भारतापलीकडील रामायण असा विचार करताच, नजर आपसूकच आग्नेय आशियाकडे वळते. पण, रामकथेच्या संस्कृतीसंपन्न परंपरेने सातासमुद्रापार अगदी युरोपीय अभ्यासकांना, साहित्यिकांनीही भुरळ घातली. म्हणूनच केवळ फ्रेंच किंवा जर्मनच नव्हे, तर इटालियन, पोलिश, रशियन भाषेतही रामायणाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आणि ती युरोपीय जनमानसानेही मनस्वी स्वीकारलेले दिसतात. त्यानिमित्ताने युरोपीय जनमनातील रामकथेच्या रामरंगाचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव
युरोपियन महासंघातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणार्या जर्मनीमध्ये रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी निवडणुका पार पडतील. तेव्हा, या निवडणुकीत जर्मनीला भेडसावणार्या समस्यांना सामोरे जाणार्या पक्षाला तेथील नागरिक मतदान करतात की, पुन्हा एकदा विविध विचारसरणींचे पक्षच एकत्र येऊन खिचडी सरकार बनवितात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातच अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे या निवडणुकीवर काय प्रभाव पडू शकेल, याचे विश्लेषण करणारा हा लेख...
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दि. 20 जानेवारी रोजी शपथबद्ध होऊन ‘व्हाईट हाऊस’चा उंबरठा ओलांडतील. पण, तत्पूर्वीच अमेरिकेच्या शत्रूराष्ट्रांसह मित्रराष्ट्रांनाही ट्रम्प आणि त्यांचे साथीदार मस्क यांनी घाम फोडला आहे. ब्रिटनही त्यापैकीच एक. तेव्हा, ट्रम्प यांच्या सत्तारोहणापूर्वी ब्रिटनला ग्रहण का लागले, त्याचा उहापोह करणारा हा लेख...
German Christmas market जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका हल्ल्यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यामध्ये एकूण २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ७ भारतीय नागरिकही जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारत सरकारने संबंधित हल्ल्याला निर्दयी ठरवत त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. वाहन चालकाचे नाव डॉ. तालेब असे असून तो सौदी अरेबियास्थित आहे. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
Germany : काही दिवसांपूर्वी जर्मनीत सापडलेल्या काही कागदांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. आपल्या देशात तर या कागदांवर खूप चर्चा झाली. हे कागद नेमके कसले होते आणि त्यांचा आपल्या देशाशी काय संबंध आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून.
जगाच्या पाठीवर रोजच काही ना काही अनोख्या घटना घडत असतात. पण, त्यातल्या काही घटना जागतिक बातमीचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी जर्मनीत घडलेल्या अशाच एका घटनेने जगाचे आणि खास करून, भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बेल्जियमच्या सिल्वी स्टिनाला पाच दिवस डांबून ठेवले गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 14 ऑगस्ट रोजी तिला इस्लामाबादच्या रस्त्यावर हातपाय बांधलेल्या अवस्थेत तिला फेकून दिले गेले.
दर शुक्रवारी फतव्यानुसार आपल्याइथेही खूप काही घडत असते. या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये नुकतेच सहाव्या शतकातल्या इमाम अली मशीद (ब्लू मशीद) सह इतर तीन मशिदींना टाळे ठोकले गेले. या मशिदींमध्ये जर्मनीत ‘कट्टर इस्लाम’चा प्रसार करण्याचे षड्यंत्र रचले जात होते, असे जर्मनी सरकारचे म्हणणे आहे.
जर्मनीतील बलात्कार प्रकरणात चक्क धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झाली नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या बलात्कार प्रकरणावर टीका करणाऱ्या युवतीलाच शिक्षेला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात यांच्यात उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरिता झाले ला करार हा मानव संसाधन विकास क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दोन्ही राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असून भविष्यातील विविध क्षेत्रातील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
संपूर्ण युरोपाचा एक आवाज असणारी जागतिक संघटना म्हणजे युरोपीय महासंघ होय. पण याच युरोपातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. अनेक राष्ट्रवादी विचारधारा असणार्या लहान लहान पक्षांचे बळ युरोपात वाढत आहे. आशातच महासंघाच्या निवडणूका जवळ आल्याने, एकूणच तिकडच्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा..
जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांची झालेली भेट याचे महत्व फार आहे. तसे बघायला गेल्यास दोघांचे होणारे मनोमिलन हे जर्मनीसाठी दिलासादायक होण्यापेक्षा त्रासदायक ठरण्याची चिन्हे अधिक असताना झालेला दौरा विशेष म्हणावा लागेल. जर्मनी आणि चीन यांच्यातील संबंधाचा घेतलेला हा आढावा..
