राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच तिथला सामान्य माणूस गुंतलेला. कोणाच्याही अध्यात व मध्यात नसलेले पडघा - बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले आहे. पुण्यातील इसिस मॉडयूल कनेक्शनप्रकरणी एनआयएने चार महिन्यांपुर्वी पडघ्यातून सहापैकी चार दहशतवाद्यांना इथूनच अटक केले होते. आणि तेव्हापासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सीरिया
Read More
जम्मू काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशात सत्तेवर येताच दहशदवाद्यांचे लाड पुरवणे बंद झाले. त्यामुळे देशात राहून देशविरोधी कटकारस्थान रचणाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे. निरपराध काश्मिरी पंडितांची हत्या करणारा कुख्यात दहशदवादी बिट्टा कराटे याच्या पत्नीसह दहशदवाद्यांचे नातेवाईक असलेल्या तिघांना सरकारी नोकरीतून काढून महत्वपूर्ण टाकण्याचा निर्णय,नुकताच जम्मू काश्मीर प्रशासनाने घेतला आहे.