नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोचा चक्रिवादळ रविवार म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादाळाचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने सोमवारी वर्तविली आहे.
Read More
'मोचा' चक्रिवादळ हे १६० किमी प्रतितास आणि १८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. त्याच्या प्रभावाखाली आज पश्चिम बंगाल,ओडीशा, बांग्लादेश, आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतात त्रिपूरा , मिझोराम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, आसाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.