जर्मनी सरकारने चक्क अर्ध्या रात्री एक विधेयक पारित केले. त्यानुसार गांज्याला त्या देशात कायदेशीर मान्यता मिळाली. तसेच १८ वर्षांवरील व्यक्ती २५ ग्रॅम सुका गांजा सोबत बाळगू शकतो. तसेच घरात मारिजुआनाची तीन झाडे लावण्याची परवानगीही या कायद्याने दिली. कायदा पारित झाल्या-झाल्या, त्या अर्ध्या रात्रीही ब्रांडेनब्रुग गेटवर जर्मनीची तरुणाई एकत्र जमली. ते सगळे खूप आनंदी झाले. नुसता जल्लोष सुरू होता. सगळ्यांनी मिळून गांजाही ओढला. सरकारवर ही तरुणाई खूप खूश झाली. गांजा सेवनाला कायदेशीर मान्यता मिळाली, म्हणून खूश होणारी ह
जर्मनी हा ‘युरोपियन महासंघा’तील सर्वात प्रबळ देश मानाला जातो. अनेक बाबतीत हा देश ‘युरोपियन महासंघा’तील इतर देशांपेक्षा पुढेच आहे. पण, युक्रेन युद्धात जर्मनीची अमेरिकेच्या धोरणाच्या मागे फरफट होत आहे. या सगळ्या परिस्थितीत जर्मनी अडचणीत अडकला आहे असे वाटावे, अशीच जर्मनीची परिस्थिती आहे.
एकेकाळच्या बलाढ्य आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जपानच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत जर्मनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसेवांनी दिलेल्या माहितीनुसार जर्मनीने हे मोठी कामगिरी केली आहे. यामुळे जपानची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. गेलेल्या काही दिवसांत जपानमधील अंतर्गत व्यवस्थेतील त्रुटींमुळे जपानची पिछेहाट झाली आहे. जपानच्या लोकसंख्येत झालेली घट, कमी झालेला जन्मदर, कामगारांचा तुटवडा या प्रमुख कारणाने जपानची अर्थव्यवस्था तुलनेने मागे पडली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंडच्
अयोध्येतील राम मंदिर कर्तव्य धर्म रामाचे मंदिर आहे. या कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा कालखंड आता सुरू झाला आहे. मानवी जीवन हे अनेकांगी असतं. मनुष्य हा सृष्टीतील एकाकी प्राणी नाही. सर्व प्राणी वनस्पती, विश्वातील सर्व मानव त्यांचे उपासना पंथ ही सर्व सृष्टी निर्मात्याची विविध रुपे आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाप्रति आपले कर्तव्य आहे. रामचरित्र हे कर्तव्य धर्म शिकवणारे चरित्र आहे. त्याचे स्मरण आपल्याला नित्य ठेवावे लागेल.
जर्मनीचा शेजारी देश फ्रान्समध्ये नेहमी दिसणारे दृश्य सध्या जर्मनीतील रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून जर्मनीची राजधानी बर्लिनच्या रस्त्यांवर जर्मन शेतकरी शक्तिप्रदर्शन करत आहेत. जर्मन शेतकर्यांनी राजधानीतील रस्त्यांवर ट्रॅक्टर उतरवले असून, महामार्गावर वाहतूककोंडी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने विमा क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथा क्रमांक पटकावला आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडे ५०३.७ अब्ज डॉलर्स रक्कमेचा रिजर्व उपलब्ध आहे. या यादीत पहिला क्रमांकावर जर्मन विमा कंपनी एलियांज ७५० अब्ज डॉलर्सच्या रिजर्वसह पहिल्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी काल निधन झाले. शीतयुद्ध, अमेरिका-व्हिएतनाम संघर्ष, अमेरिका-चीनमध्ये संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१च्या संघर्षात पाकिस्तानचे समर्थन करणारी व्यक्ती म्हणून हेन्री किसिंजर यांचे नाव घेतले जाते. मुत्सद्दी परराष्ट्र मंत्री म्हणून किसिंजर यांचा उल्लेख अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून केला जाईल. मात्र, अमेरिकेने कंबोडियावर केलेला बॉम्बहल्ला त्याच कालावधीत किसिंजर यांना संयुक्तपणे मिळाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा रद्द झाला. आणि राजकीय वर्तुळात त्या दौऱ्याची चर्चा सुरू झाली. मग गप्प बसतील ते विरोध कसले? या न्यायाने उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायला सुरूवात केली. इतकंच काय तर दावोस दौऱ्यावर झालेल्या खर्चावर ही आदित्य ठाकरेंनी टीका केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि ब्रिटन दौरा का रद्द झाला? त्यांनी दावोसला जाऊन काय आणलं? आदित्य ठाकरेंनी परदेश दौरे केले त्या दौऱ्यांच फलित काय?
