लोकांच्या रीतिरिवाजांचा, स्थानिक रूढी-परंपरांचा, सण-उत्सवांचा, त्यांच्या आशा-आकाक्षांचा, विविध समूहांच्या श्रद्धांचा, त्यांच्या आवडी-निवडीचा, कौटुंबिक व सामाजिक पोताचा, मुख्य म्हणजे रोज सुरू असणार्या सांस्कृतिक अभिक्रियेचा अभ्यास केल्याशिवाय उद्योजकांना पुढे जाताच येत नाही. उद्योजकाला या सर्वांचं भान असेल तर त्याची बाजारपेठेवरील पकड घट्ट व्हायला मदत होते. लोकांच्या भौतिक आणि आंतरिक अवस्थेचं प्रतिबिंब म्हणजे बाजारपेठ. सण हे बाजारपेठेसाठी महा-इव्हेंट आहेत. सण-उत्सव-समारंभ नाहीसे झाले तर बाजारपेठ कोरडीठाक पडे
Read More
मुंबईत अनेक ठिकाणी गणेशोत्सवात मंडळांचे देखावे, गणरायाच्या मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील गणेशभक्तांची गर्दी होत असते. त्यात दि. १२ सप्टेंबरपासून मुंबई परिसरात गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
राज्यभरात गणेशोत्सवानिमित्त महापालिकांकडून विसर्जनाची तयारी करण्यात येत आहे. महापालिकांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि विसर्जन यांना पाठबळ दिले जात असून नवनवे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण जागरूकतेसाठी "पर्यावरणपूरक गणेशोत्सव/विसर्जन आपल्या दारी" उपक्रम सुरू केला आहे.
गणेशोत्सवात विविध कलांचा आविष्कार नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. गणेशोत्सवात नवनवीन संकल्पना घेऊन कलाविष्कार केला जातो. यातच आता मुलुंड येथील प्रसिध्द गणेश मूर्तीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यंदा नवा कलाविष्कार केला असून ३५ किलो साबुदाण्यापासून श्रीगणेशाची रांगोळी साकारली आहे. दि. १४ सप्टेंबर २०२४ ते २२ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुलुंडच्या आझाद भवन येथे पाहता येणार आहे.
सिंगापूर येथे भारतीय समुदायाकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. सिंगापूरमधील मराठी समुदायाने महाराष्ट्र मंडळ ही संस्था सुरू केली असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्र मंडळाला श्री दगडूशेठ गणरायाची मूर्ती प्रदान केली आहे.
देशातील गुजरात, झारखंड, कर्नाटकसह शेजारच्या अस्थिर बांगलादेशमध्येही गणेशोत्सवाला गालबोट लावण्याचे संतापजनक प्रकार विघ्नसंतोषी मंडळींकडून घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हिंदूंच्या सण-उत्सवांवर हल्ले करुन, समाजात तेढ निर्माण करणार्या कट्टरतावाद्यांना आजन्म लक्षात राहील, असा धडा शिकवायलाच हवा.
Ganesh Festival 2024 बांगलादेशातील चितगाव शहरातील कदम मुबारग भागात ६ सप्टेंबर रोजी गणेशाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या हिंदू भाविकांवर कट्टरपंथींनी दगडफेक केल्याची धक्कादाय़क घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवसाआधी ही घटना घडली, रिपोर्टनुसार बतरगली धवपारा सर्वजनीन पूजा समितीचे सदस्य कारागीर उत्तम पाल यांच्या कारखान्यातून गणेशाची मूर्ती एका गाडीतून आणत असताना हा प्रकार घडला होता.
ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्थी एकाच दिवशी आल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून मुस्लिम बांधवांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांकडून ईद जुलूस मिरवणूक एकाच दिवशी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवात अनेकांना सुट्टी नसल्याने गणेश दर्शन घेणे शक्य होते. त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांकरिता रेल्वे डब्यात गणराय बसवण्याची परंपरा सुरू करण्यात आली. गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा खंडित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गणेश मूर्तीच्या आगमनावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार घटना मध्य प्रदेशातील मोचीपुरा येथे शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्य़ेने नजीकचे पोलीस ठाणे गाठले असून समाज कंटकांविरोधात एफआयआरची मागणी केली आहे. यावेळी काही लोकांनी पोलीस ठाणे सभोवतालचा रस्ता आडवला होता.
तालुक्यात घराघरात बसवलेल्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पान्चे सर्वत्र मोठ्या भक्ती भावाने विसर्जन करण्यात आले . यामध्ये वसईच्या ग्रामीण भागात पूर्ण गावभर पूर्ण गावांत मिरवणूक काढून साऱ्या गावांत बसवण्यात आलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांचे एकत्रित श्रीगणेश विसर्जन करण्याची परंपरा आजही कायम असून गावातील आबालवृद्ध या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात .
