पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असणारा नंदुरबारच्या सारंगखेड्य़ातील वैशिष्टय़पूर्ण घोडेबाजार चेतक फेस्टिव्हलची भूरळ आता बॉलीवुडलाही पडली आहे. येत्या काळात अनेक कलाकार चेतक फेस्टिव्हलला भेट देणार आहेत.
Read More
‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाच्या वर्षीही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.
पर्यटन विभागाने चेतक फेस्टिव्हलचा देशभरात प्रचार-प्रसार केला आहे. त्यामुळे यंदा पर्यटकांची संख्या वाढेल. विदेशी पर्यटकांनाही चेतक फेस्टिव्हलविषयी अवगत करण्यात आल्याने यावर्षी विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतील, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.