सगळीकडे गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण झालेलं आहे. अशातच आता उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आदित्य ठाकरे 'नाही बरा हा छंद राधिके...' या गवळणीच्या तालावर तल्लीन होताना दिसत आहेत. या व्हिडिओत आदित्य ठाकरे हातात टाळ घेऊन भक्तिरसात मग्न झालेले दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. तंत्रज्ञान आणि उद्योग संदर्भातली मुख्यमंत्री यांचीही महत्त्वाची लंडनवारी असणार आहे. हजारो कोटींचे उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येताना परत आणणार असल्याची माहिती आहे.
यावर्षी भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यानिमित्ताने ९ व १० सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता २० सदस्य राष्ट्र आणि इतर काही अतिथी राष्ट्रांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहे.
गातील चौथ्या क्रमांकाची आणि युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनी सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा ‘जीडीपी’ ऋण ०.३ टक्क्यांनी घसरला होता, तर दुसर्या तिमाहीत या देशाचा आर्थिक विकास दर शून्य टक्क्यांवर राहिला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहे. जर्मनीतील या आर्थिक मंदीमुळे युरोपबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेलाही संकटाचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई : “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असल्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच, जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
जर्मनीपाठोपाठ आता इंग्लंडची वाटचालही मंदीच्या दिशेने सुरु असल्याचे चित्र दिसते. चलनवाढ ही तेथील प्रमुख समस्या असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणारी व्याज दरवाढ ही महागाईला आमंत्रित करणारी ठरली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने सामान्यांच्या अडचणीतही भर पडली. परिणामी, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानिमित्ताने साहेबांच्या मनोर्यालाही गेलेले हे मंदीचे तडे जागतिक चिंतेत भर घालणारे ठरले आहेत.
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन आणि जर्मनीचे संरक्षण फेडरल मंत्री बोरीस पिस्टोरियस भारताच्या भेटीवर येत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अमेरिकचे संरक्षण मंत्री ऑस्टीन यांना ५ जून रोजी भेटणार असून जर्मनीचे संरक्षण मंत्री पिस्टोरियस यांच्याशी ते ६ जून रोजी चर्चा करतील.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या 'विकासदरा'चे आकडेवारी जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार भारताचा 'विकासदर'६.१ टक्क्याने वाढला आहे.
बंगळुरु : जगभरात मंदीचे सावट असताना भारतात मात्र उद्योगधंद्यांना पोषक वातावरण तयार होत आहे. त्यातच SAP लॅब्स इंडियाने ग्राउंडब्रेकिंग समारंभाद्वारे बेंगळुरूमध्ये त्याच्या दुसऱ्या कॅम्पसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या केंद्रामुळे १५ हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतातील आयटी हब म्हणून गणले जाणारे बंगळुरु हे शहर जागतिक स्तरावर SAP चे सर्वात मोठे R&D हब आहे आणि SAP च्या जागतिक R&D मध्ये ४० टक्के योगदान देते. SAP च्या सध्या १७ देशांमध्ये २० प्रयोगशाळा आहेत. तसेच, कंपनीच्या मनु
अमेरिकेवरील दिवाळखोरीचे संकट तात्पुरते टळले असले तरी मंदीचे मळभ मात्र अमेरिकेवर अद्याप दाटलेले आहे. अमेरिेकेच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा केवळ १.१ टक्के इतकाच असल्याचे समोर आले असून त्यात सलग दोन तिमाहीत घट नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे जर्मनीमध्येही मंदीचे वारे वाहू लागल्यामुळे संपूर्ण युरोप खंडावर मंदीचे संकट तीव्र झाले आहे. त्यामुळे जर्मनी या संकटाचा सामना कसा करते, याकडे युरोपसह जगाचे लक्ष लागले आहे.