सध्या गणेशोत्सव सुरु झाला असून दीड दिवसांच्या गणरायांना साश्रुनयनांनी भक्तांनी निरोपदेखील दिला. ऋषिपंचमीच्या दिवशी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होते. तसेच, शेगावीच्या गजानन महाराजांचा समाधी दिनही साजरा होतो. याठिकाणी चालणार्या मिरवणुकीच्या सोहळ्यात लेझीमचा उपयोग होतो. लेझीम क्रीडाप्रकाराचा हा आढावा...
राजकारण म्हटले की विरोधीपक्षांवर टीका ही आलीच. त्यात विशेष काहीच नाही. आणि विशेषतः राजकारणात टीका करताना, ती अत्यंत कठोर शब्दांत आणि कोणत्याही मुद्द्यांवर केली जाते.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे शहरात गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला असून सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे शहरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली आहे.
गिरणगावात गेली ३० वर्षे अविरतपणे आपल्या कुटुंबासहित गणरायाची सुबक मूर्ती घडविणार्या अलकाताई मादुस्कर यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेणारा हा लेख...
वसई तालुक्यात मंगळवार पासून सुरू झालेल्या माघी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. वसई-विरार शहरात भाद्रपद महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे हे १३१ वे वर्ष आहे. याठिकाणी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतील सर्वात पहिला गणेश उत्सव साजरा करण्यात आला. आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्यांच्या ऐतिहासिक गणेश उत्सव दौऱ्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले होते. या भेटीदरम्यान नड्डा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर केशवजी नाईक चाळ येथील गणपतीचे दर्शन घेतले. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कौशल्य , रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल
गणेश चतुर्थी हा आपल्या महाराष्ट्रीयांचा आवडता सण आहे. ज्या उत्साहात महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, त्याच उत्साहात तो परदेशातही साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. त्यानिमित्त मुंबईतील बाजारपेठ्या खुलल्या आहेत. मुंबईबाहेरील मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या आगमन सोहळ्यानिमित्त गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ-करीरोड भागात भाविकांची गर्दी वाढत आहे.
गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मग यासंदर्भात जागरूक हिंदूंची जबाबदारी नेमकी काय असायला हवी? समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण व्यक्ती व सामाजिक पातळीवर यानिमित्ताने काही करू शकतो का? आपण यात काही भूमिका बजावू शकतो का? याचा उहापोह करणारा हा लेख...
एखादे सार्वजनिक कार्य हाती घेतल्यावर त्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेत ते कार्य पुढे न्यावे लागते, वाढवावे लागते. आपण सुरू केलेले कार्य मोठ्या प्रमाणात वाढवले तर ते नेतृत्व यशस्वी झाले असे समाज मानतो. कार्य अर्धवट टाकून गेलेल्यांना ‘आरंभशूर’ म्हणतात. सार्वजनिक गणपती पहिल्या वर्षी ज्यांनी बसवला त्यांच्यात टिळकांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी टिळकांनी या उत्सवाचे तोंड भरून कौतुक केले. दुसर्या वर्षी टिळकांनी बारीकसारीक गोष्टीत स्वतः लक्ष घातले, या उत्सवासाठी मेहनत घेणार्यांची ‘केसरी’तून जाहीर पाठ थोपट
'गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली?' या वादात टिळकांच्या विरुद्ध पक्षात 'भाऊसाहेब रंगारी' हे नाव आपण ऐकतो. 'टिळक विरुद्ध भाऊ रंगारी' असा सामना टिळक आणि भाऊ रंगारी यांच्या समर्थकांकडून लढवला जातो. मात्र, गणेशोत्सवाच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर भाऊसाहेब रंगारी या नावाला एक निराळे अस्तित्व आहे हे जाणवते. भाऊ रंगारी यांचे अस्तित्व केवळ गणेशोत्सवापुरते भांडण्यात नाही. दुर्दैवाने या वादापालीकडे जाऊन त्यांचा शोध कुणी करत नाही. 'लोकमान्य टिळक या नावाला जसे गणेशोत्सवापलीकडेसुद्धा एक निराळे अस्तित्व आहे, ओळख आहे तशीच
‘हिंदूंचे आराध्य दैवत’ म्हणून आपल्या देशात गणेशोत्सवाचे पूजन पूर्वापार केले जात असे, आज जसे घरोघर उत्साहाने गणपती बसवले जातात, तसेच पूर्वीही होत असे. त्या काळात राजे-राजवाडे, मोठमोठी संस्थाने यांसारख्या मान्यवर कुटुंबात मात्र गणपती मोठ्या धामधुमीने साजरा होई. मोठ्या संस्थांचा गणपती म्हणून साहजिकच त्या संस्थानचा गणपती हा लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असे. दर्शनाच्या किंवा पूजेच्या निमित्ताने म्हणा, मोठ्या प्रमाणात सामान्य लोक यात सहभागी होत असावेत. पेशवाईनंतर ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली आणि आपल्या ताब्यात
गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. गणेश मंडळांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
संत सातत्याने काळानुरूप भक्तीचं माहात्म्य कथन करतात. कहाण्यांमधून भक्तीचा हेतू सांगितलेला असतो. कहाण्या कालबाह्य नसून त्यामधील मतितार्थ काढता आला की, प्रपंचामधून परमार्थ साधणं सोपं जातं. ज्ञानदेवांचा ज्ञानमय गणेश तर नामदेवांचा कीर्तनात रंगून नाचणारा गणेश!
