कोरियन कंपनी असलेली ह्युंदाई मोटर इंडियाने आयपीओ बाजारात आणला होता. गुंतवणूकदारांनी आयपीओला उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर नवी माहिती समोर आली आहे. या कंपनीचे शेअर विक्री हाताळणारे गुंतवणूक बँकर यांनी उत्तम परतावा कमविला आहे. ह्युंदाई मोटर कंपनीने आयपीओच्या माध्यमातून २७,८७० कोटी रुपये बाजार भांडवल उभारले आहे.
Read More
ह्युंदाई मोटर कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. ह्युंदाई मोटर आयपीओच्या माध्यमातून बाजार भांडवल उभारणी करणार असून दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान खुला असणार आहे. कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून २७,८७०.१६ कोटी रुपये भांडवल उभारले जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स आयपीओचा एक लॉट ७ शेअर्सचा असून १८६५-१९६० प्राईस बँड ठेवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर कंपनी सूचीबध्द होणार आहे.
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड इश्यू लाँच होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आयपीओकरिता अप्लाय करता येणार आहे. ह्युंदाई मोटर्सने आयपीओसाठी १,८६५-१,९६० रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाची कंपनी होंडाई मोटर्स कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. यासाठी शुक्रवारी संध्याकाळी कंपनी सेबीकडे अर्ज करू शकते. अहवालातील माहितीप्रमाणे, २५ ते ३० अब्ज डॉलर्स म्हणजेच हा आयपीओ २५००० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई या वर्षाच्या अखेरीस सार्वजनिक प्रारंभिक ऑफर 'आयपीओ'द्वारे ३ अब्ज म्हणजेच सुमारे २५ हजार कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. दरम्यान, ह्युंडाई कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाल्यास लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या २१ हजार कोटी रुपयांच्या शेअर विक्रीला मागे टाकून भारतातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्याचबरोबर, कंपनीच्या आयपीओमुळे टेस्लाच्या भारतातील भविष्यातील ईव्ही विक्रीला धक्का बसण्याची क्षमता असल्याचे बोलले जात आहे.
'ह्युंदाई' ही प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी पुण्यात ७ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १३ डिसेंबर रोजी याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र येऊ घातलेल्या ह्युंदाईच्या प्रकल्पाचे स्वागतही केले.
देशांतर्गत टीव्हीचे दर ०५ ते १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे टीव्ही खरेदीदारांना आता आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ३१ ऑक्टोबरपर्यंत विनापरवानगी कॉम्प्युटर, लॅपटॉप यांच्या आयातबंदीवर स्थगिती आणली असनाताच आता मागणीत वाढ झाल्याने टीव्हीच्या किंमतीत वाढ होणार आहे. तसेच, देशांतर्गत उत्पादनामुळे टीव्ही विक्रीतदेखील फायदा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे टीव्ही उत्पादनात वाढ होताना मागणीत देखील वाढ झाली आहे.
भारतीयांच्या वाहन आणि खाद्यपदार्थांशी संबंधित आकांक्षांची पूर्तता या कंपन्यांकडून होत असली तरी त्यांना देशाच्या सार्वभौमत्वाविरोधात बोलता येणार नाही. त्यांनी तसे केल्यास आतापर्यंत या कंपन्यांची उत्पादने खरेदी करणारा भारतीय ग्राहकच विरोधात उतरेल आणि तेच राष्ट्रवादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनातून, समाजमाध्यमांवरील बहिष्काराच्या मोहिमेतून स्पष्ट झाले.
कार-उत्पादक ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील कार्यलयाने जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ट्विटमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला गेला. शेअर मार्केटमध्येही यांचे शेअर तोंडावर आपटले. या सगळ्या घडलेल्या घटनेवर दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री यांना फोन केला आणि झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
भारत सरकारने ह्युंदाई काश्मीरच्या ट्विट प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भारतातील कोरियन राजदूताला बोलवून घेऊन या प्रकरणाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली
'ह्युंदाई'नंतर आता 'किया' या पाकिस्तानी ट्विटर हँडलने 'काश्मीरच्या स्वातंत्र्या'बद्दल भारतविरोधी विष उधळले आहे. 'किया मोटर्स क्रॉसरोड्स हैदराबाद'च्या ट्विटवर हा गोंधळ सुरू आहे. हैदराबाद भारताच्या तेलंगणा राज्याची राजधानी नाही, तर सिंध, पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. लोकांनी 'किया'च्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ट्विटर हँडलला टॅग केले आणि विचारले की यावर त्यांचे काय मत आहे? मोटर्स कंपनीने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
ह्युंदाई नंतर किया या पाकिस्तान ट्विटर हॅन्डल वरून केल्या गेल्या काश्मीरबाबतच्या ट्विट नंतर ह्युंदाईचे शेअर्स २.७ टक्क्यांनी कोसळले.
ज्या देशामध्ये ‘ह्युंदाई’ कंपनी दरवर्षी पाच लाख मोटारींची विक्री करते, त्या कंपनीच्या पाकिस्तानमधील कंपनीस ‘काश्मीर सॉलिडॅरिटी डे’चा पुळका का आला? ‘ह्युंदाई’ला लक्षात राहील अशी अद्दल भारत कधी घडविणार, याकडे भारतीयांचे आता लक्ष लागले आहे.
गेल्या महिन्यात टाटाच्या ३५,३०० वाहनांची विक्री झाल्याने दक्षिण कोरियन ह्युंदाईला टाकले मागे
भारतात ‘फेल’ ठरलेली ‘फोर्ड’ भारतात सध्या नकारात्मक प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढीस लागलगेल्या दिसतात. कुठलीही घटना घडली की, त्याची तार थेट पंतप्रधान मोदींपर्यंत आणून जोडणे हा तर विरोधकांचा एकसूत्री कार्यक्रम. कुठल्याही अपयशाचं खापर मोदींच्या माथी फोडून मोकळे होण्यातच त्यांचा आनंद. जगप्रसिद्ध अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी ‘फोर्ड मोटर्स’ने अलीकडेच भारतातून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला, त्यावर काही प्रमुख प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान मोदींवर जहरी टीका करण्यात आली. वास्तविक या निर्णयाचा सरकारशी काह
चीनमध्ये कोरोना विषाणूचा धुडगूस वाढल्याने वाहनांच्या आयात होणाऱ्या सुट्या भागांची कमतरता
मंदीचा सर्वाधिक गवगवा झालेले क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल. परंतु, यात खरोखर मंदी आहे का? की ग्राहकांची आवड-निवड बदलली व त्याचा परिणाम यावर होत आहे? याचाही विचार केला पाहिजे. नुकताच ह्युंदाईने आपला वार्षिक अहवाल जारी करत गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये २१ टक्के अधिक नफा कमावल्याचे जाहीर केले, तसेच गाड्यांच्या विक्रीतही ३ टक्क्यांनी वाढ झाली.