पारतंत्र्याच्या ढगांनी व्यापलेल्या आभाळाच्या क्षितिजावर पूर्व-पश्चिम दिशांना दोन तारे उगवले. सशस्त्र क्रांतीचा ध्यास उराशी तेवता ठेवून नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोलकात्यात सुभाषबाबू. दोघांमध्ये समान धागे ठळकपणे स्पष्टपणे दिसतात. आपल्या दुर्भाग्यामुळे, नाकर्तेपणामुळे या तार्यांचं तेज आपण पेलवू शकलो नाही. आभासी सेक्युलॅरिझममुळे आपल्या देशाचं आजपर्यंत फक्त नुकसानच झालंय. अशा या दोन महान नेत्यांच्या भेटीची ही कहाणी...
“केवळ महार, चांभार किंवा अस्पृश्य समाजच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजच परकीय जोखडामुळे पतित झाला आहे आणि या हिंदूराष्ट्राला पावन करणारं हे मंदिर आहे,”असे प्रतिपादन तात्यांनी ‘पतितपावन’ या नावाचं मर्म उलगडताना केलं होतं. तेव्हा, या पतितपावन मंदिर उभारणीमागची स्वा. सावरकरांची प्रेरणा आणि चिंतन यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
जपानच्या हिरोशिमामध्ये दि. १९ ते २१ मे या कालावधीत ४९वी ’जी ७’ शिखर परिषद पार पडली. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका आणि युके या सात देशांचे प्रतिनिधी परिषदेनिमित्त दरवर्षी एकत्र येत असतात. भारत हा या ’जी ७’चा भाग नसला तरी दरवर्षी यजमानपद असलेल्या देशाकडून भारताला आमंत्रित केले जाते. २०१९ मध्ये फ्रान्सने, २०२० मध्ये अमेरिकेने, २०२१ मध्ये युकेने, २०२२ मध्ये जर्मनीने, तर यावर्षी जपाननेही भारताला आमंत्रित केले होते. विकासाची दूरदृष्टी असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत भारताचे प्र
१७६०च्या दशकापासून जगभरात औद्योगिक क्रांती सुरू झाली, ती आजही अव्याहत सुरूच आहे. या औद्योगिक क्रांतीमुळे विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाले. यातून प्रगती झालीच. परंतु, या वस्तूंच्या जीवनचक्राच्या शेवटच्या पायरीचा कोणीच विचार केला नाही आणि यातून निर्माण झाला तो कचरा! आज अनेक देश कचर्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
नवी दिल्ली : फ्रान्समधील मॉन्ट डी मार्सन लष्करी तळावर सुमारे तीन आठवड्यांच्या बहुराष्ट्रीय हवाई सरावासाठी भारत चार राफेल जेट, दोन सी-17 विमाने आणि दोन आयएल - 78 विमाने पाठवणार आहे. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने परदेशी हवाई सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबई : जर्मनी सध्या नव्या समस्येला तोंड देत आहे. जर्मन समाज वृद्धत्वाकडे झुकत आहे. लोकांचे सरासरी वयोमान ४८ इतके झाले आहे. जर्मनीला दरवर्षी लहान सहान कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी आज येथे सांगितले.
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
जर्मनीत विविध संघटनांचे २५ लाखांहून जास्त कर्मचारी संपावर आहेत. वाढत्या महागाईमुळे वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे रेल्वे आणि विमानसेवेसह अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. या संपामुळे बस आणि जलमार्गांवरही परिणाम झाला आहे. कामगार संघटना वेर्डी आणि ईव्हीजीच्या कामगार संघटनांनी संपाचे आवाहन केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील विविध राज्यांतील नागरिकांमध्ये ‘भारताचे आवडते मुख्यमंत्री’ ठरले आहेत. ट्विटरवर ’'IndiaKeFavouriteCM’ या ‘हॅशटॅग’ने लोकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देशाचे सर्वात आवडते मुख्यमंत्री म्हणून वर्णन करण्यात आले आहे. या ‘ट्रेंड’मध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तराखंडमधील नागरिकांनी योगींना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हटले आहे. त्याचे कारण म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या
गेल्या नऊ वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टीकोन ठेऊन देश वाटचाल करत आहे. भारताने हे प्रयत्न जागतिक स्तरावर नेले असून हेच भारताच्या अध्यक्षतेखालील जी२० परिषदेत ठळकपणे दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. "महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
मित्रहो, दि. ८ मार्च हा दिवस वैश्विक स्तरावर ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. मागील काही वर्षांपासून अमेरिका, युरोप, ब्रिटन, जर्मनी, भारत या देशांमध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करणे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना ‘वर्किंग हवर्स’ कमी देणे, वेतनवाढ, नोकरीच्या ठिकाणी महिलांना संरक्षण आदी मागण्यांसाठी विविध महिला संघटनांकडून आंदोलने झाली, मोर्चे निघाले. यातूनच महिलांच्या सन्मानासाठी अन् हक्कांसाठी सर्वानुमते दि. ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरल
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ श्कोल्झ नुकतेच दोन दिवसीय भारत दौर्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा झाली. श्कोल्झ यांनी आपल्या दौर्यात भारतीय ‘आयटीयन्स’ना जर्मनीत नोकरीसाठी चक्क ‘रेड कॉर्पेट’च अंथरले. त्याविषयी...
