशातच AIMIM च्या असदुद्दीन औवेसी यांनी चित्रपटाविषयी नकारात्मक टिप्पणी केली आहे. देशात मुस्लिमांनाबदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी चित्रपटाविरोधात केला आहे.
मुकादम साहेबांसारखे असगर अली इंजिनिअर यांचा वारसा सांगणारे गृहस्थ मुस्लीम मानसिकतेच्या चौकटीतून आणि आपला सांस्कृतिक वारसा अरब जगात शोधण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकले नाहीत. त्यांना भारतीय संत परंपरेशी तादात्म्य साधणारे मुस्लीम मराठी संत साहित्य आपलेसे वाटत नाही, तेथे जावेद कुरेशींसारख्या ‘एआयएमआयएम’च्या कार्यकर्त्याकडून आणि इतर तशीच मानसिकता ठेवणार्या मुस्लीम मराठी लेखकांकडून काय वेगळी अपेक्षा ठेवता येणार?
केंद्राने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याची ३५वर्षांपासून केली जाणारी मागणी मंजुर केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला एमआयएमचे नेते,औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. तर G-20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडलेल्या नुपूर शर्मांचे समर्थन केले आहे. शर्मा यांची बाजू घेताना "नुपूर शर्मा जे बोलल्या होत्या, झाकीर नाईकनेही तेच सांगितले होते". "पण नाईकने माफी मागावी अशी कोणीही मागणी केलेली नव्हती", असे विधानकरून त्यानंतर राज ठाकरे यांनी एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर ठाकरी भाषेत तोफ डागली.
औरंगाबाद : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा काढून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे आधी आपल्या मुलाचं नाव औरंगजेब ठेवा, मग शहराला औरंगाबाद म्हणा, असा खोचक टोला लगावत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली.
संभाजी नगरच्या नामांतराचा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयएम पक्षाने औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यास कडाडून विरोध दर्शवलेला आहे. या नामांतराविरोधात संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरून एममायएम आंदोलन करणार आल्याचा इशारा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचे रणकंदन सुरू असताना तिकडे बिहारमध्ये वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. देशभरात हिंदूविरोधाची बीजे पेरत मुस्लीम मतासांठी आपल्या वाणीचा वापर करणार्या असदुद्दीन ओवेसी यांना जोरदार झटका मिळाला आहे. हा झटका दुसरा तिसरा कुणी नाही, तर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी दिला आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी रांची विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी "पाकिस्तान जिंदाबाद" च्या घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वादग्रस्त व्हिडिओच्या चौकशीसाठी दंडाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षकांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
एमआयएमचे आमदार राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केलं आहे. हॉटेल ट्रायडेंट येथे शिवसेनेचे वरिष्ठ नेते व खासदार इम्तियाज जलिल यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ट्विट करून जलील यांनी ही माहिती दिली.
एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी याती नरसिंहानंद यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा हैद्राबादच्या जुबली हिल्स येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही फोटोमध्ये एआयएमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अत्यंत घनिष्ट असे नेते म्हणून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन प्रसिद्ध आहेत. मागील काहीच दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्र दौरा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच शरद पवार आणि इतर मुख्य नेत्यांची भेट घेतली होती.
मुंबईत आयोजित एका जाहीर सभेत, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशीदला शहीद म्हणून पुकारले. १९९२ मध्ये तिच्या विध्वंसासाठी जबाबदार असलेल्या लोकांचे संरक्षण केल्याबद्दल सपा, बसपा आणि काँग्रेसवर टीका केली.ओवेसी यांनी मुस्लीम समुदयाला आवाहन केले की तुम्ही लग्न करा आणीन शक्य असेल तितके आपत्य जन्माला घाला. ओवेसी म्हणाले, “माझी मशीद (बाबरी) शहीद झाली. त्यावेळेस सपा, बसपा किंवा काँग्रेसमधील कोणी काही बोलले का? माझी मशीद ढासळत असताना त्यांनी डोळेझाक केली.
मुस्लिमांचा राजकीय मुखवटा असलेला आणि ओवेसी बंधूंनी नावारूपास आणलेला 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' (एआयएमआयएम) हा राजकीय पक्ष संविधान दिवस असलेल्या येत्या शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला संवैधानिक आरक्षण मिळावे, या राजकीय मुद्द्याला धरून ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलने आयोजित करणार, असे पक्षाच्या प्रवक्त्याने जाहीर केले. त्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होईल. इतर प्रांतांत झालेल्या हिंदू-मुस्लीम धु्रवीकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रात अधिक खोलवर रूजवून म
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उठत असताना वारिस पठाण यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात
कट्टर इस्लामवादी नेते म्हणून ओळख असलेले ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी हे सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनले आहेत.