गणेशोत्सव जगभरात पोहोचण्यासाठी ब्रँडिंग करण्याबाबत अतुल शाह यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे आज गणपती दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागचा राजा व इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत.
आपल्या घरचा बाप्पा आपण स्वत: साकारायचा.
मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने उत्सवाच्या काळात लाऊडस्पीकर पूर्णतः बंदी घातली आहे का, याबाबत शुक्रवारी भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले. यावेळी न्यायालयाने म्हटल्यानुसार, सध्या तरी परवानगी दिलेली नाही, मात्र सरसकट बंदी कितपत योग्य आहे, असा सवालही राज्याला विचारला आहे.
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं.
अभिनेते दिगंबर नाईक यांच्या घरीही बाप्पा आले. पण वैशिष्ट्य म्हणजे दिगंबर नाईक यांच्या घरी दोन गणपतींची स्थापना झाली आहे. गेली अनेक वर्षे दिगंबर त्यांच्या घरी गणपतीच्या दोन मुर्त्या आणतात. महाएमटीबीशी संवाद साधताना दिगंबर नाईक यांनी यामागील कारण सांगितले.
गणेशोत्सव मंडळाची मिरवणुक नालासोपाऱ्यातील गावदेवी परिसारातून जात असताना टँकरची धडक लागून एका तरुणाचा मृत्यु झाला आहे.
घराघरात व अनेक गणेशोत्सव मंडळातही गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाची आज दिवसभरातील काही निवडक छायाचित्रे...
चेन्नईहून उड्ड्णा झालेले हे १२ आसनी विमान आज चिपी विमानतळावर उतरले. विशेष म्हणजे या विमानातून गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.
बुद्धी प्रदान करणारा श्रीगणेश हा प्रज्ञा, मेधा, ऋतंभरामध्ये वास करतो. संकटांमधून सोडवणारा गणेश भक्तीमध्ये वास करतो. शुभ्र हिमालयाच्या पर्वतराशींत माता पार्वती आणि पिता शंकर यांच्या समवेत वास्तव्य करतो. गणपती भक्तांच्या देवघरातून अंगणात आला. आता तर तो थेट मैदानावर येऊन बसला.
बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाप्पासह १२ आसनी विमानाचं आगमन झालं आणि कोकणवासीयांची परशुरामभूमीवर विमानदर्शनाची प्रतीक्षा एकदाची संपली.
दादर येथील ‘इंद्रवदन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ ओला कचरा खत प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला आहे. हा प्रकल्प सुरु करून या मंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे.
मुंबई, ठाणे आणि उपनगरांत घोषित शांतता क्षेत्रात कर्कश्श डॉल्बी आणि डिजेच्या नादात आधीच गणपतींचे आगमन सोहळे सुरू झालेच आहेत, अशाप्रकारे या उत्सवाच्या मुळावर दरवर्षी घाव घातला जातोच.
टिटवाळ्यातील मूर्तीकार महेंद्र गोडांबे यांच्या ‘आशीर्वाद कला केंद्रा’मधील गणरायांच्या मुर्तींना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे येथील शेकडो बाप्पांची स्वारी यावर्षीदेखील परदेशी निघाली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना, शहरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्याही सोडण्यात आल्या आहेत,
मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना दि. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे.
प्लास्टिक आणि थर्माकोलला दूर ठेवूया आणि आपल्या लाडक्या गणरायाचे अगदी जल्लोषात दरवर्षीप्रमाणे स्वागत करूया...
थर्माकोल बंदी कायम