अमेरिकेतील जो बायडेन यांचे सरकार ’नॉर्ड स्ट्रीम’ इंधन वायूवाहिनी उद्ध्वस्त करण्यात अमेरिकेचा काहीही हात नाही, हे घसा कोरडे करून सांगत असले, तरी फक्त आणि फक्त अमेरिकेकडे हे घडवून आणण्याबद्दलचे तंत्रज्ञान आणि त्यासाठीच्या सुविधा असल्याने अमेरिकेकडेच संशयाची सुई वळते, हे निश्चित.
अमेरिकन रिसर्च फर्म ‘हिंडेनबर्ग’ हे नाव भारतासह सध्या जगभरात चर्चेत आहे. अवघ्या पाच विश्लेषकांच्या जीवावर या ‘हिंडेनबर्ग’ने जगभरातील बड्या उद्योजकांना वेठीस धरले. ‘हिंडेनबर्ग’ हे नाव हल्लीच्या पिढीसाठी नवे असले, तर ज्या पिढीने पहिले आणि दुसरे महायुद्ध अनुभवले किंवा त्या कालावधीत वावरले, त्यांच्यासाठी आणखी एक ‘हिंडेनबर्ग’ होऊन गेला. होय तोच ज्याने अॅडॉल्फ हिटलरला हुकूमशहा होण्यासून रोखले होते. पहिल्या महायुद्धात बलाढ्य जर्मनीचा फिल्ड मार्शल हे सर्वोच्च पद ज्याने भूषविले तो लुडविंग हिंडेनबगर्र्! आपल्या युद्ध
युक्रेन विरुध्दच्या युध्दात रशिया खरोखरच अण्वस्त्रांचा वापर करु शकेल का, याबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये दुमत आहे. रशियाने बेकायदेशीररित्या बळकावलेली भूमी परत मिळवणे हे आत्मरक्षण असल्याने त्यासाठी युक्रेनला रणगाडे पुरवल्यास तो मर्यादा रेषेचा भंग होत नाही, असा निष्कर्ष अमेरिका आणि जर्मनीने काढला.
समुद्राच्या तळाखालील संपत्तीचा उपयोग करण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. त्यासाठी भारताने ‘समुद्रयान मिशन’ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत ‘मत्स्य ६०००’ या विशेष पाणबुडीची निर्मिती सुरू आहे. त्यामुळे आता भारत,अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान आणि चीन या देशांच्या पंक्तीत सहभागी झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला पुन्हा एकदा तोंड फुटले असून राजधानी कीव्हवर रशियाच्या मिसाईल हल्ल्याचे वृत्त येऊन धडकले. अशा या जागतिक झळ बसलेल्या युद्धाची लवकरच वर्षपूर्ती होईल. अमेरिकेसह युरोपिय देशांची युक्रेनला मदत आणि युक्रेनच्या सैनिकांची चिवट झुंज यामुळे बलाढ्य रशियाला हवा तसा आतापर्यंत विजय मिळविता आला नाही. त्यातच आता जर्मनीने आपले ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला देण्याचे मान्य केले आहे. तेव्हा रशियाविरुद्धच्या युद्धात हे रणगाडे ‘गेमचेंजर’ ठरतील, अशी युक्रेनला आशा आहे.
‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’सारख्या जागतिक व्यासपीठाकडून अधिक गंभीर अशा पर्यावरणीय प्रयत्नांची अपेक्षा आहे. हे प्रयत्न आशिया किंवा भारतकेंद्रीत असावेत; अन्यथा त्यांचे अर्थविषयक प्रयत्नही एक प्रकारचे भांडवलशाही आक्रमण असेल!
इमरान हुसेन यांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये प्रस्थापित केलेला मुद्दा केवळ मोदींच्या विरोधाचा नाही, तर ब्रिटिश पंतप्रधानालाही मुस्लीम हिताच्या मुद्द्यावर बोलायला लावण्याचा आहे.