दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
Read More
गोगलगायी, बेडूक अशा चाकोरीबाहेरच्या वन्यजीव प्रजातींवर संशोधनाचे काम करणारे प्राध्यापक डॉ. ओमकार विष्णूपंत यादव यांच्याविषयी...
पर्यटनाच्या केंद्रस्थानी असूनही पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या महाबळेश्वरमधून बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (frog discovered from mahabaleshwar). 'क्रिकेट फ्रॉग' या सामान्य नावाने ओळखल्या जाणार्या 'मीनर्वारिया' या कुळातील या बेडकाचे नामकरण 'मीनर्वारिया घाटीबोरेलिस', असे करण्यात आले आहे (frog discovered from mahabaleshwar). महाबळेश्वरसारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळामधून प्रदेशनिष्ठ बेडकाच्या प्रजातीचा शोध लागणे ही त्या प्रदेशातील नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिवासाच्या दृष्टीने काही भागांपुरता मर्यादित असणारा 'मलबार ग्लायडिंग फ्राॅग' या बेडकाचे दुर्मीळ दर्शन कुडाळ तालुक्यातील 'एसएसपीएम मेडिकल काॅलेज अॅण्ड लाईफटाईम हाॅस्पिटल'मध्ये घडले आहे (malabar gliding frog). हा बेडूक कुडाळ तालुक्यातील तुरळक ठिकाणी पावसाळी हंगामात दिसतो (malabar gliding frog). मात्र, डिसेंबर महिन्यात त्याचे दर्शन घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (malabar gliding frog)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बेडकांच्या नव्या प्रजाती शोध लावण्यात आला आहे. कोकणच्या भूमीवरुन या प्रजातीचे नामकरण 'फ्रायनोडर्मा कोंकणी', असे करण्यात आले आहे (frog from sindhudurg). कुडाळ तालुक्यातील पाणथळ आणि कातळ सड्यांवर या बेडकाचा अधिवास आहे (frog from sindhudurg). या शोधामुळे सिंधुदुर्गातील पाणथळ जागा आणि कातळ सड्यांवरील जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (frog from sindhudurg)
Amboli bush frog : या कारणांमुळे आकसला आंबोलीतील बेडकांचा आकार
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेल्या 'आंबोली बूश फ्राॅग' आणि 'बाॅम्बे बूश फ्राॅग' नामक बेडकाच्या प्रजातींवर रबर आणि काजू लागवडीचा विपरीत परिणाम होत असल्याचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे (amboli bush frog). जंगलाच्या तुलनेत रबर लागवडीमध्ये आढळणाऱ्या 'आंबोली बूश फ्राॅग'चा आकार आकसल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे (amboli bush frog). त्यामुळे तळकोकणात मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रबर आणि काजू लागवडीचा गंभीर परिणाम उभयचरांसारख्या दुर्लक्षित जीवांवर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. (amboli bush frog)
जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न पश्चिम घाटामध्ये अनेक दुर्मीळ तसेच प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. बेडकांच्या गटातील ‘कोट्टीगेहर’ हा नाचणारा बेडूक पश्चिम घाटातील एक प्रदेशनिष्ठ प्रजात. ’Micrixalidae’ या कुळातील ही बेडकाची प्रजाती असून, त्याला सामान्यपणे ‘डान्सिंग फ्रॉग’ किंवा ‘नाचणारा बेडूक’ म्हणूनही संबोधले जाते. मात्र, या बेडकांची संख्या जागतिक स्तरावर आता कमी होत चालली आहे.
बेडूक आणि इतर उभयचरांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी दि. २० मार्च रोजी जागतिक बेडूक दिन साजरा केला जातो. बेडूक हे केवळ रंजक नाहीत, तर ते आपल्या पर्यावरणातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यांचे जीवनचक्र पाण्याशिवाय अपुरे आहे, अशा या उभयचर प्राण्याविषयी जाणून घेऊया.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने जाणून घेऊया बेडूक या अनोख्या जीवांबद्दल. पावसाळ्याच्या दरम्यान दिसणारा आणि उरलेले सात-आठ महिने गायब असणारा जीव म्हणजे बेडूक... ओंगळवाणा वाटणारा हा बेडूक जीव सुमारे 300-350 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाला. बेडकांची निर्मिती, त्यांची ध्वनिनिर्मिती आणि प्रजाती यांच्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
बेडकाच्या 'मिनर्वर्या गोएमची' नामक प्रजातीची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात हा बेडूक आढळून आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तरुण जीवशास्त्रज्ञांनी या बेडकाची नोंद केली आहे.
बेडकांवर प्रेम करणारी माणसं मिळणं तसं दुर्मीळच. मात्र, ज्या बेडकांना आपण घरातून पळवून लावतो, त्याच बेडकांचे पालन करणार्या बेडूक मित्र मंगेश सुहास माणगावकर यांच्याविषयी...
पावसाळ्यात दिसणारे बेडूक जरी किळसवाणे वाटत असेल, तरी ते जैवसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. बेडकांच्या गमतीदार स्वभावाविषयी जाणूया घेऊया डॉ. वरद गिरींकडून...
१९४८ साली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट विभागाची स्थापना केली होती. या विभागातर्फे अनेक दुर्मिळ माहितीपटांचे जतन करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून एक नवीन उपक्रम सुरु करण्यात येत असून 'क्षितिज' माहितीपट संस्थेतर्फे चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.